2 उत्तरे
2
answers
पोलीस पाटील यांची गावामध्ये कोण कोणती कामे असतात?
5
Answer link
💐पोलीस पाटील💐
प्राचीन काळापासुनगावचा कारभार सांभाळण्यासाठी गाव प्रमुखाची महत्वाची भुमिका असायची त्या भुमिकेतील व्यक्ती कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक समस्या सोडवण्यातही सहभागी असायची.महाराष्ट्रात शिवरायांच्या काळात गाव पातळीवरील मुख्य व्यक्ती म्हणुन "पाटील"हे पद अस्तित्वात होते या पदावर सहसा कर्तृत्ववान,शुर व धाडसी व्यक्तीच असायची, गावगाडा चालवत असताना न्यायपुर्ण वर्तणुकीमुळे अनेक पाटील हे इतिहासात अजरामर झाले.
इंग्रजांच्या काळात गाव पातळीवरील कायदा सुव्यवस्था व महसुल यावर देखरेख करण्याचे कार्य तत्कालीन समर्थ व्यक्तीकडे आले ब्रिटीशांनी या घटकाना कायदेशीर मान्यता देण्यासाठी 1967 साली ग्राम पोलीस अधिनियम अमलात आणला व पोलीस पाटील या शासनाच्या गावपातळीवरील शेवटच्या घटकाच्या पदाची निर्मिती झाली.
त्यानंतर एका पिढीकडुन दुसर्या पिढीकडे हे पद वारसा परंपरेने चालत राहीले, त्यावेळी पाटलाना शेतसारा वसुल करणे, सामान्य तक्रारींचा न्यायनिवाडा करणे त्यासाठी गावपातळीवर पंच कमिटी नेमणे हे कार्य पाटील करत असे. साधारण त्या काळातील पाटील हा एकटाच सरपंच,ग्रामसेवक,तलाठी, कृषीसहायक, व पोलीस यांचे कार्य गाव पातळीवर करत असे.तसे त्याना अधिकार ही होते, या कामात त्यांना कोतवाल किंवा नेमलेले बिगारी सहाय्य करत असत.
15ऑगष्ट1947ला देश स्वतंत्र झाल्यावर ब्रिटीशांनी केलेले बरेच कायदे रद्द करणेत आले त्यात ग्राम पोलीस अधिनियम हा ही होता,त्यानंतर महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्था अंमलात आली व ऐतिहासिक असलेले पोलीस पाटील या पदाचे विकेंद्रीकरण होऊन ग्रामपंचायत ,सरपंच,सदस्य ही व्यवस्था अस्तित्वात आली व पोलीस पाटील हे पद आपोआपच कालबाह्य ठरत गेले. त्यात बरेच पोलीस पाटील राजकारणात गेले व यशस्वीही झाले व बर्याच पोलीस पाटलांनी या पदाला पुन्हा मान्यता मिळावी म्हणुन शासन दरबारी सातत्यपुर्ण पाठपुरावा केला म्हणुन 1967 ला पुन्हा ग्रामपोलीस अधिनियम हा कायदा संमत करण्यात आला व त्यानुसार स्वतंत्र महसुली गावांना पोलीस पाटील नेमण्यात आले, त्यांचा उपयोग गाव पातळीवर महसुल व पोलीस प्रशासनाला नियमीत होत गेला.
महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967चा अधिनियम क्रमांक 86 अन्वये पोलीस पाटील गावपातळीवर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या आदेशान्वये कार्य करत असतात त्यामध्ये कार्यकारी दंडाधिकारी गावपातळीवरील जी माहीती व पत्रके मागवतील ती पुरविणे, गावातील अपराधांचे प्रमाण व समाज स्वास्थ्य याबाबत माहीती पुरविणे, पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहीती देणे, सार्वजनिक शांततेत बाधा पोहचणार नाही यासाठी आवश्यक माहीती अधिकारी यांना पुरविणे, गावच्या हद्दीत गुन्हा घडु नये व लोकांना उपद्रव होऊ नये म्हणुन बंदोबस्त करणे व आपल्या हद्दीतील गुन्हेगारांचा शोध घेऊन न्यायालयासमोर हजर करणेस मदत करणे इत्यादी कामे पोलीस पाटील करतात.
कायद्यात तरतुद असलेल्या या कामांबरोबरच गावातील सण,उत्सव,यात्रा, राजकारण, निवडणुका या सर्वच घडामोडीवर पोलीस पाटील लक्ष ठेउन असतात. पोलीस पाटील या नेमणुकीवरील व्यक्ती ही त्याच गावची असल्याने सर्वाना ओळखत असते.गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक ,बेकायदेशिर व्यवसाय करणारे, अवैध्य धंदेवाले, याबद्धल पुर्ण माहीती ही पोलीस पाटलाना असते,व ती तात्काळ पोलीस प्रशासनाला दिल्याने अवैध धंद्यावर कारवाई करणे सोपे जाते. ग्रामपंचायत व वेगवेगळ्या निवडणुकांच्या काळात पोलीस पाटील गावपातळीवरील हालचालींबाबत पोलिस प्रशासनाला माहीती उपलब्ध करुन देत असतो. त्यामुळे भविष्यातील निर्माण होणार्या संघर्षाला वा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यास उपयोग होतो.. बरेचदा परप्रांतातुन गुन्हा करुन गुन्हेगार अगदी गावापर्यंत फरार होऊन लपण्यासाठी येतात व बिनबोभाट राहत असतात. पोलीस पाटील गावातच रहात असल्याने अशा स्वरुपाचे भाडेकरू म्हणुन राहत असलेल्या व्यक्तींचा तपास लावून बरेच गुन्ह्यांचा शोध लावण्यास प्रशासनास मदत करतो.
पुर ,भुकंप, गारपिट व अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत माहीतगार म्हणुन पोलीस पाटलांचा उपयोग होतोच त्याचबरोबर जातीय धार्मिक तेढ,गाव पातळीवर भ्रष्ट कारभार , गुंडगिरी यासारख्या प्रकाराना आळा घालणेसाठी पोलीस पाटील उपयोगी ठरलेले आहेत व राहतील.
🙏

0
Answer link
पोलीस पाटील हे गावातील एक महत्त्वाचे पद आहे. त्यांची कामे खालीलप्रमाणे:
- कायदा व सुव्यवस्था राखणे: गावात कोणताही गुन्हा घडू नये, यासाठी दक्षता घेणे.
- गुन्ह्यांची माहिती देणे: गावात गुन्हा घडल्यास, त्याची माहिती तात्काळ पोलिसांना देणे.
- वाद मिटवणे: गावातील छोटे-मोठे वाद मिटवण्याचा प्रयत्न करणे.
- शांतता राखणे: गावात शांतता व सुव्यवस्था राखणे.
- सरकारी कामात मदत करणे: सरकारकडून येणाऱ्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यात मदत करणे.
- महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा: गावात महत्वाच्या व्यक्ती (उदा. मंत्री, मोठे अधिकारी) आल्यास, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे.
- गावातील समस्यांची माहिती देणे: गावाला भेडसावणाऱ्या समस्यांविषयी सरकारला माहिती देणे.
- नैसर्गिक आपत्तीत मदत: गावात पूर, आग, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी लोकांना मदत करणे.
- पोलिसांना मदत करणे: आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करणे.
- ग्रामसभा आणि बैठका: ग्रामसभा आणि इतर बैठकांमध्ये भाग घेणे.
अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: महाराष्ट्र शासन