भूगोल झाडे वने

महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे वने आढळतात?

2 उत्तरे
2 answers

महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे वने आढळतात?

4
वन म्हणजे त्या प्रदेशात /जमिनीवर नैसर्गिकरित्या ,हजारोवर्षे,वर्षानुवर्षे वाढणारी/टिकून राहिलेली झाडेझुडपे,वृक्ष,वनस्पती,वेली इत्यादी व त्यामुळे निर्माण झालेली पर्यावरण संस्था.यानुसार महाराष्ट्रातील वनांचे  सर्वसाधारणपणे प्रकार(Champion & Seth classification नुसार) पुढीलप्रमाणे
  1. दक्षिण उष्ण कटिबंधीय सदाहरित वने south tropical evergreen forests - राज्याच्या पश्चिमेकडील जंगले.  किंजल,हिरडा,आंबा,अजनी, कारवी, शिकेकाई इ.वनस्पती
   2. उष्णकटिबंधीय समशीतोष्ण रुंदपर्णी पर्वतीय वने tropical semievergreen broad leaves  forests -   राज्याच्या पश्चिमेकडील पर्वतरांगांच्या माथ्यावरील वने.  अजनी,जांभूळ,कुंभा, आवळा इ.
    3. दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळीची दमट वने.south tropical moist deciduous forests   राज्याच्या मेळघाट,विदर्भ,ठाणे भागातील आर्थिक दृष्ट्या मौल्यवान वने.  साग,ऐन,शिसम,बीजा, सेमल, हळदू,मोहा इ.
     4. दक्षिण उष्णकटिबंधीय पानगळीची शुष्क वने. south tropical dry deciduous forests  महाराष्ट्राचे खूप मोठे वनक्षेत्र या प्रकारात मोडते. सागवानी,मिश्र- सागवानी वृक्षप्रजाती ,खैर,शिवण,धावडा इ.
     5 . दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वने. south tropical thorny forests . राज्याच्या कमी पर्जन्यमानाच्या भागातील जंगले. प्रमुख वनस्पती बाभुळ,बोर,पळस, हिंगनबेट इ.
     6. सागरी किनारी व भरती ओहोटीची,दलदलीची वने. seashore , mangroves forests. समुद्र किनारे,खाड्या व दलदलीच्या प्रदेशातील वने. रायझोफोरा,मेनग्रोव्ह,कांदळवने इ.
उत्तर लिहिले · 11/7/2019
कर्म · 4010
0
महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची वने आढळतात, ज्यामध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित वने, उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने, उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने, काटेरी वने आणि खारफुटी वने यांचा समावेश होतो.

महाराष्ट्रामध्ये आढळणाऱ्या वनांचे प्रकार:

  • उष्णकटिबंधीय सदाहरित वने: हे सह्याद्री पर्वताच्या पश्चिम भागात आढळतात, जिथे भरपूर पाऊस पडतो. या वनांमध्ये उंच आणि घनदाट झाडे असतात.

  • उष्णकटिबंधीय अर्ध-सदाहरित वने: ही वने सदाहरित वनांच्या तुलनेत कमी घनदाट असतात आणि त्या भागात आढळतात जिथे पाऊस थोडा कमी असतो.

  • उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने: या वनांमध्ये पाऊस ठराविक प्रमाणात असतो आणि झाडे विशिष्ट ऋतूमध्ये पाने गळवतात.

  • उष्णकटिबंधीय कोरडी पानझडी वने: ही वने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये आढळतात, जिथे पाऊस कमी असतो. येथील झाडे दुष्काळात तग धरू शकतात.

  • काटेरी वने: ही वने पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आढळतात, जिथे पाऊस अत्यंत कमी असतो. या वनांमध्ये काटेरी झाडे आणि झुडपे जास्त असतात.

  • खारफुटी वने: ही वने महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याजवळच्या भागांमध्ये आढळतात. खारफुटीची झाडे खाऱ्या पाण्यात वाढू शकतात आणि ती किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण करतात.

अधिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

कोणत्या देशात विषुववृत्तीय वने अधिक आढळतात?
भारतातील वनांचे वर्गीकरण सविस्तर कसे स्पष्ट कराल?
भारतातील वनांचे वर्गीकरण सविस्तर कसे लिहाल?
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगले कोठे आहेत?
भारतातील वनांचे वर्गीकरण कसे केले जाते?
भारतातील वनांचे वर्गीकरण कोणते?
बिर्‍हा येथे कोणत्या प्रकारची अरण्ये सापडतात?