संबंध प्रेम भावनिक कल्याण

माझं एका मुलीवर प्रेम होतं, तिने होकार दिला. एका महिन्यात ती म्हणाली, 'तू स्वार्थी आहेस'. मी तिच्याकडून काही घेतलंही नाही. तिने मला शिव्या दिल्या, खूप सारे पैसे पण घेतले आहेत. मी काय पाऊल उचलू? खूप मानसिक त्रास दिला आहे, अजून पण होत आहे. माझ्या feelings चा बाजार केला आहे?

4 उत्तरे
4 answers

माझं एका मुलीवर प्रेम होतं, तिने होकार दिला. एका महिन्यात ती म्हणाली, 'तू स्वार्थी आहेस'. मी तिच्याकडून काही घेतलंही नाही. तिने मला शिव्या दिल्या, खूप सारे पैसे पण घेतले आहेत. मी काय पाऊल उचलू? खूप मानसिक त्रास दिला आहे, अजून पण होत आहे. माझ्या feelings चा बाजार केला आहे?

5
तुमचं वय काय?
जर, तुम्ही १८ ते २२ वर्षांचे असाल तर आधी तुम्ही तुमच्या भविष्याकडे लक्ष दिले पाहिजे, म्हणजे करिअर आणि शिक्षणाकडे, मुलगी मुलांवर प्रेम करते पण का करते फक्त मुलांना फसवण्यासाठी.
आधी काळ वेगळा होता, मुलांना लवकर मुलगी मिळायची पण आता काळ बदलला आता मुलींकडचे सर्व बघतात.
उदा. शिक्षण, पर्सनॅलीटी, नोकरी इतर...
कॉलेजमध्ये तर आज मी बघतो ६०% मुले मुलींच्या मागे फिरतात वगैरे वगैरे...
मुली हे कोणाच्या झाल्या नाहीत आणि होणारही नाही.
कारण ते फक्त मुलांना सौंदर्यानं अडकवून फसवतात.
माझं असं मत आहे की, डीप्रेशन मध्ये जावू नये कारण ज्या मुलीने तुम्हाला फसवले आहे तिला शाळा शिकून धडा शिकवीला पाहिजे पण कसा तर आधी आपण शिकलो पाहिजे, शिक्षण घेतले पाहिजे (नाहीतर , कॉलेजमध्ये जायचं आणि मुलींकडे बघायचं आणि आपलं शिक्षण वाया गमवायचं आणि ते मुली शिकतात आणि मोठ्या पदावर जातात आणि मोठ्या नोकरीवाल्याशी लग्न करतात) म्हणून तुम्ही शिका आणि मोठ्या पदावर जा तुम्ही मुलींच्या मागे नाही तर मुली तुमच्या मागे फिरणार...
उत्तर लिहिले · 28/11/2022
कर्म · 235
4
कदाचित तुम्ही तिच्याकडे उधारी परत मागितली असेल, म्हणून ती तुम्हाला स्वार्थी म्हणाली असेल.
थोडे दिवस तुम्ही धीर धरा, थोडा तपास करा, कुणी दुसरा तिच्या आयुष्यात आलाय का ते तपासून पहा. जर तसे असेल तर तिने तुम्हाला तुमची जागा दाखवली आहे हे तुमच्या मनाला समजावून सांगा.
थोडा त्रास होईल, पण खचून जाऊ नका. काही दिवस लोटले की आपोआप दुःख दूर होईल. 🙏🏻
उत्तर लिहिले · 11/9/2022
कर्म · 61495
0
तुमच्या भावनांची मी कदर करतो आणि या परिस्थितीत तुम्ही एकटे नाही आहात. सर्वप्रथम, शांत राहण्याचा प्रयत्न करा. भावनिक आणि आर्थिक फसवणूक झाली आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही कायदेशीर आणि भावनिक उपाययोजना तुम्ही करू शकता:

1. कायदेशीर सल्ला (Legal Advice):

  • वकिलाचा सल्ला घ्या: तुमच्या शहरातील एखाद्या चांगल्या वकिलाचा सल्ला घ्या. त्यांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगतील.

  • पोलिसात तक्रार: जर तिने तुमच्याकडून जबरदस्तीने पैसे घेतले असतील, तर तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करू शकता. पुरावा म्हणून तुमच्या बँकेचे स्टेटमेंट (Bank statement) आणि इतर कागदपत्रे सादर करा.

2. भावनिक आधार (Emotional Support):

  • कुटुंब आणि मित्र: आपल्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांशी मनमोकळी चर्चा करा. त्यांच्याकडून तुम्हाला भावनिक आधार मिळेल.

  • समुपदेशक (Counselor): एखाद्या चांगल्या समुपदेशकाची मदत घ्या. ते तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गदर्शन करू शकतील.

3. स्वतःची काळजी घ्या (Self-Care):

  • नकारात्मक विचार टाळा: नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका. सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा.

  • नवीन छंद (Hobbies): स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी नवीन छंद शोधा. जसे की व्यायाम करणे, चित्रकला, संगीत किंवा वाचन.

  • वेळेचं व्यवस्थापन: आपल्या दिवसाचं नियोजन करा आणि नियमित कामं करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

4. सायबर क्राइम (Cyber Crime):

  • सायबर सेलमध्ये तक्रार: जर तुम्हाला सोशल मीडियावर त्रास दिला जात असेल, तर तुम्ही सायबर सेलमध्ये तक्रार करू शकता.

    cybercrime.gov.in

5. काय करू नये (What not to do):

  • प्रतिकार टाळा: तिला प्रत्युत्तर देणे किंवा तिच्याशी वाद घालणे टाळा. यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते.

  • सोशल मीडियावर चर्चा नको: सोशल मीडियावर याबद्दल काहीही पोस्ट करू नका, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात त्रास होऊ शकतो.

तुम्ही एकटे नाही आहात आणि लवकरच यातून बाहेर पडाल.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

आर्थिक आणि मानसिक त्रासामुळे गाव सोडावे अशी भावना कधीकधी येते का?
मी खूप मोठी चूक केली आहे, काय करू आता?
माझं एका मुलीवर प्रेम आहे, तिला कसं विसरू?
मी ज्या मुलीसोबत प्रेमसंबंधात होतो, तिचे लग्न झाले आहे. मला खूप दुःख वाटत आहे, मी काय करू?
आपल्या काही भावनात्मक अडचणी आहेत का?
माझ्या एका जवळच्या मित्राबरोबर भांडण झाले आहे (चूक त्याचीच आहे असे बाकीचे मोठी माणसे म्हणतात) व माझे बाकीचे सर्व मित्र पण त्याच्याच बाजूने आहेत, पहिल्यासारखे माझ्याबरोबर बोलत नाहीत. काय करावे? बोलावे की नको? पण मला या गोष्टीमुळे खूप नैराश्य आले आहे, काय करावे? कृपया उपाय सांगा.
चकवा बसणे' हा काय प्रकार आहे?