3 उत्तरे
3
answers
आमदार म्हणजे कोण?
16
Answer link
विधानसभेतला आमदार हा विशिष्ट मतदार संघातील लोकांनी थेट निवडून दिलेला असतो. त्यामुळे त्या लोकांचे प्रतिनिधित्व विधिमंडळात करणे हा एक भाग झाला. त्या विशिष्ट भागासाठी "राज्य सरकारच्या"(कारण हा आमदार राज्य सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत सहभागी असतो) योजना पोचवणे, त्या पोहचत नसतील तर त्याविषयी आवाज उठवणे, एखादा कायदा आपल्या मतदार संघासाठी आवश्यक किंवा जाचक वाटत असल्यास सूचना करणे किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यात दुरुस्त्या सुचवणे आणि त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक मांडणे ही आमदाराची कामे आहेत.
या व्यतिरिक्त सभागृहात होत असलेल्या चर्चांमध्ये अभ्यास करून सहभागी होणे, विधानसभेत अधिवेशन चालू असताना सरकारच्या भूमिकेबाबत, कार्याबाबत प्रश्न विचारणे, माहिती घेणे त्यावर आपले मत मांडणे, आपल्या मतदारसंघातील लोकांच्या आशा अपेक्षा राज्य सरकार पर्यंत पोचवणे हेही आमदाराचे काम आहे. एक प्रकारे विधानसभेचा आमदार हा जनता आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम
या व्यतिरिक्त सभागृहात होत असलेल्या चर्चांमध्ये अभ्यास करून सहभागी होणे, विधानसभेत अधिवेशन चालू असताना सरकारच्या भूमिकेबाबत, कार्याबाबत प्रश्न विचारणे, माहिती घेणे त्यावर आपले मत मांडणे, आपल्या मतदारसंघातील लोकांच्या आशा अपेक्षा राज्य सरकार पर्यंत पोचवणे हेही आमदाराचे काम आहे. एक प्रकारे विधानसभेचा आमदार हा जनता आणि राज्य सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम
2
Answer link
आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे.हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.
आमदाराचा कालावधी: विधानसभा सदस्य म्हणजेच आमदाराचा कालावधी पाच वर्षाचा असतो. विधानसभेची मुदत संपल्याने आमदारकीचा कार्यकाल संपतो. विधानसभेची मुदत पाच वर्षांची आहे परंतु मुख्यमंत्र्याच्या विनंतीनुसार राज्यपाल त्याआधीच बरखास्त सुद्धा करू शकतात. आणीबाणीच्या काळामध्ये विधानसभेची ही मुदत वाढवली सुद्धा जाऊ शकते, परंतु एका वेळी सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी वाढविता येत नाही.
0
Answer link
आमदार म्हणजे विधानसभेचे सदस्य.
व्याख्या: आमदार हे निवडणुकीद्वारे निवडलेले लोकप्रतिनिधी असतात, जे विशिष्ट विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
निवडणूक: विधानसभेची निवडणूक दर पाच वर्षांनी होते. ज्यामध्ये नागरिक मतदान करून आपल्या मतदारसंघातील आमदाराला निवडतात.
कार्य:
- कायदे बनवणे आणि धोरणे ठरवणे.
- सरकारच्या कामावर लक्ष ठेवणे.
- मतदारसंघातील समस्या व प्रश्न सरकार दरबारी मांडणे.
पात्रता: आमदार होण्यासाठी काही पात्रता निकष असतात, जसे की तो भारताचा नागरिक असावा, त्याचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त असावे, आणि तो कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा.
अधिक माहितीसाठी: