4 उत्तरे
4 answers

वासना म्हणजे काय ?

13
वासना म्हणजे एखादी इच्छा पूर्ण व्हावी व ती मिळवणे शक्य नसतं, ते जी काही इच्छा आहे ती मिळाली पाहिजे अशी मनोमन वाटत असते. उदाहरणार्थ एखादा खाण्याचा पदार्थ दिसला की तो खाण्याची इच्छा होणे म्हणजे खाण्याची वासना.
गरज ही वासनाच आहे. एखादं घर हवं, कपडे हवेत, पिण्यासाठी पाणी हवं, आसरा हवा, शांत निवांत बसायला मिळावं अशी इच्छा, मनोकामना असते, ती पूर्ण झाली नाही तर ती इच्छा राहते, ती वासना.
एखादी गोष्ट बघून ती मला पण करायची आहे अशी भावना निर्माण होते ती वासना.
उत्तर लिहिले · 5/1/2020
कर्म · 20950
6
वासना नदीचे प्रवाह दोन
एक अशुभ दुसरा शुभ।
प्रयत्न शुभ रस्ता चालावा
आत्म होई शांत तो पहावा।।


भविष्यात ज्यांची पूर्ती व्हावी अशा अपेक्षा, कामना म्हणजे वासना. त्या कधी तृप्त होत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बंधनात ‘मनुष्य’ नेहमी परतंत्र राहतो. गरज म्हणजे वर्तमानात जगण्यासाठी आवश्यक गोष्ट, ती भागवणं कठीण नसतं आणि फक्त गरजा पूर्ण करणारा माणूस तसा मुक्त असतो.
उत्तर लिहिले · 4/1/2020
कर्म · 15490
0

वासना म्हणजे तीव्र इच्छा किंवा लालसा. ही इच्छा शारीरिक, मानसिक किंवा भावनिक असू शकते.

वासनेचे विविध प्रकार आहेत:

  • शारीरिक वासना: लैंगिक इच्छा, भूक, तहान
  • मानसिक वासना: प्रसिद्धी, पैसा, अधिकार मिळवण्याची इच्छा
  • भावनिक वासना: प्रेम, आपुलकी, सहानुभूती मिळवण्याची इच्छा

वासना मानवी स्वभावाचा एक भाग आहे. वासनांमुळे व्यक्तीला काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, परंतु वासनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अनियंत्रित वासना हानिकारक ठरू शकतात.

अधिक माहितीसाठी:

  1. विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE)
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2220

Related Questions

मी मोह मायेच्या दुनियेत हरवलो आहे का?
माणसा व्यतिरिक्त इतर सगळ्या सजीवांना, उदाहरणार्थ वृक्ष, वेली, झाडे, पशू, पक्षी, जनावरे यांना देखील माणसाप्रमाणेच 'अहंकार' किंवा अहंकाराची 'जाणीव' असते का?
भावनाशून्य माणसे असू शकतात का?
खरा आनंद म्हणजे काय? तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो?
स्वतःच्या भावना समजून घ्यायला इतकं कठीण का वाटतं?
पराजय कोणाचा होतो खरा की खोट्याचा?
म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण काय?