मनोरंजन संगीतकार पुरस्कार चित्रपट संगीत

ऑस्कर पुरस्कार कोणत्या संगीतकाराला मिळाला?

2 उत्तरे
2 answers

ऑस्कर पुरस्कार कोणत्या संगीतकाराला मिळाला?

0
‘रंगीला’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘रंगीला’नंतर ‘बॉम्बे’, ‘दिल से’, ‘ताल’, ‘तहजीब’, ‘स्वदेस’, ‘रंग दे बसंती’, ‘जोधा अकबर’, ‘गजनी’, ‘तहजीब’, ‘स्लमडॉग मिलिनियर’ अशा अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले. विशेष म्हणजे, या चित्रपटांमध्ये असलेली त्यांची सर्व गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. देशाच्या ५०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांनी तयार केलेला ‘वंदे मातरम्’ अल्बमही प्रचंड लोकप्रिय झाला. ए. आर. रहमान यांनी प्रभुदेवा आणि शोभनासोबत तामिळ चित्रपटातील डान्सर्सचा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपने मायकल जॅक्सनसोबत स्टेज शोमध्ये भाग घेतला होता.
 
 
रहमानच्या हिंदी गाण्यांचा वापर हॉलिवूडमध्येही करण्यात आला आहे. त्यांचे संगीत असलेले ‘छैया-छैया’ गाणे हॉलिवूडच्या ‘इनसाइड मॅन’ चित्रपटात वापरण्यात आले होते, तर ‘बॉम्बे’ चित्रपटातील म्युझिक ट्रॅक ‘डिव्हाईन इंटरव्हेंशन’ चित्रपटात वापरण्यात आले होते. २०१३ मध्ये कॅनडातील ओंटोरियो शहरातील एका रस्त्याला ए. आर. रहमानचे नाव देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘मेझॉन’ने जगातील सर्वोत्कृष्ट १०० म्युझिक अल्बमची यादी तयार केली. या यादीत ए. आर. रहमान यांनी संगीत दिलेल्या ‘लगान’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे.


दोन ‘ऑस्कर’ मिळवणारे ए. आर. रहमान ही पहिले आशियाई कलाकार आहेत. २००९ मध्ये ‘स्लमडॉग मिलिनिअर’ चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्यासाठी त्यांना ‘बेस्ट ओरिजिनल स्कोर’ आणि ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ या श्रेणीत ऑस्कर देण्यात आला. ‘गोल्डन ग्लोब’ या प्रतिष्ठित पुरस्कार आपले नाव कोरणारे ते पहिले भारतीय आहेत. या शिवाय २५ ‘फिल्म फेअर पुरस्कार’, ४ राष्ट्रीय पुरस्कार, २ ‘ग्रॅमी’ आणि अकादमी पुरस्कारांसह ‘पद्मश्री’(२०००), ‘पद्म विभूषण’(२०१०)ने त्यांना गौरवण्यात आले आहे. आपल्या संगीताने जगभरात भारताची शान उंचावणार्‍या या ‘संगीत सम्राटा’ला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा मानाचा सलाम!
उत्तर लिहिले · 1/2/2023
कर्म · 9415
0

ए. आर. रहमान यांना 'स्लमडॉग मिलेनियर' (Slumdog Millionaire) या चित्रपटातील "जय हो" (Jai Ho) गाण्यासाठी 2009 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1180

Related Questions

स्व. लता मंगेशकर यांनी कोणत्या चित्रपटांना संगीत दिले?
"इंदू" सिनेमाचे मराठी गाणे कोणते आहेत?
राज कपूरच्या पिक्चर मधली प्रेरणादायक गाणी ऐकायला मिळतील का?
शहीद भगतसिंग या चित्रपटातील गाणी कोणत्या गायकांनी गायली?
चित्रपटातील गाणी चोरून वापरतात का?
लता मंगेशकर यांनी कोणत्या चित्रपटात पहिल्यांदा गीत म्हटले?
१९७० पासून आत्तापर्यंतची बॉलीवूडमधील MP3 गाणी मला वर्षानुसार डाउनलोड करायची आहेत. कुठून करू शकतो?