Topic icon

युग

2
नियमानुसार सत्ययुग येणार. कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार म्हणून भगवान अवतार धारण करणार.
उत्तर लिहिले · 7/10/2021
कर्म · 44255
5
हिंदूंच्या स्मृतिपुराणादी ग्रंथांमध्ये कालगणनेसाठी ‘युग’ या कल्पनेचा वापर केलेला दिसून येतो. त्यात कृत, त्रेता, द्वापर आणि कली या क्रमाने चार युगांची चार नावे दिलेली आहेत. युग या शब्दाचा अर्थ ‘अनेक सहस्रावधी वर्षांचा दीर्घ काळ’ असा असून या चार युगांतील काळाचे परस्पर प्रमाण ४:३:२:१ असे आहे. (४+३+२+१=१०). ही चार युगे मिळून एक ‘चतुर्युग’ किंवा ‘देवयुग’ बनते, ज्यात ४३ लाख २० हजार एवढी मानवी वर्षे असतात. म्हणजे एका कलियुगात, चतुर्युगाच्या एक दशांश म्हणजे ४ लाख ३२ हजार वर्षे असतात; द्वापर युगात त्याच्या दुप्पट, त्रेता युगात तिप्पट आणि कृत किंवा सत्य युगात त्याच्या चौपट मानवी वर्षे असतात.

कलियुगातही ४ लाख ३२ हजार वर्षे आहेत असे व याच्या अगोदरचे द्वापर युग संपून व सध्याचे कलियुग सुरू होऊन सुमारे फक्त पाच हजार वर्षेच झालेली आहेत असे मानले जाते. म्हणजे सध्या चालू असलेले कलियुग संपायला आता (फक्त ?) ४ लाख २७ हजार वर्षे उरलेली आहेत व त्यानंतर पुढचे कृतयुग सुरू होईल.
उत्तर लिहिले · 11/7/2019
कर्म · 5510
0

तुमच्या प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे:

अठ्ठावीस युगे म्हणजे किती:

अठ्ठावीस युगे म्हणजे एक मन्वंतर.

आता कोणते युग सुरू आहे:

आता कलियुग सुरू आहे.

एक युग म्हणजे किती वर्ष:

हिंदू धर्मानुसार, युगांची विभागणी खालीलप्रमाणे आहे:

  • सत्ययुग: १७,२८,००० वर्षे
  • त्रेतायुग: १२,९६,००० वर्षे
  • द्वापरयुग: ८,६४,००० वर्षे
  • कलियुग: ४,३२,००० वर्षे

टीप: ही आकडेवारी वेगवेगळ्या स्त्रोतांमध्ये थोडीफार वेगळी असू शकते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1240