श्रावणातला पाऊस यावर निबंध कसा लिहाल?
श्रावणातल्या पावसात सर्वत्र हिरवेगार गवत जणु काही हिरवीगार गालिचा पसरलेली असते ती येणारी हळुच पावसाची सर अंगावर स्पर्श करते तेव्हा अंग शहारून येते श्रावणातल्या पावसाची मजा काही वेगळीच असते श्रावण महिन्यात अचानक येणारी पावसाची आणि ऊनसावळी कोणीतरी वरुन पाणी शिंपडावे तसे काही
श्रावणातल्या पावसाची मजा आनंद खेडे गावात
माझी स्वताची आठवण मी सांगत आहे
श्रावणातल्या पावसामध्ये शेत माळरान हिरवं गार ते सौंदर्य काही वेगळाच असतो
श्रावणातल्या पावसात शेतात येणाऱ्या किरव्या जणु काही मोती जणु त्या किरव्या पकडण्याची मजा काही वेगळीच असते
श्रावणातल्या पावसात जर अंगणात खेळताना बागडताना पावसाची सर आली की आम्ही नाचायचो आणि आमचं गाणं चालू ''ऊन पाऊस कोल्ह्याच लगीन''
श्रावणातल्या पावसात पशु पक्षी तृप्त होऊन नाचत बागडत असतात मोर तर आपला पिसारा फुलवून नाचत असतो तेव्हा मोराचा आवाज ऐकायला गोड वाटते त्याच्यात कोकीळेचा आवाज इतक छान ऐकायला मधुर गोड वाटतो
बालकवी ची कविता आहे
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे.

श्रावणातील पाऊस म्हणजे अंगावर घ्यावासा वाटणारा पाऊस असतो.ऊन सावलीचा खेळ आणि त्यात पडणारा श्रावणी पाऊस एक वेगळाच आनंद देऊन जातो. श्रावणातील आनंद लिहून सांगण्यापेक्षा स्वतः जास्त अनुभवून समजू शकतो.
श्रावणातील पाऊस खरे तर ऊन सावलीचा खेळ असतो. शांत असा पडणारा हा पाऊस अंगाला एक सुंदर असा स्पर्श करून जातो जो प्रत्येकाला हवाहवासा असतो. श्रावणातील पाऊसाचा खरा खेळ खेड्यात अनुभवण्याची वेगळीच मजा असते. खान्देशात अशा पाऊसाची मजा आणि कोकणातील पुण्यातील असल्या रिमझिम पाऊसाची मजा खूपच फरक आहे.
श्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन निसर्गकवी बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे व वास्तव केले आहे. ते म्हणतात,
‘श्रावणमासी हर्षमानसी
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात पिवळे ऊन पडे’
पशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशावेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते तर कधी हळूच ऊन येते. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस पडतो, तर कधी पावसात ऊन पडते, पाऊस वेडा असतो म्हणून श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधत असावेत किंवा आषाढात पाऊस माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधीत असावा.
श्रावणा तील सरी सारखा
तू हळुवार येशील का?
ऊण पाऊसा खेळ माझ्याशी
तू खेळशील का?
माझ्या स्वप्नांना
खरे करशील का?
सांग ना
माझा श्रावण पाऊस होशील का?
श्रावणातला पाऊस
श्रावण महिना म्हटला की डोळ्यासमोर उभे राहतात ते हिरवेगार डोंगर, धुक्याची शाल आणि रिमझिम पाऊस. श्रावण म्हणजे सणांची आणि आनंदाची उधळण. या महिन्यात निसर्ग नववधू सारखा शृंगारलेला असतो.
श्रावणात पावसाचे महत्व अनमोल आहे. हा पाऊस सृष्टीला जीवन देतो. नद्या, नाले, तलाव पाण्याने भरून वाहतात आणि धरती तृप्त होते. शेतकरी आनंदित होतो, कारण त्याच्या पिकांसाठी हा पाऊस म्हणजे अमृतच असतो.
श्रावणात अनेक व्रत वैकल्ये असतात. श्रावणी सोमवार, मंगळागौरी, नागपंचमी, रक्षाबंधन असे अनेक सण या महिन्यात येतात आणि उत्सव साजरा करण्याची एक वेगळीच मजा असते.
पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी पूर येतात आणि त्यामुळे लोकांचे खूप नुकसान होते. या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित आणि वित्तहानी होते. त्यामुळे पावसाचे व्यवस्थापन करणे खूप गरजेचे आहे.
श्रावणातील पाऊस एकंदरीत सृष्टीसाठी वरदान ठरतो. तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे.