3 उत्तरे
3
answers
अग्रलेख म्हणजे काय?
4
Answer link
दैनिकांमध्ये संपादकीय पानावर जो निनावी लेख लिहिलेला असतो, त्याला अग्रलेख म्हणतात. तो निनावी असण्याचं कारण म्हणजे तो लिहिलेला कुणीही असला तरी ती संबंधित दैनिकाची भूमिका असतें, असा संकेत आहे. अर्थात आत्ता लोकसत्तेतील अग्रलेख ही गिरीष कुबेरांची भूमिका मानली जाते, परंतु त्यात हे अपेक्षित असतें की ही त्या संबंधित समूहाची भूमिका असावी.या पानावर अन्य लेखही असतात. ज्यांवर त्या त्या लेखकाचे नाव लिहिलेले असते.
मराठी पत्रकारितेला प्रारंभ झाला. त्यांनंतर दीर्घकाळ अग्रलेख हा पहिल्या पानावर असे. आता तो आतल्या एका पानात असतो. स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकं संपादकाचे एखाद्या विषयावरील मत जाणून घेण्यासाठी दैनिक वाचत असतं. वर्तमानपत्र हे संपादकाच्या नावाने ओळखले जात असे.
मराठी वर्तमानपत्राचा विचार केल्यास अलीकडे 2–3 दैनिकांच्या अग्रलेखाची चर्चा अधूनमधून होताना दिसते. दैनिक सामना हे अर्थातच बहुतेकांच्या मनात आले असेल. या दैनिकातील अग्रलेख हे काही वेळा त्या दिवशीच्या सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा एक भाग म्हणून पुढे येताना दिसतात. लोकसत्ताचे काही अग्रलेखही बरेचदा फार मोठी चर्चा घडवून आणणात. तरुण भारतचेही (नागपूर) अग्रलेख ते संघाचे मुखपत्र असल्याचे मानले जात असल्याने काही वेळा बातम्यांमध्ये आपल्याला बघायला मिळतात.
2
Answer link
अग्रलेख ...विशेष म्हणजे संपादकीय हे आपल्या दररोजच्या वृत्तपत्रांमध्ये छापले जाते. पण ते थेट वेब पोर्टलवर आणण्यासाठी केलेला हा एक खटाटोप.
वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी होऊन गेलेल्या बातमी अथवा होणाऱ्या घडामोडीवर (निवडणूक, निवडणुकांचे निकाल, साहित्य संमेलने, राजकारण, खेळ, मनोरंजन, देश-विदेश,
वृत्तपत्रातील अग्रलेख म्हणजे त्या त्या वृत्तपत्राच्या संपादकांनी होऊन गेलेल्या बातमी अथवा होणाऱ्या घडामोडीवर (निवडणूक, निवडणुकांचे निकाल, साहित्य संमेलने, राजकारण, खेळ, मनोरंजन, देश-विदेश,
0
Answer link
अग्रलेख म्हणजे एखाद्या वृत्तपत्राच्या संपादकांनी किंवा प्रकाशकांनी लिहिलेला लेख असतो. हा लेख त्या वृत्तपत्राच्या धोरणाचे प्रतिनिधित्व करतो आणि विशिष्ट विषयावर भाष्य करतो.
अग्रलेखाची काही वैशिष्ट्ये:
- अग्रलेख समकालीन आणि महत्त्वाच्या विषयांवर आधारित असतो.
- यात विषयाची पार्श्वभूमी, विश्लेषण आणि त्यावरील उपाय किंवा भूमिका स्पष्ट केली जाते.
- अग्रलेख वृत्तपत्राच्या संपादकीय धोरणाचे प्रतिनिधित्व करतो.
- हे वाचकांना विचार करण्यास प्रवृत्त करते.
अग्रलेख हा वृत्तपत्राचा महत्त्वाचा भाग असतो, जो वाचकांना विविध विषयांवर माहिती देतो आणि त्यांचे मत तयार करण्यास मदत करतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील दुवे पाहू शकता: