शेती रस्ता तलाठी अर्ज तहसीलदार कृषी

शेती रस्त्यासाठी तहसीलदारांना अर्ज कसा लिहावा?

2 उत्तरे
2 answers

शेती रस्त्यासाठी तहसीलदारांना अर्ज कसा लिहावा?

5
📝 _*शेत रस्त्यासाठी अर्ज कसा करायचा?*_

🔰📶 *महा डिजी । शेती*
✅ जमिनीची जसजशी विभागणी होत आहे, तसंतसं शेत रस्त्यांची मागणी वाढत आहे.

🖊️ *अर्ज कसा करायचा?*

👉 शेतकऱ्याला स्वत:च्या शेतजमिनीमध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसेल, तर *महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३* अन्वये नवीन रस्त्यासाठी अर्ज करता येतो. हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो.

✒️ यासाठी शेतकऱ्यांना तहसिलदारांकडे एक लेखी अर्ज करावा लागतो.

👇 *अर्जाचा नमुना:*

प्रति,

मा तहसिलदार साहेब,
(तालुक्याचं नाव)

*अर्ज -* महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 अन्वये मी शेत रस्त्यासाठी अर्ज करत आहे.

*विषय -* शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत.

अर्जदाराच्या जमिनीचा तपशील-

नाव - गाव - जिल्हा -

गट क्रमांक -... क्षेत्र -... हे.आर., आकारणी -.... रुपये (कराची रक्कम)

लगतच्या शेतकऱ्यांची नावं आणि पत्ता -

इथं अर्जदाराच्या शेतजमिनीच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला ज्या शेतकऱ्याची जमीन असते त्यांची नावं आणि पत्ता लिहिणं अपेक्षित असतं.

*त्यानंतर मायनामध्ये तुम्ही असं लिहू शकता...*

मी ...., ... येथील कायम रहिवासी आहे. ... येथील गट क्रमांक --- मध्ये माझ्या मालकीची --- हेक्टर आर शेतजमीन आहे. सदरहू जमिनीमध्ये जाणं-येणं करण्यासाठी गाव नकाशावर रस्ता नाही. त्यामुळे शेतात बैलगाडी-ट्रॅक्टरमधून शेती अवजारं, बी-बियाणं आणि रासायनिक खतं नेण्यास अडचण निर्मान होत आहे. तसंच शेतातील माल सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, गहू, हरबरा, घरी आणण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.

तरी .....येथील  गट क्रमांक --- मधील पूर्व-पश्चिम धुऱ्याच्या हद्दीवरून गाडीबैल शेतात नेणे व घरी आणणे करता येईल, असा कायमस्वरूपी शेत रस्ता मंजूर करण्यात यावा, ही विनंती मी आपणास करत आहे.

आपला विश्वासू,
...................

📑 *अर्जासोबत जोडावी लागणारी कागदपत्रे:*

▪️अर्जदाराच्या जमिनीच्या आणि ज्या लगतच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या जमिनीचा कच्चा नकाशा
▪️अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षांतील (तीन महिन्याच्या आतील) सातबारा
▪️लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
▪️अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती.

💁‍♀️ *अधिक माहिती:*

👉 एकदा का शेतकऱ्यानं अर्ज दाखल केला की अर्जदार आणि ज्या शेतकऱ्याच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे, त्या सर्वांना नोटीस काढून त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येते.
👉 तसंच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी खरोखरच रस्त्याची आवश्यकता आहे काय, याची तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्यात येते.
👉 ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार रस्ता मागणीच्या अर्जावर निर्णय देतात, आदेश पारित करतात.
👉 एक तर ते रस्ता मागणीचा अर्ज मान्य करतात किंवा फेटाळतात. अर्ज मान्य केल्यास लगतच्या हद्दीच्या बांधावरून रस्ता देण्याचा आदेश पारित केला जातो. त्यावेळेस लगतच्या शेतकऱ्याचे कमीत कमी नुकसान होईल, असं पाहिलं जातं.

💁‍♂️ सामान्यपणे 8 फूट रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो. म्हणजेच एका वेळेस एक बैलगाडी जाऊ शकेल, इतका रस्ता दिला जातो.

🤨 *शेतकऱ्याला आदेश मान्य नसल्यास:*

👉 तहसीलदारांचा आदेश शेतकऱ्याला मान्य नसल्यास आदेश प्राप्त झाल्यापासून 60 दिवस म्हणजे दोन महिन्यांच्या आत उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल करता येते किंवा एका वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयात दावा करता येतो.
उत्तर लिहिले · 30/9/2020
कर्म · 569245
0

अर्ज कोणाला करायचा: अर्ज तहसीलदारांना करायचा आहे.

विषय: शेती रस्त्यासाठी अर्ज

अर्ज कसा लिहायचा:

  1. तुमचे नाव आणि पत्ता: तुमचा संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहा.
  2. अर्ज करण्याची तारीख: ज्या तारखेला अर्ज करत आहात ती तारीख लिहा.
  3. विषय: "शेती रस्त्यासाठी अर्ज" असा विषय लिहा.
  4. आपली समस्या सांगा:
    • आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे अडचणी येतात हे स्पष्टपणे सांगा.
    • existing रस्त्याबद्दल माहिती द्या (उदा. तो रस्ता किती लांब आहे, कोणत्या गावांमधून जातो).
    • नवीन रस्त्याची गरज का आहे, हे सांगा.
  5. आवश्यक कागदपत्रे:
    • जमिनीचा नकाशा: आपल्या जमिनीचा नकाशा अर्जासोबत जोडा.
    • Land Record (७/१२ उतारा): जमिनीचा Land Record (७/१२ उतारा) अर्जासोबत जोडा.
    • आधार कार्ड: आपले आधार कार्ड अर्जासोबत जोडा.
  6. विनंती:
    • तहसीलदारांना रस्ता उपलब्ध करून देण्याची विनंती करा.
    • लवकरात लवकर कार्यवाही करण्याची विनंती करा.
  7. सही: अर्जदाराची सही आणि नाव लिहा.

अर्ज कोठे जमा करायचा: अर्ज तहसील कार्यालयात जमा करा.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

निवेदनाचे प्रमुख दोन प्रकार स्पष्ट करा?
माझ्या शेतात तलावाच्या पाण्याचा मार्ग एका व्यक्तीने माती टाकून अडवला आहे, तर मी काय करू? कुठे अर्ज करू?
निवेदन म्हणजे काय?
अर्ज लेखन म्हणजे काय?
धर्मादाय आयुक्तांकडे संस्था रजिस्ट्रेशन साठी करावयाचा अर्ज?
अंशकालीन उमेदवार म्हणून नोंदणी करता येते काय?
5) मतदार यादीतील मतदाराच्या नावाबद्दल हरकत घ्यावयाची झाल्यास कोणता फॉर्म भरावा लागतो ?