दिनविशेष दिनदर्शिका सामाजिक वृद्धत्व

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो?

2 उत्तरे
2 answers

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो?

3
👴🏻 *जेष्ठत्वाकडे वाटचाल करताना...*

🔰📶 *MAHA DIGI । CINIOR CITIZEN DAY*

दरवर्षी 21 ऑगस्ट हा दिवस जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. जेष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वाचा घटक आहेत आणि त्यांची काळजी किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा यांकडे आपले लक्ष असणे खूप महत्वाचे आहे.

📌 'वृद्धत्व अतिशय कठीण!' असे उद्गार आपण अनेकदा ऐकतो आणि त्यावर वृद्धांच्या मानसिकतेला गृहीत धरतो. परंतु आपण एक गोष्ट बऱ्याचदा पाहतो ती म्हणजे काही जेष्ठ मंडळी त्यांच्याहून वयाने लहान किंवा पुढील पिढीतील मंडळींसोबत मिळून मिसळून राहण्याचा खूप प्रयत्न करतात. त्यांच्या अंतरंगात दु:ख नसतं असं नसतं.

💁‍♀ मात्र ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीप्रमाणे ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार आणि कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. मुळात ज्येष्ठ नागरिकांनी नव्या पिढीकडे मोकळाढाकळा दृष्टिकोन ठेवून पाहिल्यास आणि तरुणांनीही त्यांना समजून घेतल्यास समस्यांची तीव्रताही कमी होईल.

▪ ज्येष्ठांचे देखील तीन प्रकार असतात. साधारण 58 ते 65 वयोगट, 65 ते 75 वयोगट आणि 75 आणि त्यापुढील वयोगट अशा तीन प्रकारांत ज्येष्ठांची विभागणी होते.

👉 आर्थिक सुबत्ता, वैज्ञानिक संशोधन, आधुनिक उपचार पद्धती यामुळे वयोमर्यादा वाढली आहे, त्यामुळे समाजात ज्येष्ठ नागरिकांची संख्यादेखील वाढली आहे. पण वाढत्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्यांनाही जन्म दिला आहे.

🧐 या समस्यांचेही अनेक पैलू आहेत. आर्थिक, सामाजिक, शारीरिक आणि मानसिक अशा स्वरूपाच्या या समस्या असतात. वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात. शारीरिक व्याधींसाठी वैद्यकीय उपचारांची गरज असते. पण बाकी समस्यांसाठी समुपदेशन प्रभावी ठरू शकते.

🎯 1 ते 25 वर्ष ब्रह्मचर्य, 25 ते 50 वर्ष गृहस्थाश्रम, 50 ते 75 वर्ष वानप्रस्थाश्रम त्यानंतर 75 ते 100 वयात संन्यास अशा या स्थिती आहेत. बहुतांश ज्येष्ठ नागरिक वानप्रस्थाश्रमाच्या पुढे गेलेले असतात, पण त्यांची जीवनासक्ती संपलेली नसते. खाणं, पिणं, कपडालत्ता, दागदागिने, प्रवास, लग्न, मुंज, सणवार अशा सर्व गोष्टींत त्यांचा उत्साह टिकून असतो. मग असे ज्येष्ठ मनोमन स्वत:ची तरुण पिढीशी तुलना करतात. बरोबरी करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होतो.

ℹ आपल्याला आवडणारे उद्योग, छंद त्यांनी जोपासायचा प्रयत्न करावा. यातून त्यांचा उत्साह आणि स्वभावातील समाधान जागृत राहील.

👴🏻 _*ज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाच्या महत्वपूर्ण योजना!*_


एक ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन' म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठांचेदेखील तीन प्रकार असतात. साधारण ५८ ते ६५ वयोगट, ६५ ते ७५ वयोगट आणि ७५ आणि त्यापुढील वयोगट अशा तीन प्रकारांत ज्येष्ठांची विभागणी होते.

📣 *शासनाने सुरु केलेल्या योजना* :

केंद्र शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आई-वडील, ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007 पारित केला आहे. हा अधिनियम महाराष्ट्रात 1 मार्च, 2009 पासून लागू करण्यात आला आहे.

🔹 *वृद्धाश्रम योजना* : 
राज्य शासनाने 20 फेब्रुवारी 1963 अन्वये वृद्धाश्रम ही योजना सुरु केलेली आहे. ही वृद्धाश्रमे स्वयंसेवी संस्थांमार्फत अनुदान तत्त्वावर चालविली जातात. आतापर्यंत शासन मान्यताप्राप्त 32 वृद्धाश्रमे अनुदान तत्वावर सुरू आहेत. या वृद्धाश्रमामध्ये निराधार, निराश्रित व गरजू ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो. वृद्धाश्रमामध्ये प्रवेशितांना निवास, अंथरुण-पांघरुण, भोजन, वैद्यकीय सुविधा, मनोरंजनाच्या सोयी मोफत पुरविण्यात येतात. वृद्धाश्रमामध्ये 60 वर्षे वयावरील पुरुष व 55 वर्षे वयावरील स्त्रियांना मोफत प्रवेश देण्यात येतो. गरजू ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व संबंधित संस्था यांच्याकडे संपर्क साधावा.

🔹 *मातोश्री वृद्धाश्रम योजना* :
वृद्धाश्रम योजनेबरोबरच ज्येष्ठ नागरिकांना वृद्धाश्रमामध्ये काही अधिकच्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात, (उदा. बाग-बगीचा, वाचनालय, दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहण्यासाठी सुविधा, बैठे खेळ इत्यादी,) म्हणून सर्व सोयींनी युक्त असे मातोश्री वृद्धाश्रम ही योजना शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने शासन 17 नोव्हेंबर, 1995 रोजी स्वयंसेवी संस्थांमार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शासनाने 31 जिल्ह्यांमध्ये 5 एकर जागेवर सुसज्ज मातोश्री वृद्धाश्रम बांधलेले असून हे वृद्धाश्रम स्वयंसेवी संस्थामार्फत विनाअनुदान तत्त्वावर सुरु करण्यात आले आहेत.

🔹 *संजय गांधी निराधार योजना* :
या योजनेंतर्गत निराधार, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला, घटस्फोटीत महिला यांच्याबरोबर निराधार व आर्थिकदृष्ट्या मागास वृद्ध नागरिकांनाही लाभ देण्यात येतो. त्यांना प्रती महिना ६०० रूपये देण्यात येतात.

🔹 *श्रावणबाळ योजना* : 
या योजनेंतर्गत 65 वर्षावरील स्त्री आणि पुरुष ज्येष्ठ नागरिक यांना लाभ देण्यात येतो. योजनेंतर्गत राज्य शासनाचे रुपये 400 व केंद्र शासनाचे 200 असे एकूण 600 इतके अर्थसहाय्य प्रतिमहा देण्यात येते. ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येते.

🔹 *इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना* :
या योजनेंतर्गत ६५ वर्षांवरील दारिद्र्यरेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येतो. योजनेंतर्गत राज्य शासनाचे रुपये 400 व केंद्र शासनाचे 200 असे एकूण 600 इतके अर्थसहाय्य प्रतिमहा निवृत्तीवेतन म्हणून देण्यात येते. ही योजना संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राबविण्यात येते.

⚖️ *कायद्यांतर्गत महत्वाच्या तरतुदी* :

▪️ कायद्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च देण्याची तरतूद आहे.

▪️ पाल्य म्हणजे ज्येष्ट नागरिक यांच्या रक्त नात्यासंबंधातील मुले/मुली यामध्ये मुलगा, मुलगी, नातू-नात यांचा समावेश होतो.

▪️ कलम ४(१) प्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक स्वत:ताचा चरितार्थ चालवू शकत नाहीत, अशा व्यक्तींना चरितार्थासाठी त्यांच्या पाल्यांकडून निर्वाह खर्च मिळण्यासाठी कलम ५ प्रमाणे अर्ज दाखल करता येतो.

▪️ कलम ७ प्रमाणे निर्वाह भत्यासाठी प्राप्त तक्रारीनुसार अर्जावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्याच्या प्रत्येक उपविभागासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे.

▪️ कलम ८ प्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जावर ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणाकडे सुनावणी घेऊन निर्णय घेण्यात येतो.

▪️ अधिनियमातील कलम १२ प्रमाणे न्यायाधिकरणाच्या आदेशाविरूद्ध संबंधितांना अपिल दाखल करता येईल. जिल्हाधिकारी हे अपिलीय प्राधिकारी असतील.

▪️ कलम १८(१) प्रमाणे संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त समाजकल्याण यांना निर्वाह अधिकारी म्हणून गोषित करण्यात आलेले आहेत.

▪️ या कायद्यांतर्गत ज्येष्ठांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यांना तीन महिन्यांचा तुरूंगवास, पाच हजार रूपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे.

▪️ प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करणे, त्यांच्या सुखसोयींची काळजी घेणे कायद्याने बंधनकारक आहे. त्यांना वृद्धाश्रमात पाठवू नका, त्यांचा सांभाळ करा. अशा कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहेत.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy
उत्तर लिहिले · 21/8/2019
कर्म · 569245
0

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी २१ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

हा दिवस ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि कल्याणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने (United Nations) १९९० मध्ये याची सुरुवात केली.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2680

Related Questions

कोणत्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे वृद्धांना एकाकी रहावे लागते?
वृद्धांची संख्या वाढण्याची कारणे कोणती?
वयस्कर लोकांनी काय आहार घ्यावा?
७० वयाची लोकं कमजोर होतात पण धडपड जास्त का करतात?
वृद्धांच्या प्रमुख समस्या लिहा?
वैद्यकीय दृष्ट्या मनुष्य म्हातारा होतो म्हणजे काय होतं?
वैद्यकीय दृष्ट्या माणूस म्हातारा होता म्हणजे काय?