औषधे आणि आरोग्य सौंदर्य घरगुती उपाय त्वचेचे विकार त्वचा निगा आरोग्य

चेहऱ्यावर काळे वांग आहेत तर ते जाण्यासाठी काय केले पाहिजे?

2 उत्तरे
2 answers

चेहऱ्यावर काळे वांग आहेत तर ते जाण्यासाठी काय केले पाहिजे?

0
⭕ चेहरयावरील वांग व उपचार ⭕
   
  आधुनिक विज्ञानानुसार मेलेस्मा ( वांग ) हा आजार मेलेनोसाइटस यांचा अधिक प्रमाणाने होतो . स्त्रियांच्यात अधिक आढळणारा हा आजार घडवण्यात ‘इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन ‘ या संप्रेरकांचा वाटा असतो . तसेच ‘थायरोइड ‘ या आजारात मेलेस्मा वाढल्याचे दिसून येते इत्यादी!!आयुर्वेदानुसार क्रोध आणि परिश्रम याने प्रकुपित झालेला वायू हा पित्तसह मुखात येउन तोंडावर वेदना रहित , पातळ , काळसर असे डाग उत्पन्न करतो . त्याला ‘वांग ‘ असे म्हणतात .हा आजार एका दिवसात होत नाही . अनेक काळ वात आणि पित्ताचा प्रकोप करणारे हेतू सेवन करत राहिल्याने हे दोष बिघडतात आणिवांगाची उत्पत्ती होते .  
  मग हे दोष फक्त मुखातच जातात का ??  
  नाही . .  
  काही वेळा हे दोष संपूर्ण शरीरात पसरून वेदना रहित आणि काळे असे डाग (आयुर्वेदोक्त शब्द मंडल ) उत्पन्न करतात याला ‘निलिका ‘ असे नाव आहे .  
  ☙आयुर्वेदानुसार यावर करता येण्या सारखे सोपे उपाय :☙-  
  १. मंजिष्ठा मधात वाटून त्याचा लेप वांगावर करावा .२. जायफळाचा लेप लावावा .३. मसूर दुधात वाटून त्यात तूप मिसळून त्याचा लेप लावावा . आयुर्वेद सांगतो , असा लेप लावल्याने चेहेरा ७ दिवसात कमळाप्रमाणे सुंदर होतो .४. रक्तचंदन , लोध्र आणि कोष्ठ यांचा लेप लावावा . इत्यादी !!सदर उपाय हे केवळ लेप स्वरूपाचे आहेत . वास्तविक ‘वांग ‘ यासाठी रक्त मोक्षण , विरेचन इत्यादी पंचकर्मातील उपचार तसेच पित्त शामक , वात शामक , रक्त दुष्टी दूर करणारे , रक्त प्रसादान करणारे असे अभ्यंतर औषध उपचार आवश्यक असतात .केवळ लेप देण्याचे कारण असे की ,वांग घालवणारी क्रीम ही ‘मेलेनीन ‘वर काम करणारी असतात .  

  आपल्या सौंदर्यासाठी चेहेऱ्यावर रासायनिक क्रीम चोपडून त्याच्या साईड इफेक्ट निस्तरण्या साठी अजून एक क्रीमबाळगणे फारसे व्यावहारिक नाही. त्यामुळे हे आयुर्वेदिक लेप फायद्याचे ठरतात .हे लेप लावत असताना किंवा वांगावर उपचार घेत असताना डोकंआणि मन शांत ठेवणे फार महत्वाचे आहे . . . ‘रागाने ‘ अनेक गोष्टी बिघडतात . . . . वांग हा त्यातलाच एक उपद्रव !!(टीप – मेलेस्मा = वांग हे दोन्हीतील काही समान लक्षण असल्याने लिहिले आहे . आधुनिक विज्ञान व आयुर्वेद यांच्यात हेतू , संप्राप्ती व चिकित्सा यात मुलभूत फरक आहेत . पण बिगर आयुर्वेदिक लोकांना पांडू म्हंटल की समजत नाही पण ‘एनिमिया ‘ म्हंटले की ओळखीचा शब्द वाटतो . त्यामुळे येथे केलेली तुलना ही विषय स्पष्ट करायला तात्कालिक स्वरुपात केली आहे )  
  वैद्य . अंकुर रविकांत देशपांडेआयुर्वेद कोश  
 
0

चेहऱ्यावरील काळे वांग (Melasma) कमी करण्यासाठी काही उपाय:

1. सनस्क्रीन (Sunscreen):

  • दररोज SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेले सनस्क्रीन लावा. घराबाहेर पडण्यापूर्वी 20-30 मिनिटे अगोदर लावा. FDA Sunscreen guidelines

  • प्रत्येक दोन तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावा, खासकरून जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तर.

2. टॉपिकल क्रीम्स (Topical Creams):

  • त्वचा रोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खालील क्रीम्स वापरू शकता:
    - हायड्रोक्विनोन (Hydroquinone): हे मेलेनिनचे उत्पादन कमी करते.
    - ट्रेटीनोइन (Tretinoin): हे त्वचेच्या पेशींची वाढ सुधारते.
    - कोजिक ऍसिड (Kojic Acid): हे देखील मेलेनिन उत्पादन कमी करते. Kojic Acid benefits

3. केमिकल पील्स (Chemical Peels):

  • ग्लायकोलिक ऍसिड (Glycolic acid) किंवा सॅलिसिलिक ऍसिड (Salicylic acid) असलेले केमिकल पील्स वापरल्याने त्वचेवरील काळे वांग कमी होऊ शकतात. Chemical peels information

4. लेझर ट्रीटमेंट (Laser Treatment):

  • काही लेझर उपचार जसे की क्यू-स्विच्ड एनडी:वायएजी (Q-switched Nd:YAG) लेझर मेलास्मा कमी करू शकतात. Laser treatment research

5. नैसर्गिक उपाय (Natural Remedies):

  • एलोवेरा (Aloe vera), लिंबू (Lemon juice), मध (Honey) आणि हळद (Turmeric) यांचा वापर काही प्रमाणात फायदेशीर ठरू शकतो.

  • हे उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी त्वचा रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

Glycolic acid, arbutin & kojic acid Diplamate Cream चे फायदे आणि नुकसान काय आहेत?
Glycolic acid, arbutin & kojic acid Diplamate Cream चे फायदे काय आहेत?
हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी काय करावे?
माझा रंग काळा आहे आणि माझ्या चेहऱ्यावर खूप डाग पण आहेत. माझा काळा रंग असल्यामुळे मला माझ्यामध्ये खूप कमीपणा वाटतो, तर त्यासाठी मी काय करू जेणेकरून माझा रंग उजळेल?
बॉडी वॉशचे फायदे?
व्हिटॅमिन सी सिरमचे फायदे काय आहेत?
माझा रंग काळा आहे आणि मी चेहऱ्यावर काही लावत नाही, तरी पण चेहरा काळवंडलेला असतो, तर त्यासाठी काही उपाय सांगा ज्याने माझा रंग उजळेल?