युग धर्म इतिहास

कलियुग आणखी किती वर्षे आहे?

2 उत्तरे
2 answers

कलियुग आणखी किती वर्षे आहे?

5
हिंदूंच्या स्मृतिपुराणादी ग्रंथांमध्ये कालगणनेसाठी ‘युग’ या कल्पनेचा वापर केलेला दिसून येतो. त्यात कृत, त्रेता, द्वापर आणि कली या क्रमाने चार युगांची चार नावे दिलेली आहेत. युग या शब्दाचा अर्थ ‘अनेक सहस्रावधी वर्षांचा दीर्घ काळ’ असा असून या चार युगांतील काळाचे परस्पर प्रमाण ४:३:२:१ असे आहे. (४+३+२+१=१०). ही चार युगे मिळून एक ‘चतुर्युग’ किंवा ‘देवयुग’ बनते, ज्यात ४३ लाख २० हजार एवढी मानवी वर्षे असतात. म्हणजे एका कलियुगात, चतुर्युगाच्या एक दशांश म्हणजे ४ लाख ३२ हजार वर्षे असतात; द्वापर युगात त्याच्या दुप्पट, त्रेता युगात तिप्पट आणि कृत किंवा सत्य युगात त्याच्या चौपट मानवी वर्षे असतात.

कलियुगातही ४ लाख ३२ हजार वर्षे आहेत असे व याच्या अगोदरचे द्वापर युग संपून व सध्याचे कलियुग सुरू होऊन सुमारे फक्त पाच हजार वर्षेच झालेली आहेत असे मानले जाते. म्हणजे सध्या चालू असलेले कलियुग संपायला आता (फक्त ?) ४ लाख २७ हजार वर्षे उरलेली आहेत व त्यानंतर पुढचे कृतयुग सुरू होईल.
उत्तर लिहिले · 11/7/2019
कर्म · 5510
0

कलियुगाचा काळ ४,३२,००० वर्षे आहे, ज्यामध्ये आतापर्यंत ५,१२५ वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा अर्थ कलियुग अजून ४,२६,८७५ वर्षे बाकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5060

Related Questions

कलियुग संपल्यावर कोणते युग येईल?
अठ्ठावीस युगे म्हणजे किती? आता कोणते युग सुरू आहे? एक युग म्हणजे किती वर्ष?