2 उत्तरे
2 answers

दूरसंवेदन (remote sensing) म्हणजे काय?

1
🛰 *दूरसंवेदन (remote sensing) म्हणजे काय ?* 🛰
***********************************
आपण आपल्या परिसराविषयी सतत माहिती मिळवत असतो. आपली पंचेंद्रिय सतत जागरूक राहून ही माहिती मिळवत असतात. त्यापैकी त्वचा वस्तूला स्पर्श करून त्याची माहिती मिळवते, तर जीभ पदार्थ चाखून त्याविषयीची माहिती आपल्याला देत असते. पण आपले डोळे किंवा कान ही इंद्रिये मात्र वस्तूला स्पर्श न करता माहिती गोळा करत असतात. डोळे तर वस्तूवरून परावर्तित झालेला प्रकाश पकडून त्याचं चित्र आपल्या पडद्यावर उमटवतात. मेंदूच्या मदतीनं मग त्या चित्राची फोड करून त्याविषयीची तपशीलवार माहिती मिळवून आवश्यक वाटल्यास ती साठवून ठेवतात. त्या वस्तूकडून प्रसारित होत असलेल्या ध्वनीलहरी पकडून कानही त्याच पद्धतीनं काम करत असतात. म्हणजेच ही इंद्रिय दूरसंवेदनाचं तंत्र वापरून परिसराविषयी सतत माहिती मिळवत राहतात. थोडक्यात एखाद्या वस्तूविषयी तिला स्पर्श न करता दुरूनच तिच्याविषयीची माहिती मिळवण्याचं तंत्र म्हणजे 'दूरसंवेदन'.
विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे हेच मोठ्या प्रमाणावर साध्य केलं जातं. आकाशात सतत फिरत राहणाऱ्या उपग्रहांकडून आपली धरती म्हणजेच जमीन व सागर तसंच हवा याविषयीची माहिती मिळवण्याची व्यवस्था म्हणजे आधुनिक काळातलं दूरसंवेदन. केवळ याच कामासाठी आता अवकाशात उपग्रह स्थापन केले जातात. हे दोन प्रकारे दूरसंवेदनाचं काम करत असतात. पहिला प्रकार म्हणजे जमीन, सागराचं पाणी किंवा हवा यावरून परावर्तित झालेल्या प्रकाशलहरी संवेदनांच्या मदतीनं ग्रहण करून त्याचं चित्र तयार करणं. आपले डोळे यासाठी केवळ तानापिहिनिपाजा या मर्यादित परिघातला दृश्य प्रकाशात वापरतात; पण उपग्रहांवरील विविध कॅमेरे या प्रकाशाव्यतिरिक्त जंबूपार, अवरक्त, रेडिओप्रारणं यांचाही वापर करतात. हे झालं अप्रत्यक्ष किंवा पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. अॅक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये उपग्रहांकडून सुक्ष्मलहरी प्रारणं म्हणजेच मायक्रोवेव्ह रेडिएशन प्रक्षेपित केलं जातं. ते जमीन, सागर किंवा त्यांच्या पोटातील पदार्थ तसंच हवेतील विविध घटक यांच्याकडून कसा शोषलं जातं, आरपार जाऊ दिलं जातं, विखुरलं जातं किंवा परावर्तीत केलं जातं याचं निरीक्षण करून त्या वस्तूचं चित्र तयार केलं जातं. ही मग परत धर्तीवरच्या नियंत्रण केंद्राकडे पाठविली जाते.
या तंत्राचा वापर करून जमिनीवरील शेती, जंगलं, प्राण्यांचे वसतीस्थानं, सागरातील प्रवाह, ऋतुमानाप्रमाणे त्यांच्यात होणारे बदल, जमिनीच्या तसंच सागराच्या पोटातील नैसर्गिक साधनसंपत्ती, हवेत होणारे बदल, वाऱ्यांची स्थिती, वादळांचा प्रवास यांसारखी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आता दूरसंवेदनाचा अधिकाधिक वापर होतो आहे. हैदराबाद इथं असलेलं आपलं दूरसंवेदन केंद्र जगातील अव्वल केंद्र मानलं जातं.

*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*
विज्ञान दिनविशेष
उत्तर लिहिले · 3/6/2019
कर्म · 569265
0

दूरसंवेदन (Remote Sensing):

दूरसंवेदन म्हणजे प्रत्यक्ष स्पर्श न करता दूरवरून वस्तू किंवा क्षेत्राबद्दल माहिती मिळवणे.

यात सेंसर (sensor) वापरून पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तित (reflected) होणारी ऊर्जा किंवा उत्सर्जित (emitted) होणारी ऊर्जा मोजली जाते.

या माहितीचा उपयोग नैसर्गिक आपत्ती, हवामान बदल, शेती, जमीन वापर आणि इतर अनेक क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी होतो.

दूरसंवेदनाच्या पद्धती:

  1. ॲक्टिव्ह (Active): यात सेंसर स्वतः ऊर्जा उत्सर्जित करतो आणि परावर्तित झालेली ऊर्जा मोजतो. उदाहरण: रडार (Radar).
  2. पॅसिव्ह (Passive): यात सेंसर सूर्यप्रकाश किंवा पृथ्वीने उत्सर्जित केलेली ऊर्जा मोजतो. उदाहरण: कॅमेरा (Camera).

उपयोग:

  • पर्यावरण व्यवस्थापन: वनांचे संरक्षण, प्रदूषण नियंत्रण.
  • शहरी नियोजन: शहरांचा विकास आणि व्यवस्थापन.
  • कृषी: पिकांचे निरीक्षण, जमिनीचा अभ्यास.
  • आपत्ती व्यवस्थापन: पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये मदत.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5280

Related Questions

विषय भूगोल विदा र‍ॅन म्हणजे काय?