4 उत्तरे
4
answers
राजश्री शाहू महाराज जीवन: कार्य 3000 ते 4000 शब्दांत निबंध?
5
Answer link
"सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो. राजर्षी शाहू आणि इतर समाज सुधारक यांच्यात महत्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहुंकडे राजसत्ता होती. त्याआधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते.त्यासाठी त्यांना दुसऱ्यांची मनधरणी करावी लागली नाही.राजर्षी शाहू हे प्रजावत्सल, दलितबंधू, समतेचे पुरस्कर्ते आणि निधड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते."
शाहू राजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. शाहूंचे बालपणीचे नाव यशवंतराव होते. १७ मार्च १८८४ रोजी शाहूंचे दत्तकविधान व राज्यारोहण झाले. यशवंतरावाचे दत्तकविधानानंतर ‘शाहू महाराज’ असे नामकरण झाले. शाहूंनी आपल्या आयुष्यात जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, धरणे, रस्ते ई. क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने उपेक्षित, वंचित समाजासाठी वापरली. त्यामुळे शाहू हे लोकांचे राजे झाले.
आरक्षणाचे प्रणेते-
मागासलेल्या वर्गाना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, अशी कल्पना महात्मा जोतिबा फुले यांनी मांडली.राजर्षी शाहूंनी आपल्या अधिकारांचा वापर करून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. ६ जुलै १९०२ रोजी त्यांनी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० % जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. त्याची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागविले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्या अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. शाहुंवर अनेक प्रकारचे आरोप केले. परंतु वंचितांच्या विकासाचे व्रत घेतलेल्या शाहूंनी कशाचीही पर्वा न करता आपले धोरण चालू ठेवले.
तथाकथित गुन्हेगार जातींविषयी भूमिका-
जातव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. परिणामी त्यांची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली. त्यांचा सामाजिक दर्जा खालावला. समाजाकडून मिळणारी अन्याय्य वागणूक व उत्पन्नाचे काहीच साधन नाही अशा दुहेरी संकटात सापडलेल्या मागास, भटक्या जमातीतील अनेक लोकांनी पोटापाण्यासाठी चोऱ्या, दरोडे अशा गोष्टींचा आधार घेतला. तत्कालीन ब्रिटीश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गावकामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहुराजांना या लोकांची कणव होती. शाहू खऱ्या अर्थाने वंचितांचे राजे होते. त्यामुळे शाहूंनी ही हजेरी पद्धत बंद केली. या जाती-जमातीतील लोकांना संघटीत करून गुन्हेगारी कृत्यांपासून परावृत्त केले. त्यांना नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार नेमले, रथावर वाहक नेमले. त्यांना घरे बांधून दिली. राहण्याची व पोटापाण्याची सोय झाली. शाहुराजांचे प्रेम मिळाले. त्यामुळे या लोकांनी गुन्हेगारी कारवाया सोडून देवून ‘माणूस’ म्हणून जगायला सुरुवात केली. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पहायला मिळेल. मात्र त्यांना प्रेमाने, मायेने आपलेसे करून समान सामाजिक दर्जा देणारा व त्यांच्यात स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच.
राजर्षी शाहू आणि स्त्रियांची स्थिती-
धर्मव्यवस्थेने स्त्रियांनाही अतिशय उपेक्षित ठेवले. त्यांचे हक्क-अधिकार नाकारले. स्त्रियांवर अनेक बंधने लादली.त्यामुळे स्त्रियांची एकंदर सामाजिक अधोगती झाली होती. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांना दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागे. स्त्रियांना कुणीही वाली उरला नव्हता. स्त्रियांची ही अवनती जाणून शाहू राजांनी त्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले. स्त्रियांसाठी अनेक चांगले कायदे केले. धर्माच्या नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची अनैतिक पद्धत संस्थानात चालू होती. महाराजांनी जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही अमानुष पद्धत बंद केली. जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून संस्थानात आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. तसा कायदा केला. आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले. तसेच त्या काळात संस्थानात शंभर मराठा-धनगर विवाह घडवून आणले. विधवांची दारूण परिस्थिती लक्षात घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी कायदा केला. त्यामुळे विधवांच्या परिस्थितीत बराच फरक पडला. त्यांना कायद्याने पुनर्विवाह करता येवू लागला. संस्थानातील अनेक समाजात ‘काडीमोड’संबंधी त्या-त्या जात-पंचायतींचे आपापले कायदे असत. हे कायदे पुरुषप्रधान संस्कृतीला साजेसे म्हणजेच पुरुषांना अनुकूल तर स्त्रियांना प्रतिकूल असत. त्यामुळे स्त्रियांवर नेहमी अन्याय होई. स्त्रियांच्या मतांना आणि भावनांना फारशी किंमत नव्हती. त्यामुळे स्त्रियांची कुचंबना होई. हे ओळखून शाहू महाराजांनी संस्थानात ‘काडीमोड’संबंधी कायदा केला. अशा प्रकारचे खटले रीतसर कोर्टात चालवण्याचे आदेश दिले. स्त्रियांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांनाही ‘काडीमोड’ घेण्याचे अधिकार दिले. स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या पद्धतीविरुद्धही शाहू राजांनी कायदा केला.स्त्रियांचा शारीरिक व मानसिक छळ करणे, त्यांना उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी कडक शिक्षा केल्या. त्यामुळे स्त्रियांना मोठा आधार मिळाला. राजर्षी शाहूंनी केलेल्या या अनेक स्त्री-उद्धारक कायद्यांमुळे स्त्रियांना सामाजिक प्रवाहात येण्यासाठी खूप मदत झाली.
राजर्षी शाहूंचे शैक्षणिक कार्य-
तत्कालीन वर्ण-व्यवस्थेने शूद्र आणि सर्व स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नाकारून त्यांच्यावर अन्याय केला. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई यांनी दलित-बहुजनांसाठी आणि स्त्रियांसाठी शाळा काढल्या. तोच वारसा जपत शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात बहुजन समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या अनुषंगाने मोलाची कामगिरी बजावली. महाराजांनी १९१७ साली कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. हा कायदा करताना महाराजांनी पालकांनाही दंड ठेवला. जर एखाद्या पालकाचा मुलगा शाळेत आला नाही तर दरमहा १ रु. दंड ठेवला. शाहूंनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. कारण पाया पक्का असेल तरच माणसाची भावी शैक्षणिक प्रगती होऊ शकेल असे महाराजांचे मत होते.ते म्हणत, “शिक्षणानेच आमचा तरणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही, असे इतिहास सांगतो.” शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अनेक अडचणी समजावून घेवून महाराजांनी त्यावर उपाय केले. मागास, गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप व इतर सवलती दिल्या. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतीगृहे बांधली. कोल्हापुरात हायस्कूल व कॉलेजची स्थापना केली. राजाराम कॉलेज मध्ये मुलींची फी माफ केली. त्याकाळी काही शिक्षक अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजातील काही मुलांना व्हरांड्यात बसवत असत. ही गोष्ट महाराजांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिक्षकांना जरब बसेल असे उपाय केले. सरकारी शाळेत शिवाशिव पळू नये व सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवावे असा वटहुकूम काढला. ज्या शाळा या हुकुमाचे पालन करणार नाहीत त्यांची ग्रांट व इतर सवलती बंद करण्याची तंबी दिली.
वेदोक्त प्रकरण-
शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारा सर्वात महत्वाचा प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण होय. शाहू महाराजांचा भटजी राजोपाध्ये यांनी महाराजांना शूद्र मानून त्यांचे विधी वैदिक मंत्राने न करता पुराणोक्त मंत्राने करणार अशी भूमिका घेतली. त्यामुळे महाराज दुखावले गेले. अनेक प्रकारे समाज देवूनही भटजी त्याची भूमिका सोडत नाही असे दिसताच महाराजांनी त्याचे इनाम जप्त केले. परिणामी वाद अधिकच चिघळला. टिळकांनीही केसरीमध्ये अग्रलेख लिहून सामाजिक न्यायाची बाजू न घेता भटजीची बाजू घेतली. आधीच महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीमुळे ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद धुमसत होता.त्यात टिळक आणि महाराष्ट्रातील बहुतांशी ब्राम्हण महाराजांच्या विरोधात एकवटल्यामुळे ब्राम्हणेतर समाजही महाराजांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. परिणामी महाराष्ट्रात ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर असे दोन गट पडले. ब्राम्हणांचे नेतृत्व टिळकांकडे तर ब्राम्हणेतरांचे नेते शाहू महाराज. परिणामी टिळक आणि शाहू राजे यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. खरेतर शाहू महाराजांचे भांडण ब्राम्हणांविरुद्ध नव्हते तर त्यांच्या वर्चस्ववादी मानसिकतेविरुद्ध होते.विधी वैदिक मंत्राने केले काय किंवा पुराणोक्त मंत्राने केले काय ? काहीच फरक पडत नाही हे शाहू राजे जाणत होते. परंतु बहुजनांचे विधी वैदिक पद्धतीने न करण्यामागे ब्राम्हणांचा वर्णवर्चस्ववाद असल्याने शाहुनीही आपली भूमिका सोडली नाही. या घटनेनंतर शाहू राजांनी सामाजिक न्यायाच्या लढाईला अधिक बळकटी मिळवून दिली.
शाहू महाराजांचे आर्थिक धोरण-
शाहू महाराजांनी उद्योगधंदे उभारण्याच्या दृष्टीने खास प्रयत्न केले.कारागिरांना आश्रय दिला. आपल्या संस्थानात सुत गिरणी चालू केली.त्यासाठी मोठी जमीन मोफत दिली. इचलकरंजी येथे जिनिंग कारखाना सुरु केला. त्यानंतर इतर ठिकाणी अशा प्रकारचे कारखाने सुरु केले. उद्योगधंदे आणि व्यापार वाढीसाठी शाहूंनी कारागिरांना अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. त्यांना राहण्यासाठी जमिनी दिल्या. बिनव्याजी कर्जे दिली. पाणीपुरवठ्याची मोफत सोय केली. रस्ते बांधले, रेल्वेच्या विकासास गती दिली. १८९५ साली शाहूपुरी ही व्यापारपेठ वसवण्यात आली.
राजर्षी शाहूंचा वारसा-
आज शाहू महाराजांचे काम बहुतांशी लोकांपर्यंत पोहचले आहे. शाहुराजांच्या या अद्वितीय कामगिरीमुळे सर्वसामान्य बहुजनांच्या हृदयात शाहूंना आदराचे स्थान आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या युगपुरुषांच्या जोडीला शाहू राजांचे नाव घेतले जाते. पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा फार मोठा वाटा आहे.
आज शाहू महाराजांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या सर्वत्र साजऱ्या केल्या जातात. परंतु फक्त एवढे करून त्यांच्या विचार-कार्याचे चीज होणार नाही. शाहूंचा लढा हा समतेसाठी होता. आत्मसन्मानासाठी होता. वर्णवर्चस्वाच्या अहंकारी प्रवृत्तीविरुद्ध होता. आज शाहू राजांच्या पश्चात त्यांचाच जयजयकार करणारे, त्यांच्या नावाने सत्ता भोगणारे राज्यकर्ते गरीब प्रजेला छळत आहेत. भ्रष्टाचार, गुंडगिरी या प्रवृत्ती फोफावल्या आहेत. शाहूराजे फक्त पुजण्यापुरतेच राहिले आहेत. त्यांचा वारसा, त्यांचे विचार, कार्य आपण विसरलो आहोत. राजर्षी शाहूंनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या संस्थानात जनहितार्थ अनेक कायदे केले. प्रसंगी टीका, अपमान, बदनामी यांची पर्वा केली नाही. पण आजच्या राज्यकर्त्यांना ‘जादूटोणा व अघोरी प्रथाविरुद्ध कायदा’ करता येत नाही. राज्यकर्ते शाहूंच्या नावाने राजकारण करतात मात्र त्यांचा विचार जपताना कुणीच दिसत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.
शाहूंच्या कार्याचे खरे चीज व्हावे असे वाटत असेल तर शिक्षण घेवून उच्च पदे हस्तगत केली पाहिजेत. आपल्या अधिकाराचा, पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाकरता केला पाहिजे. उपेक्षित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, जातीभेद नष्ट करणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे ही शाहू राजांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया, हीच शाहुराजांना आदरांजली ठरेल.
26 जून हा राजर्षी शाहूंचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराजांच्या कार्र्याला आणि विचारांना विनम्र अभिवादन।....
वरील माहिती द्वारे देण्यात आली आहे...

3
Answer link
______________________________
💫 _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _ 💫
_*‼ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज ‼*_
____________________________
💫 *_माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव_*💫
____________________________
. *_☒दि. २६ जून २०१९☒_*
*☒ बहुजनांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या पंक्तीत बसुन हितगुज करून प्रश्नांची उकल करणारे राजे म्हणजे लोकोत्तर समाज सुधारक, जाणताराजा, राजर्षी छत्रपती शाहु महाराज, यांचा जन्म सन १८७४ रोजी कागल येथे झाला. प्राथमिक शिक्षण संस्थानात पुर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी राजकोट येथील राजकुमार कॉलेज येथे १८८५ ते १८८९ पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर युरोपीय शिक्षकांच्या हाताखाली त्यांचा इंग्रजी भाषा, राज्यकारभार, जगाचा इतिहास इत्यादी विषयाचा अभ्यास झाला.*
सन १८९४ मध्ये कोल्हापुर राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर अखिल हिंदुस्थानचा प्रवास करून आपल्या देशबांधवांच्या सामाजिक परिस्थितीचा सुक्ष्म अभ्यास केला. या नंतर ते युरोपला गेले व युरोपीय लोकांची भौतिक प्रगती ही अवलोकन केली. ब्रिटीश सरकारच्या गैरमर्जीची पर्वा न करता राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या समाजाच्या सर्वांगीण सुधारणेच्या चळवळी चालु ठेवल्या.
*_∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭∭_*
╔══╗
║██║ _*M⃟ a⃟ h⃟ i⃟ t⃟ i⃟ * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_🌈
https://m.facebook.com/story.php?story_fbid=746069082457684&id=100011637976439
____________________________
*☒ पायी गती, हाती शक्ती व -हदयी मानवाची उन्नती हा ध्येयवाद स्विकारून भारताच्या इतिहासात आजरामर झालेले छत्रपती शाहु महाराज यांच्या कामगिरीचे खरे महत्व ज्या काळात ते जन्माला आले तो काळ नजरेसमोर आणला, तर महान, उत्तुंग व्यक्तीमत्व आपल्याला दिसते. समाजात पडलेली दरी, पराकोटीची हीन आवस्था, मानवतावादी तत्वज्ञानाऐवजी भाकडकथांनी बाधीत मनांना गाळातून बाहेर काढणा-या समाज धुरीणांमध्ये छत्रपती शाहु महाराज अग्रेसर होते, यात शंका नाही. अज्ञानी समाजामध्ये नव्या युगाचे चैतन्य निर्माण करण्याची कामगिरी पुर्णत्वास नेऊन प्रेम, दया, बंधुत्व, वेदोक्ताधिकार सर्व हिंदु समाजाला मिळाला पाहिजे हा महाराजांचा आग्रह होता.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट छत्रपती शाहु महाराजांच्या कृतित्वातुन माणुसकीचा झरा पाझरत होता. शिक्षण या वर्गात महत्वाच्या सुधारणेस त्यांनी हात घातला. गरीब व होतकरू विद्याथ्र्यांसाठी त्यांनी प्रत्येक जातीची केली. शिकुन ज्ञानी झाल्याशिवाय समथ्र्य, शक्ती बहुजन समाजात येणार नाही या उदात्त हेतुने वेळोवेळी शिक्षणाची हती अत्यंत साध्या पण प्रभावी भाषेत विषद केली व त्याचा आग्रह धरून ती प्रत्येक्षात साकार देखील केली.
शिक्षणाची गंगोत्री गरीब शेतक-याच्या घरातही गेली पाहिजे, यासाठी महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान दांभिकपणा, स्त्रीजातीवरील अन्याय, आस्पृश्यवरील अन्याय, या विरूद्ध प्रबोद्ध प्रबोधन व कायदे केले. शिवाजी नवे क्षात्रजगदगुरूपद निर्माण केले.
माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरत्यांना राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती, महात्मा फुलेंच्या समाजसुधारकी वृत्तीमुळेच महाराजांना सत्यशोधक समाज जवळचा वाटला. स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव न बाळगुन आपल्या राज्यात गरीब होतकरू, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दलीत स्त्रियांच्या शिक्षणासाठी छत्रपती शाहु महाराजांनी स्पेशल स्कॉलरशिप सुरू केल्या. त्यांना नौकरीच्या जागा दिल्या. लोकांच्या -हदयसिहांसनावर चिंतन विराजमान होणारे छत्रपती शाहु हे राज्यातील महान राजा तर होतेच पण त्याहुन ही अधिक त्यांच्यातील माणुस मोठा होता. खवळलेल्या वाघाची मान पिरगळुन त्यास ठार करणारा व आसवलाबरोबर कुस्ती खेळणारा साहसी पराक्रमी राजा, मल्ल विद्येला प्रोत्साहन देणारा मल्ल राजा, दलितांना पोटाशी धरणारा दलित्तोधारक राजा, कलावंताच्या कलेचल जाण असणारा रसिक राजा,बहुजन समाजाची सर्वांगीण सुधारणा करणारा सुधारक राजा अशा या राजाची किती रूपे सांगावीत. दलितांच्या दुःखांना समजुन घेवुन समाजात विषाक्त जातीयतेची बीजे समुळ उखडून फेकत छत्रपती शाहु महाराजांनी सामाजिक सुधारणेस गती दिली. अस्पृश्याप्रमाणे शेतकरी व कामगार यांच्या उद्धारासाठी नवे नेतृत्व उभा करणे, उद्योगी निहाय एकचसंघ ठेवणे, विधायक कामावर भर देणं हे छत्रपती शाहु महाराजांचे जणू धोरणच बदले. कामगारांनी संघटीन व्हा आपले हक्क प्राप्त करून घ्या तुम्हाला हे सांगताना मला कसलेच भय वाटत नाही. की हे युग संघटनेच आहे. शिक्षणाने हे साध्य होईल या उद्गाराबद्दल मला माझी राजवस्त्रे उतरून ठेवावी लागली तरी मला त्याची पर्वा नाही. शेती उद्योग व व्यापार, राज्याच्या उत्पन्नाच्या बाबी संचार व दळण वळणाची व्यवस्था, सामान्य जनजीवन आणि परिवर्तनवादी विचार, आपल्या भाषणातून केवळ विद्यापीठावरून न मांडता प्रत्यक्षात झोपडीत जाऊन गरीबांशी हितगुज करणारे, प्रसंगी त्यांच्या समवेत भोजन करणारे आणि दुखितांच्या आश्रुंना पुसणारे छत्रपती शाहु महाराज यांनी आपल्या राज्यात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व शैक्षणिक परिवर्तन घडवूून आणले. कर्तबगार संस्थानिक छत्रपती शाहु महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत न्यायव्यवस्थेत सुधारणा केल्या. आपली उपक्रमशीलता सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाच्या कामी लावली. महात्मा फुले यांचे कार्य पुढे चालवणारे छत्रपती शाहु महाराज यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, अन्याय या विरूद्ध कार्य केले.
याच बरोबर राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी आपल्या करवीर संस्थानात सन १९१८ मध्ये मोफत व सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला. सामाजिक सुधारणांमध्ये धैर्य व स्थैर्य दाखवणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
_*!|! माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव !|!*_
*🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵🇯🇵*
. _*ണคн¡т¡ รεvค*_
. *_:::::∴━━━✿━━━∴::::_*

0
Answer link
राजश्री शाहू महाराज: जीवन आणि कार्य
राजश्री शाहू महाराज (छत्रपती शाहू महाराज) हे कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते आणि त्यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला होता. त्यांनी समाजातील गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी खूप महत्त्वपूर्ण काम केले. त्यांनी जातीय भेदभावाला विरोध केला आणि शिक्षणाला महत्त्व दिले.
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण:
- शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते.
- त्यांचा जन्म कागलमधील घाटगे घराण्यात झाला.
- १८८४ मध्ये, कोल्हापूरच्या विधवा राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले, आणि ते शाहू महाराज झाले.
- त्यांनी राजकोट आणि धारवाड येथे शिक्षण घेतले.
राजकीय आणि सामाजिक कार्य:
- १९०२ साली त्यांनी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सुरुवात केली, ज्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली.
- शिक्षणाचे महत्त्व ओळखून, त्यांनी मुलामुलींसाठी शाळा उघडल्या आणि शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी प्रयत्न केले.
- त्यांनी जातीय भेदभावाला विरोध करण्यासाठी अनेक कायदे केले आणि आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले.
- त्यांनी शेती आणि उद्योगाला चालना देण्यासाठी सहकारी संस्था (cooperative societies) स्थापन केल्या, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली.
शिक्षणावरील कार्य:
- शाहू महाराजांनी शिक्षण सर्वांसाठी महत्त्वाचे आहे हे जाणले.
- त्यांनी मुला-मुलींसाठी अनेक शाळा आणि वसतिगृहे उघडली.
- त्यांनी शिक्षण घेण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली, जेणेकरून कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये.
- त्यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या.
सामाजिक न्याय आणि समानता:
- शाहू महाराजांनी समाजात समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी खूप प्रयत्न केले.
- त्यांनी अस्पृश्यता (untouchability) आणि जातीय भेदभावाला विरोध केला.
- १९०२ मध्ये त्यांनी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची सुरुवात केली, ज्यामुळे मागासलेल्या लोकांना नोकरी मिळण्यास मदत झाली.
- त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे जातीय भेदभावाला कमी करण्यात मदत झाली.
कृषी आणि औद्योगिक विकास:
- शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना दिली.
- त्यांनी शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था (cooperative societies) स्थापन केल्या, ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळाली आणि त्यांची स्थिती सुधारली.
- त्यांनी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले, ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या.
- त्यांनी शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन दिले, ज्यामुळे उत्पादन वाढले.
कायदे आणि सुधारणा:
- शाहू महाराजांनी अनेक कायदे केले आणि समाजात सुधारणा घडवून आणल्या.
- त्यांनी बालविवाह (child marriage) आणि हुंडा (dowry) यांसारख्या प्रथांवर बंदी घातली.
- त्यांनी विधवा पुनर्विवाहाला (widow remarriage) प्रोत्साहन दिले, ज्यामुळे विधवा महिलांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी मिळाली.
- त्यांनी जमिनीच्या मालकीचे नियम बदलले, ज्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला.
कला आणि संस्कृती:
- शाहू महाराजांनी कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन दिले.
- त्यांनी नाटक, संगीत, आणि चित्रकला यांसारख्या कला प्रकारांना आश्रय दिला.
- त्यांनी अनेक कलाकारांना आर्थिक मदत केली, ज्यामुळे ते त्यांची कला सादर करू शकले.
- त्यांनी कोल्हापूरमध्ये कला आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी अनेक संस्था स्थापन केल्या.
लोककल्याणकारी कार्य:
- शाहू महाराजांनी आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी अनेक कामे केली.
- त्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली, ज्यामुळे लोकांना स्वच्छ पाणी मिळाले.
- त्यांनी आरोग्य सेवा सुधारल्या आणि दवाखाने उघडले, ज्यामुळे लोकांना चांगली आरोग्य सेवा मिळाली.
- त्यांनी गावे आणि शहरे जोडण्यासाठी रस्ते बांधले, ज्यामुळे लोकांना प्रवास करणे सोपे झाले.
शाहू महाराजांचे विचार:
- शाहू महाराजांनी नेहमी सत्य, न्याय, आणि समानतेचे पालन केले.
- त्यांनी लोकांना अंधश्रद्धा (superstition) आणि जातीय भेदभावापासून दूर राहण्यास सांगितले.
- त्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आणि लोकांना ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहित केले.
- त्यांनी सांगितले की, "माणुसकी हाच खरा धर्म आहे."
मृत्यू:
- ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाले.
- त्यांच्या मृत्यूनंतरही, त्यांचे कार्य आणि विचार आजही लोकांना प्रेरणा देत आहेत.
वारसा:
- शाहू महाराजांनी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते.
- त्यांनी समाजासाठी जे योगदान दिले, ते कधीही विसरता येणार नाही.
- ते नेहमीच गरीब आणि मागासलेल्या लोकांचे कैवारी (protector) म्हणून ओळखले जातात.
- भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ अनेक योजना सुरू केल्या आहेत.
संदर्भ: