जी एस टी कर अर्थशास्त्र

जीएसटी म्हणजे काय? त्याबद्दल मला जीएसटीची सर्व माहिती पाहिजे.

2 उत्तरे
2 answers

जीएसटी म्हणजे काय? त्याबद्दल मला जीएसटीची सर्व माहिती पाहिजे.

2
. जीएसटीएन नक्की काय आहे?गुड्स अॅण्ड टॅक्स नेटवर्क म्हणजे जीएसटीएन. ही एक बिगर सरकारी नॉन प्राॅफिट संस्था असेल.या संस्थेकडे जीएसटीचा सगळा डाटा असणार आहे. स्टॉकहोल्डर्स , टॅक्सपेयर्स आणि सरकार या तिघांनाही लागणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधा जीएसटीएन पुरवणार आहे.जीएसटीचे रजिस्ट्रेशन, टर्न फाईल करणे इत्यादी महत्त्वाची कामं जीएसटीएन करणार आहे.3. जीएसटीएनमध्ये कुणाचा किती वाटा ?जीएसटीएनमध्ये केंद्र सरकारचा 24.5 टक्के वाटा आहे तर राज्य सरकार आणि राज्यांच्या फायन्स कमिट्यांचा 24.5 टक्के वाटा असेल. ICICI आणि HDFC सारख्या बँकांचा 10-10 टक्के वाटा असेल तर एनएसई स्ट्रॅटेजिक इनव्हेस्टमेंट कंपनीचा 11 टक्के आणि एलआयसीचा 10 टक्के वाटा असेल.4.जीएसटीमुळे कुठले टॅक्स बंद होतील?सेंट्रल एक्साइज ड्युटी (केंद्रीय उत्पाद शुल्क), सर्व्हिस टॅक्स (सेवा कर), अॅडिशनल कस्टम ड्यूटी , स्पेशल अॅडिशनल ड्यूटी ऑफ कस्टम (एसएडी), व्हॅल्यू अॅडेड टॅक्स (VAT) सेल्स टॅक्स, सेंट्रल सेल्स टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्रॉय एंड एंट्री टॅक्स, परचेझ टॅक्स, लग्झरी टॅक्स कायमचे बंद होतील .या सगळ्यांच्या जागी एकच गुड्स अॅण्ड सर्व्हिसेस टॅक्स लागेल .5. जीएसटी लागू झाल्यावर किती टॅक्सेस भरावे लागतील ?जीएसटी लागू झाल्यावर फक्त तीन टॅक्सेस करदात्यांना भरावे लागणार1. सेंट्रल जीएसटी-हा कर केंद्र सरकार वसूल करेल.2.स्टेट जीएसटी -हा कर राज्य सरकारं त्यांच्या राज्यातील टॅक्स पेयर्सकडून वसूल करतील.3.इंटिग्रेटेड जीएसटी -दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल.
उत्तर लिहिले · 1/9/2019
कर्म · 2570
0
जीएसटी (वस्तू व सेवा कर) माहिती

जीएसटी (वस्तू व सेवा कर) म्हणजे काय?

जीएसटी म्हणजे वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax). हा एक अप्रत्यक्ष कर आहे जो वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर लावला जातो. हा कर केंद्र आणि राज्य सरकारद्वारे लादल्या जाणार्‍या अनेक अप्रत्यक्ष करांच्या जागी लागू करण्यात आला आहे.

जीएसटीची माहिती:

जीएसटीचे प्रकार:

  • CGST: केंद्र सरकारद्वारे लावला जाणारा कर (Central Goods and Services Tax).
  • SGST: राज्य सरकारद्वारे लावला जाणारा कर (State Goods and Services Tax).
  • IGST: आंतरराज्यीय व्यापारावर लावला जाणारा कर (Integrated Goods and Services Tax).
  • UTGST: केंद्रशासित प्रदेशांवर लावला जाणारा कर (Union Territory Goods and Services Tax).

जीएसटीचे फायदे:

  • करांची संख्या कमी झाल्यामुळे अनुपालन सुलभ झाले आहे.
  • संपूर्ण भारतात एकसमान कर प्रणाली लागू झाली आहे.
  • वस्तू व सेवांच्या किमती कमी झाल्या आहेत.
  • व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे.

जीएसटी नोंदणी:

एका विशिष्ट उलाढालीपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यवसायांना जीएसटीमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. जीएसटी नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करता येते.

जीएसटी दर:

जीएसटीचे दर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागलेले आहेत. आवश्यक वस्तूंवर कमी दर आणि चैनीच्या वस्तूंवर जास्त दर आकारले जातात.

जीएसटी नेटवर्क (GSTN):

जीएसटी नेटवर्क हे एक ऑनलाइन पोर्टल आहे, जे जीएसटी संबंधित सर्व सेवा प्रदान करते. यावर नोंदणी, कर भरणा आणि विवरणपत्रे (Returns) भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जीएसटी पोर्टल
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1820

Related Questions

शेत जमिनीच्या खंडाचे पैसे जाणूनबुजून बुडवणे?
बँकेचे व्याज किती मिळते?
D.AD म्हणजे काय?
एक लाख रुपये कशामध्ये गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल?
विश्वकर्मा योजनेच्या परीक्षेत्रात येणारे प्रश्न उत्तर कोणते व कशा प्रकारे विचारले जातात?
जल जीवन मिशनच्या इस्टिमेटनुसार कामे कशी असतात?
गाय, म्हैस, शेळी, बकरी जर खूप कमी झाले तर भारत देशाला फरक पडेल का?