औषधे आणि आरोग्य सौंदर्य घरगुती उपाय अलंकार आभूषणे

पावसाळ्यात दागिने काळे पडू नये, म्हणून काय काळजी घ्याल?

2 उत्तरे
2 answers

पावसाळ्यात दागिने काळे पडू नये, म्हणून काय काळजी घ्याल?

4
🤔 *पावसाळ्यात दागिने काळे पडू नये, म्हणून काय काळजी घ्याल?*



पावसाळ्यात वातावरणात असलेल्या गारव्यामुळे महिलांना दागिने काळे पडण्याची चिंता सतावत असते. तसेच खोटे दागिने पावसाळ्यात काळे पडतात, तर चांदीच्या दागिन्यांची चमक थोडी कमी होते. त्यामुळे दागिन्यांची कशी काळजी घेता येईल? यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहुयात...

*1.* चांदीचे दागिने काळे पडू नये म्हणून पाण्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा. त्यात दागिने थोडा वेळ ठेवा. थोड्या वेळात पाण्यातून दागिने बाहेर काढून ते साफ केल्यास दागिने पुन्हा चमकताना दिसतील.

*2.* खोटे दागिने कपड्यात गुंडाळून ठेवण्यापेक्षा ते कापसात गुंडाळून ठेवावे. यामुळे ते काळे पडत नाही.

*3.* जर तुम्ही ज्वेलरी बॉक्समध्ये तुमचे दागिने ठेवत असाल तर त्यात सिलिकाचे एक पॅकेट ठेवा. यामुळे दागिन्यांवर आलेला ओलावा निघून जातो आणि दागिने खराब होत नाही.

*4.* जर सिलिकाचे पॅकेट नसेल तर घरातील सूती कपड्यामध्ये तुम्ही दागिने ठेवू शकता. कारण सूती कपडा दागिन्यावरील ओलावर शोषून घेतो.

*5.* दागिने काळे पडत असतील तर त्यांना गरम पाण्यात टाकून साफ करा आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसा. मग थोडा वेळा त्या दागिन्यांना खुल्या हवेत सुकू द्या. त्यानंतर हे दागिने एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा.

*6.* वापरात नसलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या. ती काळ्या पडलेल्या दागिन्यांवर घासा. नंतर थंड पाण्याने धुवा. तुमचे दागिने नव्यासारखे चमकतील.
उत्तर लिहिले · 21/8/2019
कर्म · 569245
0
पावसाळ्यात दमट हवामानामुळे दागिने काळे पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खाली काही उपाय दिले आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या आवडत्या दागिन्यांची काळजी घेऊ शकता:
  • दागिने कोरडे ठेवा: पावसाळ्यात, शक्यतोवर दागिने पाण्यापासून दूर ठेवा. जर ते ओले झाले, तर मऊ কাপड्याने लगेच पुसून घ्या.
  • हवाबंद डब्यात ठेवा: दागिने हवाबंद डब्यात किंवा पाऊचमध्ये ठेवा. त्यामुळे ते दमट हवेच्या संपर्कात येणार नाहीत.
  • सिलिका जेलचा वापर करा: दागिन्यांच्या डब्यात सिलिका जेलच्या पुड्या ठेवा. सिलिका जेल हवामानातील ओलावा शोषून घेते आणि दागिने सुरक्षित ठेवते.
  • नियमित साफसफाई: आपले दागिने नियमितपणे सौम्य साबणाने आणि कोमट पाण्याने स्वच्छ करा.
  • पॉलीश कापड वापरा: सोन्या-चांदीच्या दागिन्यांसाठी खास पॉलिशिंग कापड वापरले जातात. त्याने दागिने नियमितपणे पुसावेत.
  • रासायनिक पदार्थांपासून दूर ठेवा: आपले दागिने परफ्यूम, हेअर स्प्रे आणि इतर रासायनिक पदार्थांपासून दूर ठेवा.
  • नैसर्गिक उपाय:
    • लिंबू आणि मीठ: लिंबाच्या रसामध्ये थोडे मीठ मिसळून त्याने दागिने हळूवारपणे घासा.
    • व्हिनेगर: पांढऱ्या व्हिनेगरमध्ये काही वेळ दागिने भिजवून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

हे काही सोपे उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही पावसाळ्यातही आपले दागिने सुरक्षित ठेवू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1680

Related Questions

आईचा दागिना कोणता?
बोटातील रिंगला अंगठी का म्हणतात?
मला चांदीची अंगठी होलसेलमध्ये हवी आहे, कोणी आहे का?
मला ज्वेलर्स व्यवसाय करण्यासाठी काय करावे लागेल आणि हा व्यवसाय कशा पद्धतीने करू?
मला ज्वेलरी दुकान टाकायचे आहे, तर मध्यम दुकानाला किती भांडवल लागते आणि कशा पद्धतीने धंदा करावा?
ज्वेल म्हणजे काय?