मनोरंजन गाणे चित्रपट चित्रपट संगीत

चित्रपटातील गाणी चोरून वापरतात का?

2 उत्तरे
2 answers

चित्रपटातील गाणी चोरून वापरतात का?

4


⭕ ही गाणी  🎼 चक्क चोरलेली आहेत ⭕
____________________________

🌠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠
____________________________
*_दि. २२ एप्रिल २०२०_*
🎼तुम्हाला जर समजले की, तुमचे आवडते गाणे हे दुसरीकडून चोरलेले आहेत, तर तुम्हाला कसे वाटेल ? नक्कीच वाईट वाटेल यात शंका नाही. मग आज आपण अश्याच चोरलेल्या गाण्यांविषयी जाणून घेणार आहोत.
*🎼 मुझे निंद न आये…*
१९९० मधील आमीर खान आणि माधुरी दिक्षित यांच्या दिल या चित्रपटामधील हे गाणे लोकांना खूप आवडले होते. पण तुम्हाला माहित आहे, हे गाणे युकेमधील चनी सिंग यांच्या बँडमधीलचुन्नी उड उड जायेया गाण्यामधून घेतलेले आहे.
*🎼हरे राम हरे राम…*
२००७ मध्ये आलेला अक्षय कुमारचा भूलभुलैया हा चित्रपट खूपच मनोरंजक होता. हॉरर कॉमेडीने रचलेल्या या चित्रपटामधील हरे राम हरे राम हे गाणे दक्षिण कोरिया डान्स म्युझिक ग्रुप जीटीएल यांच्यामाय लेकॉन या गाण्यामधून घेतले आहे.           
╔══╗
║██║      _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - _
https://m.facebook.com/story.php?story_fbid=491799917884603&id=100011637976439
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🎼 ऐ दिल लाया है बाहार…*
२००० मध्ये प्रीती झिंटा हिचा ‘क्या कहना’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटामध्ये जेव्हा प्रिती झिंटा घरी परत येते, तेव्हा हे गाणे आहे. हे गाणे ५० च्या दशकातीलनील सेदाका यांच्याओ कॅरोलया गाण्यामधून घेतले गेले आहे.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
*🎼 खल्लास*
२०१६ मध्ये आलेला वीरप्पन हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता.या चित्रपटामधील झरीन खानचं खल्लास हे गाणं इशा कोप्पीकरच्या खल्लास गाण्याशी मिळते जुळते घेतले आहे. पण हे गाणे डिलॉन फ्रान्सिस आणि डिजे स्नेक यांच्यागेट लोया गाण्यामधून घेतले आहे..
*🎼प्यार तो होना ही था…*
१९९८ मध्ये आलेला प्यार तो होना ही था हा चित्रपट हॉलीवूड चित्रपटफ्रेंच किसचा रिमेक आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण आणि काजोल यांनी काम केले होते. त्यामध्ये रोमांटिक कॉमेडी दाखवण्यात आली होती. या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकच्या सुरवातीचे संगीत हे ब्रायन अॅडमच्याhave you ever really loved a womanया गाण्याच्या संगीताशी तंतोतंत जुळते.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
*🎼दिल चीझ तुझे दे दी…*
२०१६ मध्ये अक्षय कुमारचा एअरलिफ्ट हा चित्रपट आला होता. कुवेतमधून भारतीय लोकांना सुखरूप सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न यामध्ये दाखवलेले आहे. हाचित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. लोकांना वाटते की, हे गाणे मिल्क आणि हनी यांच्या दीदी या गाण्यावरून घेतले आहे. पण खरेतर हे गाणे १९९२ मधीलदीदीया गाण्यापासून घेतले आहे, जे नायजेरीन कलाकार छेब खलीफ याने बनवले होते.
*🎼दिलने दिल को पुकारा…*
२००० मध्ये ॠतिक रोशन आणि अमिषा पटेल यांचा ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आला होता. राकेश रोशन यांनी दिग्दर्शित केलेला आणि राजेश रोशन हे संगीतकार असलेल्या या चित्रपटामध्ये हे गाणे होते. या गाण्याच्या सुरवातीला एक संगीत आहे, जे द वॉइसेसच्यावेन्जेलीसया गाण्यामधून घेतले आहे
*🎼 बुलेया…*
२०१६ मध्ये आलेल्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या ‘ए दिल है मुश्कील’ या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. अनुष्काचे लग्न झाल्यानंतर जेव्हा रणबीर कपूर मनात दुःख घेऊन परततो आणि त्याची ऐश्वर्या शी भेट होते. त्यानंतर बुलेया हे गाणे आहे. काही लोकांना वाटते की, हे गाणे पापा रोचच्या लास्ट रेसॉर्टमधून घेतले आहे. पण खरेतर हे गाणे आयर्न मेडन याच्यागेंगीस खानया संगीतामधील आहे.
*🎼 नशे सी चढ गई…*
२०१६ मध्ये आलेल्या रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या ‘बेफिक्रे’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे रिलीज झाल्यावर यूट्यूबवर खूप गाजले होते. पण चित्रपट एवढा काही प्रेक्षकांना आवडला नाही. ‘नशे सी चढ गई’ हे गाणे एका कार्टूनमधीलjunjou romantica track १च्या संगीतामधून घेतले आहे
*🎼. पहली नजर मैं…*
२००८ मध्ये आलेल्या सैफ आली खानच्या ‘रेस’ या चित्रपटामध्ये हे गाणे आहे. त्यावेळी अतिफ अस्लमने गायलेले हे गाणे खूप चर्चेत होते. हे गाणे कोरियन कलाकार किम ह्युंगच्या  sarang haeyo या गाण्यामधून घेतले आहे.काय मग, ह्याला अशीही फसवाफसवी म्हणायचं का?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇_*      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
https://m.facebook.com/story.php?story_fbid=491799917884603&id=100011637976439

0

चित्रपटातील गाणी चोरून वापरणे हा कायद्याने गुन्हा आहे.

भारतीय कॉपीराइट कायदा १९५७ नुसार, कोणत्याही गाण्याचे अधिकार (कॉपीराइट) हे त्याचे संगीतकार, गीतकार आणि निर्मात्याकडे असतात. त्यांच्या परवानगीशिवाय गाणे वापरणे हा कायद्याचे उल्लंघन आहे.

असे केल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि आर्थिक दंड भरावा लागू शकतो.

या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1180

Related Questions

स्व. लता मंगेशकर यांनी कोणत्या चित्रपटांना संगीत दिले?
"इंदू" सिनेमाचे मराठी गाणे कोणते आहेत?
राज कपूरच्या पिक्चर मधली प्रेरणादायक गाणी ऐकायला मिळतील का?
शहीद भगतसिंग या चित्रपटातील गाणी कोणत्या गायकांनी गायली?
ऑस्कर पुरस्कार कोणत्या संगीतकाराला मिळाला?
लता मंगेशकर यांनी कोणत्या चित्रपटात पहिल्यांदा गीत म्हटले?
१९७० पासून आत्तापर्यंतची बॉलीवूडमधील MP3 गाणी मला वर्षानुसार डाउनलोड करायची आहेत. कुठून करू शकतो?