शब्दाचा अर्थ

हितचिंतक म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

हितचिंतक म्हणजे काय?

11
हितचिंतक

अर्थ -
हित पाहणारा, चांगले पाहणारा, भले करण्यासाठी सल्ला देणारा.

व्याख्या -
-एखादी व्यक्ती संकटात असल्यास त्या व्यक्तीचं चांगलं व्हावं म्हणून त्याला उचित मार्गदर्शन करणे.
-हित म्हणजे भलं आणि चिंतक म्हणजे काळजी करणारा होय. चांगल्या गोष्टींसाठी चिंता वा चिंतन करणारा.

उदा. -
प्रिय मैत्रीण,
तुझ्या आयुष्याला नवीन वळण येणार आहे. तू खुप चांगली धावपटू खेळाडू आहेस. पण मागील तुझ्या प्रोग्रेसवर पाहता तुझं तुझ्या लक्ष्यावर फारफारतर दुर्लक्ष होत आहे, असे वाटत आहे. किंबहुना असे म्हणेन की स्पष्ट पणे जाणवत आहे. कदाचित तू प्रत्येक स्पर्धा जिंकली असल्याने यावेळेस तुझा आत्मविश्वास वेगाने वाढला आहे. तुझा आत्मविश्वास वेगाने वाढावा पण तो अतिआत्मविश्वास नसावा. यामुळे तुझ्या धावण्याच्या गतीवर दुष्परिणाम नक्कीच दिसून येईल. तीच जुनी स्पर्धा म्हणून खेळण्यापेक्षा दरवेळेस नवीन स्पर्धा तुला लाभली आहे म्हणून पुन्हा जोमाने सराव कर. कारण ७०-८० ची टायपिंग स्पीड असलेला व्यक्ती सुद्धा जेव्हा काही महिन्यांनी गॅप घेतो तेव्हा पूर्ववत त्याची स्पीड किमान ४०-५० स्पीड येऊ शकते. हाच उदाहरण घेऊन तुझे तसे होऊ नये म्हणून तुझ्या सरावात तुझ्याचमुळे अटकाव येऊ नये यासाठी तुला लिहिलेला हा अनाम पत्र..!
          तू समजून घेशील हेच खूप महत्त्वाचे असेल.
कारण चुकांतून काहीतरी शिकले जाते, चुकांची पुनरावृत्ती केली जात नाही..!
                                             तुझाच मित्र,
                                  तुझा
                                           हितचिंतक
उत्तर लिहिले · 29/11/2019
कर्म · 458560
0
हितचिंतक म्हणजे काय❓
उत्तर लिहिले · 18/7/2022
कर्म · 0
0

हितचिंतक म्हणजे असा व्यक्ती जो तुमची काळजी घेतो, तुमच्या चांगल्याची इच्छा करतो आणि तुम्हाला मदत करण्यास तयार असतो.

सोप्या भाषेत: हितचिंतक म्हणजे तुमचे भले चाहणारे.

  • ते तुमचे मित्र, कुटुंब सदस्य, सहकारी किंवा मार्गदर्शक असू शकतात.
  • ते तुम्हाला योग्य सल्ला देतात.
  • तुमच्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
  • तुमच्या चुका निदर्शनास आणून देतात.

इंग्रजीमध्ये: हितचिंतक म्हणजे well-wisher.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

उत्पादन म्हणजे काय ?
नियुक्ति म्हणजे काय?
भाववाढ ही संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा?
ज्ञान संपादनाची व्याख्या कोणती?
स्वयं अध्यायन म्हणजे काय?
ताम्रपट म्हणजे नेमके काय?
कथा म्हणजे काय ते सांगून कथेचे स्वरूप कसे स्पष्ट कराल?