कायदा स्थलांतर

निर्वासित म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

निर्वासित म्हणजे काय?

4
२० जून) जागतिक निर्वासित दिन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वतीने हा दिवस पाळला जातो. तुर्कीच्या समुद्रकिनार्‍यावर सिरियाचा दोन वर्षांच्या निरागस आयलान कुर्दी या बालकाचा मृतदेह आढळला. याचा फोटो जगभर व्‍हायरल झाला. त्यावेळी खर्‍या अर्थानं जगाचे निर्वासितांच्या भयानक वास्‍तवाकडे लक्ष वेधले. निर्वासितांच्या प्रश्नावरुन खरे तर जगाला जाग आली. जगण्याचा हक्‍का प्रेत्येकाला आहे. पण समाजात वावरताना गरीब आणि श्रीमंत, जातीयवाद, वंशवाद अशी दरी व त्यातून निर्माण होणारे वाद यामुळे समाजातील काही घटकांस आपलं गाव, देश घर सोडून स्‍थलांतर कराव लागतं. अशावेळी या किडक्या व्यवस्‍थेचा हा कमकुवत समाज नाहक बळी ठरतो. यातून काय तर मानव प्राण्याचे नुकसानच होते. या प्रश्नाकडे मानवता म्‍हणून पाहायला पाहिजे. तरच आपण निर्वासितांचा प्रश्‍न समजून घेऊ शकू.


याला जबाबदार कोण ?

निर्वासितांना नेहमी स्‍थलांतरीत म्‍हणूनच जगावं लागतं. आपलं असं काही मुळात त्यांच्याजवळ उरतच नाही. छोट्या  देशांमध्ये निर्वासितांचा प्रश्न गंभीर आहे. यामध्ये सीरिया, दक्षिण सुदान, म्यानमार, अफगाणिस्‍तान या देशांचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये सिरियामधील निवार्सितांचा प्रश्न ज्‍वलंत आहे. निवार्‍यासाठी यांना झगडावं तर लागतयंच. पण जगण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. यामुळे कित्येक संसार उद्ध्‍वस्‍त झाले आहेत. असे फोटो पाहिल्यानंतर माणसातील माणुसकी संपत चालली आहे अस वाटत राहतं. याला जबाबदार कोण? असाही प्रश्न निर्माण होतो. आज घडीला जगात दोन कोटींहून अधिक निर्वासित आहेत. १९९१ नंतर जगभरातील ७० हून अधिक देशांमध्ये यादवी संघर्ष निर्माण झाला. यात वांशिक दंगली, दहशतवाद निर्माण झाल्यामुळे निर्वासितांची संख्या वाढलेली आहे.

निर्वासित म्‍हणजे नेमके कोण?

निर्वासित म्‍हणजे नेमके कोण? हा प्रश्न सर्वांनाच पडतो.  निर्वासितांना ‘स्थलांतरीत’ मानणे हा नेहमीचा संभ्रम आढळून येतो.  स्वत:च्या देशात होणारा छळ वा जीविताची भीती यामुळे परागंदा व्हावे  लागणारे  म्‍हणजे देश सोडण्याची वेळ येणारे  नागरिक निर्वासित होत. अर्थात स्‍थलांतरीत म्‍हणजेच निर्वासित नव्‍हे.

स्थलांतरीत म्‍हणजे कोण?

स्थलांतरीत नागरिक हे निर्वासितांपेक्षा वेगळे असतात. ते आपल्या मर्जीने स्‍थलांतर करत असतात. त्यांचे प्रश्न वेगळे असतात. त्यांच्यापुढे पर्याय असतो. बहुतेक वेळा आर्थिक समृद्धीसाठी ते स्वेच्छेने स्वत:चा देश सोडतात.  गरिबी वा रोजगाराच्या संधी नसल्याने अनेक नागरिक स्थलांतर करतात. याचबरोबर सुशिक्षित, सुस्थितीत असणारे अनेक जणही स्थलांतराचा मार्ग अवलंबतात. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंड या देशांमध्ये दरवर्षी मोठय़ा संख्येने भारतीय स्थलांतर करतात. यामागे उत्तम शिक्षण, चांगली नोकरी, चांगले पर्यावरण तसेच चांगली राजकीय व्यवस्था आदी कारणे असू शकतात. आपल्या कुटुंबाचे पोषण अधिक चांगले व्हावे असा उद्देश असू शकतो.

निर्वासित आणि भारताचे धोरण

निर्वासितांविषयी भारताची भूमिका नेहमीच सहानुभूतीची राहिलेली आहे. आपण त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलेले आहे. त्यांच्यासाठी छावण्या उभारलेल्या आहेत. निर्वासितांनाही जगण्याचा अधिकार आहे.  त्यांच्याही मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, त्यांनाही निवारा मिळाला पाहिजे, त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत असा विचार भारत सरकारकडून केला जातो. त्यासाठी विविध उपायही सरकारने केले आहेत.

समृद्धी हा स्थलांतर रोखण्याचा सर्वोत्तम उपाय

आपल्या देशाला समृद्ध बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्‍न केले पाहिजेत. यासाठी जातीयवाद, वंशभेद यातून बाहेर पडणे गरजेचे आहे.  निर्वासित आणि स्थलांतरित यांमधील फरक प्रत्येक देशाने लक्षात घेतला पाहिजे. तो जर लक्षात घेतला तर दोन्ही समस्यांवर व्यवहार्य मार्ग काढणे  शक्य होईल. त्यासाठीच संयुक्‍त राष्‍ट्र संघटनेने यंदाच्या निर्वासित दिनाची 'आतापेक्षा अधिक, आम्हाला शरणार्थ्यांसह उभे राहण्याची गरज आहे' ही थीम निश्‍चित केली आहे.

आशा करतो तुम्हाला उत्तर आवडले असेल
🙏🙏🙏🙏🙏
उत्तर लिहिले · 9/12/2019
कर्म · 20585
0

निर्वासित म्हणजे असा व्यक्ति समूह किंवा व्यक्ती जी आपल्या देशातून सक्तीने विस्थापित झाली आहे.

कारणे:

  • युद्ध
  • नैसर्गिक आपत्ती
  • राजकीय अस्थिरता
  • वंशसंहार
  • धार्मिक persecution (छळ)

जेव्हा लोकांना त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले जाते, तेव्हा ते निर्वासित म्हणून जगतात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, जसे की सुरक्षित निवारा शोधणे, अन्न आणि पाणी मिळवणे, आणि नवीन वातावरणाशी जुळवून घेणे.

उदाहरण:

  • म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिम
  • सीरियातील युद्धामुळे विस्थापित झालेले नागरिक

UNHCR (United Nations High Commissioner for Refugees) ही संस्था निर्वासितांसाठी काम करते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5060

Related Questions

स्थलांतराचे प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?
इटलीच्या कोणत्या गावात राहण्यासाठी पैसे व घर दिले जाते?
मॉरिशसमध्ये भारतीय वंशाचे लोक कसे व कधी स्थायिक झाले?
संकल्पना स्पष्ट करा: स्थलांतर?
अंतर्गत स्थलांतर व बहिर्गत स्थलांतर यातील फरक कोणता आहे?
लोक आपले गाव सोडून दुसरीकडे का जात नाहीत याची कारणे कोणती आहेत?
रोहित पक्षी कोणत्या प्रदेशात स्थलांतर करतात?