क्रीडा शब्दाचा अर्थ दिनविशेष बुद्धिबळ

जागतिक बुद्धिबळ दिन म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

जागतिक बुद्धिबळ दिन म्हणजे काय?

1
♟ *चेकमेट....!🤔 *जागतिक बुद्धिबळ दिन म्हणजे काय*
20 जुलै
👉🏻 FIDE ( World Chess Federation) म्हणजे ‘वर्ल्ड चेस ऑर्गनायझेशन’ या आंतरराष्ट्रीय संस्थेचा जन्मदिवस 20 जुलै हा ‘जागतिक बुद्धिबळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. FIDE च्या जन्माआधी अनेक वर्षांपासून बुद्धिबळ खेळला जात आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे बुद्धिबळाचा जन्म भारतातच झाला होता. चतुरंग हे बुद्धिबळाचंच प्राथमिक रूप.

😍 मित्रांनो इतके वर्ष होऊनही हा खेळ आजही जगभर खेळला जातो. या खेळाला असलेलं महत्वं किंचितही कमी झालेलं नाही.

🤗 बुद्धिबळ हा दोन खेळाडूंनी एका तक्त्यासारख्या पटाच्या दोन्ही बाजूला बसून खेळावयाचा बैठा खेळ आहे. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जाणारे बुद्धिबळ हे पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते.

🤓 बुद्धिबळ सध्या जगातील सर्वांत प्रसिद्ध बैठ्या खेळांपैकी एक आहे. जगभरात अदमासे ६० कोटी हौशी किंवा व्यावसायिक लोक क्लब्जमध्ये, पत्राने, आंतरजालावर व विविध स्पर्धांमधून बुद्धिबळ खेळतात. बुद्धिबळात कला आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला दिसतो.

📍स्पर्धात्मक बुद्धिबळाची परंपरा १६ व्या शतकात युरोपमध्ये सुरू झाली. इ.स. १८८६ साली विल्हेल्म स्टेइनिट्झ हा पहिला अधिकृत बुद्धिबळ विश्वविजेता झाला. *विश्वनाथन आनंद* हा भारतीय खेळाडू २०१२सालापर्यंत जगज्जेता होता. बुद्धिबळाच्या सांघिक स्पर्धा "बुद्धिबळ ऑलिंपियाड" दर दोन वर्षांतून एकदा भरवल्या जातात. दोन आंतरराष्ट्रीय संघटना-- फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स (फिडे) आणि इंटरनॅशनल करस्पाँडन्स चेस फेडेरेशन या जगातील महत्त्वाच्या स्पर्धा भरवतात.
उत्तर लिहिले · 23/7/2019
कर्म · 569245
0

जागतिक बुद्धिबळ दिन दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो.

हा दिवस 1924 मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाच्या (FIDE) स्थापनेची आठवण म्हणून साजरा केला जातो.

युनेस्कोने (UNESCO) हा दिवस जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून घोषित केला आहे.

हा दिवस जगभरात बुद्धिबळ खेळणाऱ्या लोकांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आणि या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी अनेक ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन केले जाते.

बुद्धिबळ हा एक मनोरंजक खेळ आहे जो आपल्या बुद्धीला चालना देतो.

अधिक माहितीसाठी: News18

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2480

Related Questions

तुमच्या शाळेतील खो-खो खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.?
खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ कोठे आयोजित केले होते?
विटीचे माप किती असते?
ग्रामीण खेळ कोणते त्यांची नावे लिहून थोडक्यात माहिती लिहा?
जागतिक पत्त्यातील चार हुकुमती प्रकार कोणते?
क्रिकेट या खेळाला मराठी मध्ये काय म्हणतात?
कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?