2 उत्तरे
2
answers
सामाजिक परिवर्तनाचा अर्थ सांगून त्याचे घटक स्पष्ट करा?
0
Answer link
सामाजिक परिवर्तनाच्या स्वरुपासंबंधी दोन सिद्घांत सांगितलेले आहेत. एक, सामाजिक परिवर्तन चकाकार स्वरुपाचे असते आणि दुसरे, रेषाकार स्वरुपाचे असते. कोणत्याही घटनांची जेव्हा अगदी पूर्वीची पुनःपुन्हा आवृत्ती होते, तेव्हा चकाकार स्वरुपाचे परिवर्तन घडते. उदा., ऋतुचक, कुंभमेळ्यासारखे उत्सव, उद्गम, विकास, ऱ्हास व नाश हा चकाकार कम सामाजिक घटनांतदेखील दिसून येतो.
ऊर्ध्वगामी आणि अधोगामी चढउतार परिवर्तनात असतात. व्यापारातील तेजी–मंदी, चलनी नाण्याच्या मूल्यामधील वाढ–घट हे ऊर्ध्वगामी किंवा अधोगामी पद्घतीने होतात. कित्येकदा परिवर्तन तरंगांच्या स्वरुपाचे असते. लोकांच्या आवडी–निवडी,फॅशन्स, क्रिकेटच्या खेळाडूंबद्दलचे प्रेम कमी–अधिक होते, नटनट्यांबद्दलची मते बदलतात. प्रसारमाध्यमे, जाहिरातींमुळे माणसे भारावून जातात आणि परिवर्तनास अनुकूल होतात. काही वेळा चुकीचे आणि भयानक परिणाम करणाऱ्या बाबीही स्वीकारल्या जातात.
परिवर्तन हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. मानव रानटी–पाषाणयुगीन अवस्थेतून विद्यमान प्रगत संस्कृतीपर्यंतवाटचाल करीत आला. निरनिराळ्या टप्प्याने विकासित होणे, हा मानवी समाजाचा एक गुणधर्मच आहे. लोकशाही समाजवादी आणि इतर अनेक प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या संघटनांमुळे समाजपरिवर्तन होत असते.सामाजिक संरचनेत फेरबदल घडविणारी प्रक्रिया. मानवांचे रीतिरिवाज, आचार–विचार, संस्था, संघटना, जीवनपद्घती, भोवतालचा परिसर, व्यक्तिव्यक्तींमधील वर्तन यांमध्ये सतत बदल होत असतात. आदिम अवस्थेपासून ते सांप्रत काळापर्यंत मानवी समाजाच्या सर्व अवस्थांमध्ये सतत परिवर्तन झाल्याचे दिसते.
मॅकायव्हर यांच्या मते सामाजिक संबंधांतील परिवर्तनाला सामाजिक परिवर्तन म्हणता येईल.मूलभूत अर्थाने समाजरचनेतील बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन होय. अमेरिकन समाजशास्त्रज्ञ हॅरी जॉन्सन यांच्या मते हे परिवर्तन जैविक, सांस्कृतिक, आर्थिक, तांत्रिक आणि राजकीय क्षेत्रांतही घडून येते.
( घटक)
सामाजीक घटक
आर्थीक घटक
राजकीय घटक
भौतीक घटक
शास्ञीय व तांञीक घटक

सामाजिक परिवर्तन: अर्थ आणि घटक
सामाजिक परिवर्तन म्हणजे काय:
सामाजिक परिवर्तन म्हणजे समाजरचना, सामाजिक संस्था, सामाजिक वर्तन आणि सामाजिक मूल्यांमध्ये होणारा बदल. हा बदल हळू हळू किंवा जलद गतीने होऊ शकतो.
सामाजिक परिवर्तनाचे घटक:
सामाजिक परिवर्तनाचे अनेक घटक आहेत, त्यापैकी काही महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत:
- लोकसंख्या: लोकसंख्येतील बदल, वाढ किंवा घट सामाजिक बदलांना कारणीभूत ठरतात.
- तंत्रज्ञान: नवीन तंत्रज्ञान सामाजिक जीवनात बदल घडवते.
- आर्थिक घटक: आर्थिक विकास आणि मंदी सामाजिक संबंधांवर परिणाम करतात.
- राजकीय घटक: राजकीय विचारधारा, धोरणे आणि कायदे सामाजिक बदल घडवतात.
- सांस्कृतिक घटक: सांस्कृतिक मूल्ये, रूढी आणि परंपरांमध्ये बदल झाल्यास सामाजिक परिवर्तन होते.
- नैसर्गिक घटक: नैसर्गिक आपत्ती, भूकंप, त्सुनामी, इ. सामाजिक जीवनावर परिणाम करतात आणि बदल घडवतात.
उदाहरणे:
- भारतात पूर्वी स्त्रिया घरामध्येच असत, परंतु शिक्षणामुळे आज त्या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत.
- तंत्रज्ञानामुळे लोकांचे जीवनमान सुधारले आहे, परंतु त्यामुळे काही नवीन समस्याही निर्माण झाल्या आहेत.
निष्कर्ष:
सामाजिक परिवर्तन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. हे अनेक घटकांनी प्रभावित असते आणि त्याचे परिणाम समाजावर विविध प्रकारे दिसून येतात.