बँक खात्यांचे प्रकार कोणते?
बँक हि एक वित्तीय संस्था असते, जी ठेव स्वरुपात रक्कम स्विकारते व ती कर्ज स्वरुपात वाटप करते व त्यातून उत्पन्न निर्माण करते.
बँक खात्याचे प्रकार:-
बँकांमध्ये साधारणपणे खालील प्रकारचे खाते असतात .
१. बचत खाते (Saving Account)
२. चालू खाते - (Currant Account)
३. मुदत ठेव खाते (Term Deposit Account)
१. बचत खाते :-
- बचत खात्यामध्ये खातेदार बँकेमध्ये गरजेनुसार रक्कम जमा करू शकतो व गरजेनुसार रक्कम काढू शकतो.
- साधारणतः बचत खात्यामध्ये ठेवण्यात आलेल्या ठेवीवर खातेदारास ४% ते ६% व्याज मिळते.
- बचत (सेविंग) खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास चेकबुक एटीएम, एसएमएस बँकिंग, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग इत्यादी सुबिधा मिळतात.
- चालू खाते हे विशेषतः वित्तीय संस्था, कंपनी, व्यवसाय यांचा उपयोगास्ठी असते.
- बचत खात्याच्या तुलनेत चालू खातेदारास एका महिन्यात ठराविक संखे इतकिच व्यवहार करावा असे बंधन नसते.
- साधारणतः चालू खातेदारास खात्यामध्ये जमा असलेल्या रक्कमेवर व्याज मिळत नाही.
- मुदत ठेव खात्यामध्ये निश्चित काळासाठी ठराविक व्याज दराने रक्कम भारता येते.
- मुदत ठेव खात्यावर व्याज हे खातेदाराने जमा केलेल्या रक्कमेवर, मुदत ठेवच्या कालावधीवर आधारित असते.
- बँकांमध्ये मुदत ठेव रक्कमेवर कर्ज घेण्याची सुबिधा उपलब्ध असते. साधारणतः मुदत ठेव खात्यामध्ये ठेवलेल्या रक्कमेच्य ७०% ते ९०% कर्ज मिळते.
- मुदत ठेव खाते उघडते वेळी मुदत ठेव पूर्ण होण्याच्या ठरलेल्या तारखे पूर्वी रक्कम काढावयाची असल्यास बँकेच्या नियमानुसार काही प्रमाणात दंड आकारण्यात येतो.
बँक खात्यांचे विविध प्रकार आहेत, जे आपल्या गरजेनुसार निवडता येतात.
1. बचत खाते (Saving Account):
हे खाते सामान्यपणे पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी वापरले जाते. या खात्यावर बँक काही प्रमाणात व्याज देते.
2. चालू खाते (Current Account):
हे खाते व्यापारी आणि व्यावसायिक लोकांसाठी उपयुक्त आहे. यात पैसे काढण्याची आणि जमा करण्याची मर्यादा नसते. या खात्यावर व्याज मिळत नाही.
3. मुदत ठेव खाते (Fixed Deposit Account):
या खात्यात ठराविक कालावधीसाठी पैसे जमा केले जातात. यावर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळते.
4. आवर्ती ठेव खाते (Recurring Deposit Account):
या खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा केली जाते. मुदत पूर्ण झाल्यावर व्याजासहित पैसे मिळतात.
5. डिमॅट खाते (Demat Account):
हे खाते शेअर्स आणि इतर सिक्युरिटीज इलेक्ट्रॉनिक स्वरूपात ठेवण्यासाठी वापरले जाते.
6. NRI खाते (NRI Account):
हे खाते अनिवासी भारतीयांसाठी (Non-Resident Indian) असते. यात NRE (Non-Resident External) आणि NRO (Non-Resident Ordinary) असे दोन प्रकार असतात.
अधिक माहितीसाठी, आपण बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.