दूर संवेदन
0
Answer link
विदा रॅन (Data Wrangling) म्हणजे काय?
विदा रॅन, ज्याला डेटा रँग्लिंग असेही म्हणतात, ही डेटा सायन्स आणि डेटा विश्लेषणातील एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. यामध्ये डेटा अधिक उपयुक्त आणि विश्लेषण करण्यासाठी योग्य बनवण्यासाठी तो साफ करणे, रूपांतरित करणे आणि व्यवस्थित करणे इत्यादी गोष्टी केल्या जातात.
सोप्या भाषेत विदा रॅन म्हणजे:
- कच्च्या स्वरूपातील डेटा घेणे.
- त्यातील त्रुटी, विसंगती आणि अनावश्यक भाग काढून टाकणे.
- डेटाचे विश्लेषण करण्यासाठी सोप्या स्वरूपात रूपांतर करणे.
- अनेक स्रोतांमधील डेटा एकत्र करून तो सुसंगत बनवणे.
विदा रॅनचे फायदे:
- डेटा अधिक अचूक आणि विश्वासार्ह होतो.
- विश्लेषण अधिक प्रभावी होते.
- वेळेची आणि श्रमाची बचत होते.
- चांगले निर्णय घेण्यासाठी मदत करते.
उदाहरण:
समजा, तुमच्याकडे एका excel sheet मध्ये विद्यार्थ्यांची माहिती आहे. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावे चुकीची आहेत, काही ठिकाणी पत्ता अपूर्ण आहे, तर काही ठिकाणी गुणांची नोंद व्यवस्थित नाही. अशा स्थितीत, विदा रॅन वापरून तुम्ही ही माहिती व्यवस्थित करू शकता.
1
Answer link
🛰 *दूरसंवेदन (remote sensing) म्हणजे काय ?* 🛰
***********************************
आपण आपल्या परिसराविषयी सतत माहिती मिळवत असतो. आपली पंचेंद्रिय सतत जागरूक राहून ही माहिती मिळवत असतात. त्यापैकी त्वचा वस्तूला स्पर्श करून त्याची माहिती मिळवते, तर जीभ पदार्थ चाखून त्याविषयीची माहिती आपल्याला देत असते. पण आपले डोळे किंवा कान ही इंद्रिये मात्र वस्तूला स्पर्श न करता माहिती गोळा करत असतात. डोळे तर वस्तूवरून परावर्तित झालेला प्रकाश पकडून त्याचं चित्र आपल्या पडद्यावर उमटवतात. मेंदूच्या मदतीनं मग त्या चित्राची फोड करून त्याविषयीची तपशीलवार माहिती मिळवून आवश्यक वाटल्यास ती साठवून ठेवतात. त्या वस्तूकडून प्रसारित होत असलेल्या ध्वनीलहरी पकडून कानही त्याच पद्धतीनं काम करत असतात. म्हणजेच ही इंद्रिय दूरसंवेदनाचं तंत्र वापरून परिसराविषयी सतत माहिती मिळवत राहतात. थोडक्यात एखाद्या वस्तूविषयी तिला स्पर्श न करता दुरूनच तिच्याविषयीची माहिती मिळवण्याचं तंत्र म्हणजे 'दूरसंवेदन'.
विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे हेच मोठ्या प्रमाणावर साध्य केलं जातं. आकाशात सतत फिरत राहणाऱ्या उपग्रहांकडून आपली धरती म्हणजेच जमीन व सागर तसंच हवा याविषयीची माहिती मिळवण्याची व्यवस्था म्हणजे आधुनिक काळातलं दूरसंवेदन. केवळ याच कामासाठी आता अवकाशात उपग्रह स्थापन केले जातात. हे दोन प्रकारे दूरसंवेदनाचं काम करत असतात. पहिला प्रकार म्हणजे जमीन, सागराचं पाणी किंवा हवा यावरून परावर्तित झालेल्या प्रकाशलहरी संवेदनांच्या मदतीनं ग्रहण करून त्याचं चित्र तयार करणं. आपले डोळे यासाठी केवळ तानापिहिनिपाजा या मर्यादित परिघातला दृश्य प्रकाशात वापरतात; पण उपग्रहांवरील विविध कॅमेरे या प्रकाशाव्यतिरिक्त जंबूपार, अवरक्त, रेडिओप्रारणं यांचाही वापर करतात. हे झालं अप्रत्यक्ष किंवा पॅसिव्ह रिमोट सेन्सिंग. अॅक्टिव्ह रिमोट सेन्सिंगमध्ये उपग्रहांकडून सुक्ष्मलहरी प्रारणं म्हणजेच मायक्रोवेव्ह रेडिएशन प्रक्षेपित केलं जातं. ते जमीन, सागर किंवा त्यांच्या पोटातील पदार्थ तसंच हवेतील विविध घटक यांच्याकडून कसा शोषलं जातं, आरपार जाऊ दिलं जातं, विखुरलं जातं किंवा परावर्तीत केलं जातं याचं निरीक्षण करून त्या वस्तूचं चित्र तयार केलं जातं. ही मग परत धर्तीवरच्या नियंत्रण केंद्राकडे पाठविली जाते.
या तंत्राचा वापर करून जमिनीवरील शेती, जंगलं, प्राण्यांचे वसतीस्थानं, सागरातील प्रवाह, ऋतुमानाप्रमाणे त्यांच्यात होणारे बदल, जमिनीच्या तसंच सागराच्या पोटातील नैसर्गिक साधनसंपत्ती, हवेत होणारे बदल, वाऱ्यांची स्थिती, वादळांचा प्रवास यांसारखी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती मिळविण्यासाठी आता दूरसंवेदनाचा अधिकाधिक वापर होतो आहे. हैदराबाद इथं असलेलं आपलं दूरसंवेदन केंद्र जगातील अव्वल केंद्र मानलं जातं.
*बाळ फोंडके यांच्या 'काय ?' या पुस्तकातून*
विज्ञान दिनविशेष