विनोद मानसशास्त्र भावनिक कल्याण

मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व काय आहे?

2 उत्तरे
2 answers

मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व काय आहे?

1
हास्य' ही माणसाची सहजप्रवृत्ति आहे. म्हणूनच तर मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

पूर्वी राजे-महाराजांच्या काळात राजदरबारी विदूषकाची नेमणूक करत असे. नित्याच्या कामकाजातून राजाची व दरबाराची करमणूक व्हावी, हे त्यामागचे कारण असे. विनोदाने घटकाभर का होईना, पण दु:खाचा विसर पडतो आणि त्या दु:खातून बाहेर येण्याचा मार्ग सुसह्य होतो.

मानवी जीवनातील विनोद हा बरेचदा शब्दांच्या, अर्थांच्या, प्रसंगांच्या अथवा कल्पनेच्या चमत्कृतीपूर्ण वापरामुळे होतो. मानवी जीवनातील अनेक तन्हेच्या विसंगती हे विनोदाचे  उगमस्थान आहे.


मराठी साहित्यातील विनोदी लेखनाचे दालन अनेक मान्यवर विनोदी लेखकांनी समृद्ध केलेले आहे. चि. वि. जोशी (चिमणरावांचे चन्हाट), प्र. के. अत्रे (झेंडूची फुले), पु. ल. देशपांडे (व्यक्ती आणि वल्ली), द. मा. मिरासदार (माझ्या बापाची पेंड), श्रीपाद कृष्ण कोल्हटकर (सुदाम्याचे पोहे), राम गणेश गडकरी (संपूर्ण बाळकराम) अशी बरीच नामावली आपणास सापडते. या सर्वांच्या लेखनातून व्यक्त होणारा विनोद वेगवेगळ्या प्रकारातील असला, तरी त्यामागे हेतू हाच की माणसाला त्याच्या आयुष्यातील चार सुखाचे क्षण या विरंगुळ्यातून मिळावेत. बरेचदा लोक आपल्या आयुष्यातील दु:खाचा विसर पडून क्षणभर दैनंदिन ताण-तणावांतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून विनोदी साहित्य अगदी आवडीने वाचतात. यामुळे आपण थोडे अंतर्मुख होऊन आत्मपरिक्षण करण्यास प्रवृत्त होतो.

यापूर्वीचेही जर संत वाड्मय आपण पाहिले, तर त्यातसुद्धा विनोदाला अनन्य साधारण महत्त्व दिलेले दिसते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संत एकनाथ लिखित `मला दादला नको ग बाई....' सारखी समाज प्रबोधनपर विनोदी अंगाने जाणारी `भारूड' ही काव्य रचना. या रचनेत केवळ हसवणे, मनोरंजन करणे हेच विनोदाचे उाद्दिष्ट मर्यादीत न राहता त्यातून लोकजागृतीही घडताना दिसते.
.विनोदामुळे जीवनाला प्रवाहीपणा येऊन जीवनाचा आनंद खन्या अर्थाने खेळकरपणाने उपभोगण्याची लज्जत वाढते, म्हणूनच `विनोद' हे जीवनाचे महत्त्वाचे अंग आहे, तर `हसा आाणि लठ्ठ व्हा' हा सुखी जीवनाचा मंत्र आहे.
0

मानवी जीवनात विनोदाचे महत्त्व अनेक दृष्टीने आहे:

  • तणाव कमी करणे: विनोद तणाव आणि चिंता कमी करण्यास मदत करतो. हसल्याने शरीरातील कोर्टिसोल (तणाव हार्मोन) कमी होते आणि एंडोर्फिन वाढतात, ज्यामुळे आराम मिळतो.
  • संबंध सुधारणे: विनोद लोकांना एकत्र आणतो. एकत्रितपणे हसणे सामाजिक बंध मजबूत करते आणि संबंध सुधारते.
  • सकारात्मक दृष्टिकोन: विनोद आपल्याला जीवनातील समस्या आणि अडचणींकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करतो.
  • सर्जनशीलता वाढवणे: विनोद बुद्धीला चालना देतो आणि सर्जनशील विचार करण्यास मदत करतो.
  • शारीरिक आरोग्य: हास्य रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि वेदना कमी करते.
  • संवाद सुधारणे: विनोद संभाषण अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवतो.

थोडक्यात, विनोद आपल्या जीवनात आनंद, सकारात्मकता आणि आरोग्य वाढवतो.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे गाव सोडावे अशी भावना कधीकधी येते का?
मी खूप मोठी चूक केली आहे, काय करू आता?
माझं एका मुलीवर प्रेम आहे, तिला कसं विसरू?
मी ज्या मुलीसोबत प्रेमसंबंधात होतो, तिचे लग्न झाले आहे. मला खूप दुःख वाटत आहे, मी काय करू?
आपल्या काही भावनात्मक अडचणी आहेत का?
माझ्या एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत, पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत. काय करावे? बोलावे की नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे, काय करावे? कृपया उपाय सांगा.
माझं एका मुलीवर प्रेम होतं, तिने होकार दिला. एका महिन्यात ती म्हणाली, 'तू स्वार्थी आहेस'. मी तिच्याकडून काही घेतलंही नाही. तिने मला शिव्या दिल्या, खूप सारे पैसे पण घेतले आहेत. मी काय पाऊल उचलू? खूप मानसिक त्रास दिला आहे, अजून पण होत आहे. माझ्या feelings चा बाजार केला आहे?