2 उत्तरे
2
answers
भारताची लोकसंख्या अक्षरात किती आहे?
7
Answer link
लोकसंख्येच्या बाबतीत चीनशी स्पर्धा करणा-या भारताची लोकसंख्या आता १ अब्ज २१ कोटी झाली आहे. गेल्या दहा वर्षांत देशाच्या लोकसंख्येत १७.६ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी लोकसंख्यावाढीचं प्रमाण आधीच्या तुलनेत घटल्याचं दिलासादायक चित्र समोर आलंय. भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या १७ टक्के इतकी आहे.
परप्रांतियांचे लोंढे रोखण्यात असमर्थ ठरलेल्या महाराष्ट्राची लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी झाली असून, लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील दुस-या क्रमांकाचं राज्य ठरलंय. उत्तर प्रदेशनं या यादीत अव्वल नंबर पटकावला असून तिथली लोकसंख्या २० कोटींच्या आसपास आहे.
देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणून, अस्ताव्यस्त पसरलेल्या ठाणे जिल्ह्याचीनोंद करण्यात आली आहे. ठाण्याची एकूण लोकसंख्या १ कोटी दहा लाख ५४ हजार १३१ इतकी आहे.
भारताची १५ वी जनगणना यंदा करण्यात आली. त्याचा प्राथमिक अहवाल जनगणना आयुक्त सी. चंद्रमौली यांनी आज जाहीर केला. २००१ ते २०११ या दहा वर्षांत भारतीय लोकसंख्येत १८ कोटींची वाढ झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या जनगणनेत लोकसंख्यावाढीचा दर २१.१५ टक्के होता, तो आता १७.६४ टक्क्यांवर आला आहे. सातत्यानं वाढत चाललेल्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासाठी ही सुखद बाब आहे. परंतु, अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझील, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही भारताची लोकसंख्या जास्त असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेलं उत्तर प्रदेश आणि दुस-या क्रमांकावरील महाराष्ट्र यांच्या लोकसंख्येची बेरीज अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्येत गेल्या दहा वर्षांत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महाराष्ट्राखालोखाल बिहार, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश ही राज्यं अनुक्रमे तिस-या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.
हजार पुरुषांमध्ये ९४० स्त्रिया देशातील महिलांच्यालोकसंख्येत १८.१२ टक्क्यांनी वाढ झाली असून ती ५८ कोटी इतकी झाली आहे, तर पुरुषांचेप्रमाण १७.१९ टक्क्यांनी वाढून त्यांची संख्या ६२ कोटींवर गेली आहे. स्त्री-पुरुष गुणोत्तरातील तफावत १९६१ नंतर प्रथमच घटली आहे. दर १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया असे गुणोत्तर यंदाच्या जनगणनेत समोर आले आहे. मागील जनगणनेत दर १००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया असे हे गुणोत्तर होते.

0
Answer link
भारताची लोकसंख्या अक्षरात: एक अब्ज चाळीस कोटी सत्तर लाख साठ हजार तीनशे अठ्ठावीस (1,40,76,60,328) आहे.
हे आकडे 1 मार्च 2023 रोजी अपडेट केले गेले आहेत.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळाला भेट देऊ शकता: