औषधे आणि आरोग्य आजार पोषण आरोग्य

अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?

2 उत्तरे
2 answers

अ जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?

4
अ-जीवनसत्त्व हे शरिराला लागणारे एक महत्त्वाचे जीवनसत्त्व असून ते पाण्यात विरघळत नाही, पण मेदात विरघळते. अ-जीवनसत्त्व सामान्यपणे पिवळ्या रंगाचे असते.

'अ'(a) जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार :-

रातांधळेपणा ('अ' जीवनसत्त्वाचा अभाव)
या आजारात माशाच्या खवल्यासारखे डाग डोळयाच्या पांढ-या भागावर दिसू लागतात. हे डाग बुबुळाच्या बाहेरच्या बाजूला असतात. पण नाकाच्या बाजूला कधी येत नाहीत. डोळयात काजळ घातल्यावर या खरखरीत भागावर काजळ साचून हा भाग उठून दिसतो. या खवल्यासारख्या भागाला बिटॉटचे ठिपके म्हणतात. (बिटॉट हे एका शास्त्रज्ञाचे नाव आहे.) आता हा आजार फार क्वचित आढळतो.


कमतरतेचे दुष्परिणाम:-
अ-जीवनसत्त्वाची कमतरता दोन प्रकारे होते. -

१. अ-जीवनसत्त्व असणाऱ्या भाज्या-फळे किंवा अ जीवनसत्त्व असणारे मांसाहारी अन्न यांचे सेवन न झाल्यामुळे. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे डोळ्यांतील रेटिनाच्या (द्श्यपटलाच्या) वाढीला अडथळा होतो व त्यामुळे रातांधळेपणा येतो. मातेचे दूध लवकर बंद केल्याने बालकाला दुधातून मिळणारे अ-जीवनसत्त्व मिळत नाही. त्यामुळेही डोळ्यावर असाच परिणाम होतॊ. राताांधळी झालेली व्यक्ती रात्रीच्यावेळी पाहू शकत नाही.

२. मेद पदार्थांचे पचन न झाल्यामुळे अ जीवनसत्त्व शरीरात जात नाही व त्यामुळे शरिरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते.

अ-जीवनसत्त्वाची रोजच्या आहारातील आवश्यक पातळी- ७००-९०० मायक्रोग्रॅम

अ जीवनसत्व कशात असते:-

'अ' जीवनसत्त्वाची कमतरता टाळण्यासाठी हिरव्या पालेभाज्या, (विशेषत: शेवग्याचा हिरवा पाला, पालक, मेथी, इत्यादी) रंगीत फळे (उदा. गाजरे, टोमॅटो,पपई, आंबा,भोपळा, इ.) व प्राण्यांचे मांस, यकृत, अंडी, मासे उपयोगी आहेत. या सर्व पदार्थांमध्ये'अ' जीवनसत्त्व भरपूर असते.
उत्तर लिहिले · 2/12/2019
कर्म · 5540
0

अ जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा (Night Blindness) हा रोग होतो. या रोगामध्ये व्यक्तीला अंधारात किंवा कमी प्रकाशात व्यवस्थित दिसत नाही.

अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे इतर काही त्रास:

  • त्वचा कोरडी पडणे
  • रोगप्रतिकारशक्ती कमी होणे
  • डोळ्यांना कोरडेपणा येणे
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1660

Related Questions

विटामिन अ च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?
मानसिक आजाराचे उपचार?
तीव्र मानसिक आजाराचे थोडक्यात विवेचन करा?
मायोपिया आजाराची लक्षणे आणि उपचार काय आहेत?
झोपेत चालण्याची सवय गंभीर आजार आहे?
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणारे शरीरावरील शारीरिक आजार कोणते?