2 उत्तरे
2 answers

फोन आल्याचा भास का होतो?

9
खरं खरं सांगा. तुम्हाला कधी असा भास होतो का, की मेसेज किंवा कॉल आल्यामुळे खिशातला फोन व्हायब्रेट होतोय? आणि फोन बाहेर काढून पाहिल्यानंतर तो भास होता हे समजल्यास काय भावना मनात येतात? आश्चर्य वाटतं ना? आणि हा भास झाला म्हणून चिंता पण वाटत असेल की आपल्यासोबत असे का घडत आहे.

पण काळजी करू नका. असे भास होणारे तुम्ही काही एकटेच नाहीत आणि हा मोबाईलचा सुद्धा दोष नाही.

बोले तो, इसको सिंपल भाषा में आपुनकेच भेजेका 'केमिकल लोचा' बोलते मामु!

चला तर मग जाणून घेऊया ही भानगड नेमकी आहे तरी काय..हे असे भास होण्यामागे काही कारणे आहेत..

काहीवेळा आपण इतरांपासून दूर आणि एकटे असताना अचानक वाटतं की फोन येतोय. हा सगळा आपल्या मेंदूचा खेळ असतो. मेंदूला सतत काहीतरी काम हवे असते. त्याला रिकामे बसलेले आवडत नाही. मग मेंदू महाशय आपल्याला असा भासांचा चकवा देतात.

तसेच समजा, आपल्या मनात अशी भावना येत असेल की इतर लोक आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत, तर अश्यावेळीही मोबाईल व्हायब्रेट होण्याचे भास होऊ शकतात.

आणखीही काही कारणे यामागे आहेत. आज जगातल्या निम्म्यापेक्षा जास्त लोकसंख्येकडे मोबाईल फोन आहेत. आपल्याला प्रत्येक कामासाठी मोबाईलवर अवलंबून राहण्याची सवय झाली आहे. ही अतिवापर करण्याची सवयसुद्धा या भासांना कारणीभूत ठरू शकते.

तुम्हाला मुंबई-पुणे-मुंबई नावाचा चित्रपट आठवत असेल तर, त्यात हृद्यमर्दम म्हणतो, 'मोबाईल ही गरज नसून एक व्यसन झाले आहे' अगदी खरं आहे हे!

आता जिथे व्यसन असते तिथे दुष्परिणाम सुद्धा असणारच.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, फोन वापरणाऱ्या ८०% लोकांना हे असे उगाचच फोन व्हायब्रेट झाल्याचे भास होतात. याच रिपोर्टमध्ये पुढे सांगितले आहे की, ३०% लोकांना फोन आलेला नसतानाही रिंगटोन वाजल्याचे सुद्धा भास होतात. मग साहजिकच खिशाकडे हात जाऊन फोन चेक केला जातो.

या भासांमागे आणखी एक कारण आहे बरं! ते म्हणजे लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावे ही मानसिक गरज. तुम्ही स्वतः पाहिलंच असेल की, खूप वेळात कुठला फोन किंवा मेसेज आला नाही तर आपण अस्वस्थ होतो. लोक आपल्याला विसरले की काय असे वाटू लागते आणि मग त्या पाठोपाठ फोन व्हायब्रेट झाल्याचे, रिंगटोन वाजल्याचे भास सुद्धा होऊ शकतात.



ही झाली कारणे. आता जाणून घेऊ, या 'फोन किंवा मेसेज न येताही ते येत आहेत आणि फोन व्हायब्रेट होत आहे असे भास' होणाऱ्या प्रकाराचे शास्त्रीय नाव काय आहे. तर याला म्हणतात,

'फँटम व्हायब्रेशन सिंड्रोम' (Phantom Vibration Syndrome)

यालाच आणखी काही नावांनी सुद्धा ओळखले जाते. जसे की, रिंक्झायटी (Ringxiety), आणि फॉक्सलार्म (Fauxcellarm).

हे भास आपल्याला अंघोळ करताना, टीव्ही बघताना किंवा मोठ्या आवाजाच्या उपकरणासोबत काम करताना जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. मानव प्राणी हा १००० ते ६००० हर्ट्झ या आवाजाच्या डेसीबलबाबत जास्त संवेदनशील असतो. सहसा आपल्या मोबाईल फोनची रिंगटोन सुद्धा याच हर्ट्झ मध्ये वाजत असते.

हा प्रकार अर्थातच मोबाईल फोन आल्यानंतर सुरू झालेला आहे आणि हळू-हळू संशोधकांना याची जाणीव झाल्यावर या सिंड्रोम वर २००७ मध्ये प्रथम अभ्यास सुरू झाला. अजूनही अनेक देशातील संशोधक यावर सतत अभ्यास करत आहेत.

तर हा फँटम सिंड्रोम म्हणजे खरोखरच आपल्या डोक्यातील केमिकल लोचा आहे की फक्त टेक्नॉलॉजीवर जास्त अवलंबून राहिल्याने होणारे भास आहेत? जाणून घेऊया.

अभ्यासकांच्या मतानुसार, हा सगळा गोंधळ आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या 'सेरेब्रल कोर्टेक्स' या भागामुळे होतो. हा भाग शरीराला येणारे सिग्नल समजून घेण्याचे आणि त्यांचे अर्थ लावण्याचे काम करत असतो.

ज्यावेळी आपल्याला फोन येतो त्यावेळी रिंगटोनचा आवाज, व्हायब्रेशनमुळे होणारी त्वचेची हालचाल, कपड्यांवर पडणारा दबाव, आणि शरीराच्या नसांमध्ये होणारा बदल या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून 'कॉल आला' असा निष्कर्ष मेंदूद्वारे काढला जात असतो.

जेव्हा यापैकी कुठलीही एक गोष्ट घडते तेव्हा, मेंदूच्या स्मृतीत साठवलेल्या माहितीनुसार मेंदू समजतो की परत कॉल आलेला आहे पण तो भास असतो. यालाच फँटम सिंड्रोम म्हणता येईल.

पण तुम्हाला असे भास होत असतील तर काळजी किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. हे अतिशय साधारण आहे आणि फोनचा जास्त वापर करणाऱ्या प्रत्येकालाच असे भास होऊ शकतात. हा कुठला मानसिक आजार नाही आणि शारीरिक आजार तर अजिबातच नाही.

दिवसातून दोन-तीन वेळा जर असे भास होत असतील तर तुम्ही 'नॉर्मल' आहात असे समजण्यास हरकत नाही. परंतु याची संख्या जर अतिप्रमाणात असेल तर ती मात्र धोक्याची घंटा आहे. मग हे भास होऊ नयेत म्हणून प्रयत्नपूर्वक उपाय करणे गरजेचे ठरते.



आपण पाहूया असे भास कमी करण्यासाठी नेमके काय उपाय करावेत.

तसे यासाठी काही शास्त्रीय उपचार नाहीत परंतु काही वैयक्तिक पातळीवर केलेल्या उपाययोजना कामी येऊ शकतात.

दिवसातून काही वेळ फोन बंद ठेवा

मोबाईल फोन वापरण्याच्या वेळा ठरवून घ्या. अतिआवश्यक असेल तरच चोवीस तास फोन वापरा अथवा कामाच्या वेळेत वापरला तर अतिउत्तम असेल. जर दिवसातून विशिष्ट वेळ फोन बंद ठेवत असाल तर मेंदूला कालांतराने त्याची सवय होऊन तुम्हाला अनावश्यक भास होणार नाहीत.

फोनचे व्हायब्रेशन बंदच असू द्या

जर तुम्हाला रिंगटोन ठेवणे शक्य असेल तर व्हायब्रेशन बंद करून टाकणे हा एक उत्तम उपाय असू शकतो. त्याची सवय झाल्याने 'न रहेगा व्हायब्रेशन, ना होंगे फॅन्टम सिंड्रोम'



रिंगटोन सतत बदलत रहा

एकाच रिंगटोनची सवय झाल्यास त्यासारखे दुसरे कुठले आवाज आले तर मेंदू गोंधळून जातो आणि फोन आल्याचे संकेत देतो. यावर उपाय म्हणजे सतत रिंगटोन बदल करत राहणे. त्याने एकाच संगीताची सवय होत नाही आणि तुम्हालाही प्रत्येक वेळी नवीन संगीत ऐकण्याचा फायदा मिळतो.

याशिवाय सर्वात उत्तम उपाय म्हणजे मोबाईलवर अवलंबून राहणे बंद करा. मोबाईलचा वापर कामापूरताच करा. फावल्या वेळात वाचन करणे अथवा मैदानी खेळ खेळणे या सारख्या कामात स्वतःला गुंतवून घेतल्यास 'केमिकल लोचा' होणार नाही.

साभार:https://m.dailyhunt.in
उत्तर लिहिले · 21/5/2019
कर्म · 6035
0

फोन आल्याचा भास होण्याची अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • ताण आणि चिंता: जास्त ताण किंवा উদ্বেगामुळे (Anxiety) तुम्हाला भास होऊ शकतो.
  • एकाकीपणा: जेव्हा तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला कोणाशी तरी बोलण्याची तीव्र इच्छा होते, तेव्हा तुम्हाला फोन वाजत असल्याचा भास होऊ शकतो.
  • ओव्हरलोड: कधीकधी आपला मेंदू एकाच वेळी खूप जास्त माहितीवर प्रक्रिया करत असतो. त्यामुळे आपल्याला चुकीचे संकेत मिळतात.
  • नैराश्य: नैराश्यात असल्यावर नकारात्मक विचार मनात येतात आणि त्यामुळे भास होऊ शकतात.
  • compulsions: काही लोकांना विशिष्ट गोष्टी वारंवार करण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना तसा भास होऊ शकतो.
  • झोप कमी होणे: अपुरी झोप हे देखील ह्या समस्येचे कारण असू शकते.
  • इतर मानसिक समस्या: काही गंभीर मानसिक समस्यांमध्ये देखील असे भास होऊ शकतात.

जर तुम्हाला हा अनुभव वारंवार येत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

टीप: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे आणि वैद्यकीय सल्ला म्हणून वापरली जाऊ नये.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

आत्महत्या कशी करावी बर?
मी खूप स्वतःच्या वागण्याला कंटाळलो आहे, आत्महत्या करून जीवन संपवायचे आहे, काय करू?
मी आज आत्महत्या करणार आहे, काय करू?
मी आज रात्री ठीक ४ वाजता आत्महत्या करणार आहे?
मन शांत कसे करायचं?
मन शांत कसे कराल?
मी खूप थकते, सतत नकारात्मक राहते आणि निरुत्साही वाटते, काय करू?