Topic icon

आभूषणे

1
आईचा खरा दागिना जो असतो तो म्हणजे संस्कार 
प्रत्येक आई मुलीला पहिला दागिना देत असते तो देताना हि संस्कार सांगत असते आणि प्रत्येक मुलीकडे कितीही दागिने जरी आले तरी आईच्या दागिन्याचा मोल शब्दात   करु शकत नाही कारण तोअ दागिना काहीही असु शकतं पैंजण किंवा पाटल्या किंवा गळ्यातील लक्ष्मी हार मग कोणताही दागिना असो  नंतर मिळाल्या दागिन्यात महत्त्वाचा आठवणीचा असतो. म्हणून खरचं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कितीही दागिने आले तरी पहिला दागिना तो पहिलाच असतो. त्यात आईच्या मायेची वीण असते. त्यामुळेच असे दागिने कायमस्वरूपी लक्षात राहातात.
पैंजण वरून हा लेख
दागिना #- आईने दिलेला पहिला दागिना ( माझ्या आठवणीतील पैंजण)

       प्रत्येक स्री च्या आयुष्यात जर महत्त्वाचे काही असेल तर ते म्हणजे सर्वप्रथम तिचे " कुटुंब " आणि दुसरे म्हणजे तिचे " दागिने ". त्यात ते दागिने कुणी जवळच्या व्यक्तीने दिले असतील तर त्याची किंमत कितीतरी पटीने वाढते. माझ्या आयुष्यात माझ्या आईकडून मिळालेला पहिला दागिना म्हणजे " पैंजण " आमचे मध्यमवर्गीय कुटुंब. तीन बहिणी आणि एक भाऊ ; आई वडील आणि आजी असा आमचा परिवार. आई वडील शेतीच्या जीवावरच घराची धुरा सांभाळत होते. आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. पण आई वडिलांनी आम्हाला काही कमी पडू दिलं नाही. आम्ही पण त्यांना शेतीच्या कामात मदत करायचो. आमच्याकडे लहानपणी एक नियम होता; जर आम्ही भाऊ बहिणीनी मिळून दिलेले एखादे शेतीचे काम पूर्ण केले की आम्हाला काहितरी भेटणार हे ठरलेले असायचे. मग त्यात खाण्यापिण्याच्या वस्तू असायच्या. उदा. भेळ, पेढे आणि गोडी शेव. आमच्या गावापासून साधारणत: ५ किमी अंतरावरील दुसऱ्या गावी नेहमी गुरुवारचा बाजार भरत असे. दर गुरुवारी वडील आम्हाला तेथून भेळ आणि गोडी शेव आणायचे. पेढे आणायचे पण कधीतरी. त्यावेळी त्या गावात एक भेळ खूप प्रसिद्ध होती. " फकिरची भेळ " फकीरभाई नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने भेळीचे दुकान टाकले होते. अल्पावधीतच त्याचा मोठा ग्राहक वर्ग तयार झाला. त्या व्यक्तीला सर्व जण " फकीरमामा" म्हणू लागले. त्यांची भेळ मात्र " फकीरची भेळ" म्हणून प्रसिद्ध झाली.

       पंचक्रोशीत त्याचा ग्राहक वर्ग पसरला होता त्यातील माझे वडील एक होते. शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आम्ही आई वडिलांसोबत शेतीत काम करायचो. एक दिवस आम्ही शेतात वडील नांगरणी करत होते आम्ही त्यांच्या मागे वेचणीचे काम करत होतो. दुपारी जेवणासाठी बसलेलो असताना आम्ही वडिलांना म्हणालो आता आम्हाला या बदल्यात काय मिळणार. भाऊ म्हणाला फकीरची भेळ आणि गोडी शेव. पण मी म्हणाले त्या शिवाय दुसरं काहीच आणत नाहीत तुम्ही. वडील म्हणाले तुम्हाला काय पाहिजे मग??मी उत्तरले पैंजण..... भाऊ म्हणाला काही नका आणू पप्पा. उद्या काहीही मागतील ह्या. आधी काम करून घ्या मग घाला पैंजण. त्याचं एक ठरलेलं वाक्य असायचं. "नाचायला जायचय का पैंजण घालून.?" मी त्यावेळी ४ थी ला असेल. मी सर्वात लहान. त्यामुळे २-२ वर्गाने सगळे माझ्या पुढे होते. वडील म्हणाले घेवू पण सगळं काम उरकलं पाहिजे आजच. मी लहान होते त्यामुळे परिस्थितीचे मला काही एवढे माहिती नव्हते. पण मागितले की वडीलांनी कधी दिलं नाही असं झालं नाही. आम्ही तिघी बहिणी असल्यामुळे कोणा एकीला पैंजण घेउन चालणार नव्हते. आणि तिघिंना एकाच वेळी पैंजण करणं शक्य नव्हतं. पण त्या दोघींपेक्षा माझाच जास्त हट्ट होता. कारण शालेत कुणाच्या पायात पैंजण पाहिलं की मलाही वाटायचं माझ्याही पायात असे पैंजण असावे. पैंजणचे मला खूप आकर्षण वाटायचे.
Advertisement

Powered By PLAYSTREAM
        वडील तर हो म्हणाले होते पण त्यांना ते लगेच शक्य नव्हतं हे आईला माहित होतं. आणि करायचे तर तिघींना पण करायचे असं आईचं म्हणणं होतं. मग आईने त्यावर एक तोडगा काढला. माझ्या आजीचे जुन्या काळचे ६ गोठ होते. ते आईकडेच होते ठेवायला. ते मोडून आम्हाला पैंजण करायचं ठरवलं. आईने तसे आजीला विचारले. आजीने पण ना नाही केली. मग गुरुवारच्या दिवशी बाजारात जाऊन आईने ते गोठ मोडून आम्हा तिघींना पैंजण केले. आम्ही तिच्या येण्याची वाटच पाहात होतो. पैंजण येणार त्या खुशीत आम्ही दिवसभर न थकता खुप सारी कामे केली. अखेर आई जेव्हा घरी आली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेना. कारण आमच्या आयुष्यातील तो पहिलाच दागिना होता. आईने ते पैंजण आमच्या तिघींच्या पण पायात घातले. नवीन नवीन आम्हाला तर त्या पैंजण ने वेडच लावले होते. कोणाचे पैंजण जास्त वाजतात यासाठी आमची स्पर्धा लागायची. खरचं हा आमच्यासाठी असा एक दागिना होता जो आमच्या आयुष्यभर लक्षात राहाणार होता. आजही त्याच्या आठवणी आम्ही जपून ठेवल्यात.
           खरचं प्रत्येकाच्या आयुष्यात असे कितीही दागिने आले तरी पहिला दागिना तो पहिलाच असतो. त्यात आईच्या मायेची वीण असते. त्यामुळेच असे दागिने कायमस्वरूपी लक्षात राहातात.
       
उत्तर लिहिले · 12/4/2022
कर्म · 121765
0

बोटातील रिंगला अंगठी का म्हणतात याबद्दल काही माहिती:

व्युत्पत्ती: 'अंगुष्ठ' या संस्कृत शब्दावरून 'अंगठी' हा शब्द तयार झाला आहे. 'अंगुष्ठ' म्हणजे 'अंगठा'. पूर्वी अंगठी बहुधा अंगठ्यात घातली जाई, त्यामुळे याला 'अंगठी' असे नाव पडले.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1680
0

होय, मला तुमच्या प्रश्नाची जाणीव आहे. तुम्हाला चांदीची अंगठी होलसेलमध्ये (Thok price) हवी आहे आणि त्याबद्दल माहिती विचारत आहात. मी तुम्हाला काही पर्याय देऊ शकेन:

  • मुंबई: मुंबईमध्ये जव्हेरी बाजार हे एक मोठे ठिकाण आहे जिथे तुम्हाला चांदीच्या वस्तूंचे मोठे व्यापारी मिळतील. तिथे तुम्हाला होलसेल भावात चांदीच्या अंगठ्या मिळू शकतात.
  • जयपुर: जयपुर हे शहर देखील चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. तिथे अनेक उत्पादक आणि व्यापारी आहेत जे होलसेल दरात चांदीच्या वस्तू विकतात.
  • ऑनलाइन वेबसाइट्स: अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत जिथे तुम्हाला होलसेलमध्ये चांदीच्या अंगठ्या मिळू शकतात. उदा. इंडिया मार्ट (https://www.indiamart.com/).

तुम्ही तुमच्या सोयीनुसार या ठिकाणांना भेट देऊन अधिक माहिती मिळवू शकता.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1680
1
एखाद्या चांगल्या ज्वेलर्सकडून सल्ला घ्या.
उत्तर लिहिले · 22/3/2021
कर्म · 4575
0
नमस्कार! ज्वेलरी दुकान (Jewellery Shop) सुरु करण्यासाठी मध्यम स्तरावर किती भांडवल लागेल आणि व्यवसाय कसा करावा याबद्दल माहिती खालीलप्रमाणे: भांडवल (Investment): ज्वेलरी दुकान सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल अनेक गोष्टींवर अवलंबून असते, जसे की दुकानाचे आकारमान, ठिकाण, तुम्ही कोणत्या प्रकारची ज्वेलरी विकणार आहात (सोने, चांदी, हिरे, आर्टिफिशियल) आणि तुमच्या इतर गरजा. अंदाजे भांडवल खालीलप्रमाणे असू शकते: * दुकानSetup खर्च:₹2 लाख ते ₹5 लाख (इंटिरियर, काउंटर, डिस्प्ले, सुरक्षा उपकरणे). * स्टॉक (Stock):₹5 लाख ते ₹15 लाख (सोनं, चांदी, हिरे, इतर). * इतर खर्च:₹50,000 ते ₹1 लाख (परवाना, विमा, जाहिरात). व्यवसाय कसा करावा (How to Start Business): 1. व्यवसाय योजना (Business Plan): * व्यवसाय योजना तयार करा. त्यात तुमच्या व्यवसायाचा उद्देश, लक्ष्यित ग्राहक, बाजारातील संधी आणि आर्थिक अंदाज लिहा. * तुमच्या competitors चा अभ्यास करा. 2. जागा (Location): * Bagalane bagalane madhe dukaan शुरू kelyaas, ग्राहक सहजपणे उपलब्ध होतील. 3. गुंतवणूक आणि आर्थिक व्यवस्थापन (Investment and Financial Planning): * तुमच्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल निश्चित करा. * कर्ज (Loan) घेण्यासाठी बँकांशी संपर्क साधा. 4. स्टॉक (Stock): * सुरुवातीला कमी स्टॉक ठेवा. मागणी वाढल्यावर स्टॉक वाढवा. * चांगल्या आणि विश्वासू पुरवठादारांकडून (suppliers) माल खरेदी करा. 5. मार्केटिंग (Marketing): * तुमच्या दुकानाची जाहिरात करा. स्थानिक वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आणि leaflets चा वापर करा. * Opening offer आणि discounts द्या. 6. ग्राहक सेवा (Customer Service): * ग्राहकांशी चांगले संबंध ठेवा. * ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करा. 7. तंत्रज्ञानाचा वापर (Use of Technology): * Stock आणि accounts व्यवस्थापनासाठी software वापरा. * Online payment सुविधा उपलब्ध करा. 8. कायदेशीर प्रक्रिया (Legal Process): * आवश्यक परवाने (license) आणि नोंदणी (registration) करा. * GST नोंदणी (GST Registration) करा. टीप: तुमच्या शहरातील ज्वेलरी मार्केटचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1680
4
🤔 *पावसाळ्यात दागिने काळे पडू नये, म्हणून काय काळजी घ्याल?*



पावसाळ्यात वातावरणात असलेल्या गारव्यामुळे महिलांना दागिने काळे पडण्याची चिंता सतावत असते. तसेच खोटे दागिने पावसाळ्यात काळे पडतात, तर चांदीच्या दागिन्यांची चमक थोडी कमी होते. त्यामुळे दागिन्यांची कशी काळजी घेता येईल? यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहुयात...

*1.* चांदीचे दागिने काळे पडू नये म्हणून पाण्यात एक मोठा चमचा बेकिंग सोडा घालावा. त्यात दागिने थोडा वेळ ठेवा. थोड्या वेळात पाण्यातून दागिने बाहेर काढून ते साफ केल्यास दागिने पुन्हा चमकताना दिसतील.

*2.* खोटे दागिने कपड्यात गुंडाळून ठेवण्यापेक्षा ते कापसात गुंडाळून ठेवावे. यामुळे ते काळे पडत नाही.

*3.* जर तुम्ही ज्वेलरी बॉक्समध्ये तुमचे दागिने ठेवत असाल तर त्यात सिलिकाचे एक पॅकेट ठेवा. यामुळे दागिन्यांवर आलेला ओलावा निघून जातो आणि दागिने खराब होत नाही.

*4.* जर सिलिकाचे पॅकेट नसेल तर घरातील सूती कपड्यामध्ये तुम्ही दागिने ठेवू शकता. कारण सूती कपडा दागिन्यावरील ओलावर शोषून घेतो.

*5.* दागिने काळे पडत असतील तर त्यांना गरम पाण्यात टाकून साफ करा आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसा. मग थोडा वेळा त्या दागिन्यांना खुल्या हवेत सुकू द्या. त्यानंतर हे दागिने एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवा.

*6.* वापरात नसलेल्या टूथब्रशवर टूथपेस्ट घ्या. ती काळ्या पडलेल्या दागिन्यांवर घासा. नंतर थंड पाण्याने धुवा. तुमचे दागिने नव्यासारखे चमकतील.
उत्तर लिहिले · 21/8/2019
कर्म · 569245
0

ज्वेल म्हणजे मौल्यवान धातू, जसे सोने, चांदी किंवा प्लॅटिनम, आणि मौल्यवान खडे वापरून बनवलेले अलंकार किंवा आभूषण. यांचा उपयोग सौंदर्य वाढवण्यासाठी केला जातो.

ज्वेलचे काही प्रकार:

  • अंगठी: बोटात घालायचा दागिना.
  • हार: गळ्यात घालायचा दागिना.
  • बाळी: कानात घालायचा दागिना.
  • कंगन: हातात घालायचा दागिना.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1680