एकक रूपांतर कृषी वजन आणि माप

किती पायली म्हणजे एक क्विंटल?

2 उत्तरे
2 answers

किती पायली म्हणजे एक क्विंटल?

16
धान्य मोजण्याची मापं :

दोन नेळवी = एक कोळवे

दोन कोळवी = एक चिपटे

दोन चिपटी = एक मापटे

दोन मापटी = एक शेर

दोन शेर = एक अडशिरी

दोन अडशिर्‍या = एक पायली

सोळा पायल्या = एक मण

वीस मण = एक खंडी

चार शेर= एक पायली

आठ पायली= एक कुडव

आठ कुडव= एक गिध

वीस कुडव= एक खंडी.

एक शेर म्हणजे जवळपास ८५० ग्रॅम. एक पायली म्हणजे ४.५ कीलोला थोडे कमी भरते.

यावरुन, सहज अंदाज काढता येईल,
धान्य मोजण्याची आमच्याकडे जी पायली असते ती जवळपास १ किलो धान्य मावेल अशा आकाराची असते.
आठ पायली = एक कुडव
वीस कुडव = एक खंडी

थोडसं अ‍ॅड करतो.
चार शेर= एक पायली
आठ पायली= एक कुडव
आठ कुडव= एक गिध
वीस कुडव= एक खंडी.

अर्थात, क्विंटलचा अंदाज काढण्यासाठी पायली नाही, तर कुडव किंवा खंडी अभ्यासात घ्या.



Rajini
उत्तर लिहिले · 25/10/2019
कर्म · 10670
0

पायली हे एक प्रमाणित माप नाही. त्यामुळे किती पायली म्हणजे एक क्विंटल हे निश्चितपणे सांगता येत नाही. ते धान्यावर अवलंबून असते.

उदाहरणार्थ:

  • जर आपण बाजरी घेतली, तर साधारणपणे एक पायली म्हणजे ४ ते ५ किलो असते. त्याअर्थी, 20 ते 25 पायली बाजरी म्हणजे एक क्विंटल होईल.
  • तांदूळ घेतला तर एक पायली म्हणजे ७ ते ८ किलो असू शकते, त्यामुळे 12 ते 14 पायली तांदूळ म्हणजे एक क्विंटल होईल.

म्हणूनच, धान्याच्या प्रकारानुसार पायलीचे वजन बदलते आणि त्यानुसार क्विंटलमध्ये रूपांतरण बदलते.

अचूक माहितीसाठी, तुम्ही ज्या धान्याचे रूपांतरण करू इच्छिता, त्याचे वजन प्रति पायलीनुसार तपासून घ्या आणि मग क्विंटलमध्ये रूपांतर करा.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5060

Related Questions

माझी एनजीओ (NGO) संस्था आहे, मला कृषी विभागात प्रशिक्षण घ्यायचे आहे, काय करावे?
सेंद्रिय खतावर आधारित उपक्रम?
सेंद्रिय खत महत्त्व लागणारे घटक बनवण्याच्या पद्धती उपक्रम?
सेंद्रिय खत प्रकल्प माहिती?
मसाला पिकांचे महत्त्व सांगून हळद या पिकाविषयी खालील मुद्द्यांवर माहिती लिहा.
बीज उत्पादन तंत्रज्ञान?
कृषी मीडिया पुरस्कार २०२५ कुणाला देतात?