गुगल भिकारी शोध इंजिन तंत्रज्ञान

गुगलवर भिकारी सर्च केल्यावर इम्रान खान यांचा फोटो का दिसतो?

2 उत्तरे
2 answers

गुगलवर भिकारी सर्च केल्यावर इम्रान खान यांचा फोटो का दिसतो?

9


​🧟‍♀ 🇵🇰 ****Google वर भिकारी टाईप केल्यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा फोटो****

▪जर तुम्ही गुगल सर्च इंजिनवर भिकारी सर्च केले, तर त्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो दिसेल. गुगल इमेजमध्ये दिसत असलेल्या या फोटोमध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन बसलेले दिसत आहेत. .
▪हा एडिट केलेला फोटो सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
▪पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. यामधून बाहेर येण्यासाठी पंतप्रधान इमरान खान अनेक देशांकडून कर्ज घेण्यासाठी दौरे करत आहेत. याच पार्श्वभूमीवर हा फोटो एडिट करण्यात आला आहे.
🔍 _गुगलवर भिकारी सर्च केल्यावर इमरान खान याचा फोटो का दिसतो?_
▪दरम्यान, गुगल सर्च इंजिन अशा प्रकारे तयार करण्यात आलं आहे की, जेव्हा कोणता एक शब्द अनेकदा टाईप करुन शोधला जातो. तेव्हा सर्च इंजिन त्या की वर्डचा समावेश लोकप्रिय श्रेणीमध्ये करतो.
▪गुगलच्या सर्चमध्ये इडियट टाईप केल्यावर सर्वात वरती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येतो. कारण अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांना इडियट म्हणून सर्च केलं आहे.
-----------------
*🙄Googleवर 'भिकारी' सर्च केल्यानंतर दिसतोय पाक पंतप्रधान इमरान खान यांचा फोटो*

💁‍♂सर्च इंजिन गुगलवर 'भिकारी' हा शब्द सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan)यांचा फोटो दिसत आहे. गुगल दाखवत असलेल्या फोटोंमध्ये इमरान खान हातात वाडगं घेऊन भीक मागताना दिसत आहेत. पण हे फोटो खरे नसून एडिट केलेले आहेत. इमरान खान यांच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आली असून यामध्ये त्यांना रस्त्यावर भीक मागताना दाखवलं गेलंय.

⚡पाकिस्तान सध्या भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. हीच परिस्थिती दाखवण्यासाठी इमरान खान यांच्या फोटोसोबत छेडछाड करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय, आर्थिक संकटातून देशाला बाहेर पडण्यासाठी इमरान खान जगातील कित्येक देशांकडून कर्ज घेण्यासाठी दौरेदेखील करत आहेत.

_गुगलवर ‘भिकारी’ असं सर्च केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोटो येत आहे. गुगलवर दिसत असलेल्या फोटोमध्ये इम्रान खान यांची दाढी वाढलेली दिसत असून हातात वाडगं घेऊन भीक मागताना दिसत आहेत. इम्रान खान यांच्या फोटोशी छेडछाड केली असून त्यांना गुगलवर ट्रोल केलं जात आहे._
*📍सोशल मीडियावर फोटो व्हायरल*  
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोवरून नेटिझन्सकडून पाकिस्तान आणि इमरान खान यांची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.


*_📣अल्गोरिदम सोबत छेडछाड_*
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. त्यावर मात करण्यासाठी इम्रान खान यांनी अनेक देशांकडे मदत मागितली आहे. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दाखवण्यासाठी इम्रान खान यांच्या फोटोशी छेडछाड केल्याचे म्हटले जात आहे.पाकिस्तान मधील नेटकऱ्यांनी या घटनेमागे भारतीय नेटकरी असल्याचे म्हटले आहे. एखाद्या व्यक्तीने गुगल अल्गोरिदम किंवा गूगल बॉम्बिंगशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला असणार आहे.

*_🤔गुगलचे सर्च इंजिन अल्गोरिदम असे काम करते_*
आपण जेव्हा या सर्च इंजिनमध्ये एखादा शब्द टाइप करतो त्याच वेळेस ही संगणक प्रणाली किमान १०० कोटी वा कमाल कितीही अशा शब्दांच्या समूहांना २०० निकषांची चाळणी लावतो. हे दोनशे घटक असतात संदर्भ, लोकप्रियता, कालसापेक्षता, सदर शब्द आधी कोणाकोणाच्या संदर्भात वापरला गेलाय.. वगैरे अनेक. त्यांतनं चाळण लागून मग काही पर्याय समोर येतात. ते जवळपास अचूक असतात. कारण इतके शब्द आणि त्यांच्या छाननीचे निकष याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं.

उत्तर लिहिले · 18/8/2019
कर्म · 569245
0
मला माफ करा, पण तुमच्या प्रश्नाची वस्तुस्थिती तपासणे माझ्यासाठी शक्य नाही. काही विशिष्ट कारणांमुळे, काही सर्च इंजिन (search engine) विशिष्ट व्यक्तींचे किंवा गोष्टींचे निकाल त्यांच्याशी संबंधित नसलेल्या शब्दांसाठी दर्शवू शकतात. हे अल्गोरिदम (algorithm) आणि डेटा (data) यांच्या गुंतागुंतीच्या आंतरक्रियेमुळे होऊ शकते. मी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती देऊ शकत नाही.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1440

Related Questions

गुगल कोणत्या देशातला आहे?
माहिती मिळवण्याची साधने कोणती?
माहिती मिळवण्यासाठी आणि प्रदान करण्यासाठी कोणती साधने आहेत?
सर्व प्रश्नांची उत्तरे गुगलला कशी मिळतात?
गुगलवर नॅशनल कॅश कशी ठरवली जाते?
विरगळचा संदर्भ कसा शोधतात?
गुगलवर सर्वात जास्त सर्च केलेला २०१८ मधील शब्द कोणता?