नोकरी औद्योगिक ट्रेनिंग मनुष्यबळ

माझी जॉब प्लेसमेंट कंपनी आहे. मला काही आयटीआय डिप्लोमा वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन मुले आणि मुली यांची लिस्ट पाहिजे होती, तर मी कशी मिळवू?

5 उत्तरे
5 answers

माझी जॉब प्लेसमेंट कंपनी आहे. मला काही आयटीआय डिप्लोमा वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन मुले आणि मुली यांची लिस्ट पाहिजे होती, तर मी कशी मिळवू?

6
आपण एखादी पोस्ट/मेसेज(संदेश)तयार करा व तो आजच्या दिनांकासह शेअर करा.आजकालच्या ज्या नोकरी विषयक संस्था आहेत त्या कित्येक बेरोजगार तरुणांना कामाचे आमिष दाखवून,गोड बोलून लुबाडत आहेत.पण तुमच्या संस्थेमध्ये असे काय विशेष आहे हे तरुणांना सांगण्यासाठी त्या पोस्ट मध्ये
खालील गोष्टी नमूद करा:

तुमच्या संस्थेविषयी माहिती
तुमच्या संस्थेची वैशिष्ट्ये,
शिक्षणाची अट(उदा;10 वी,12 वी,ITI ट्रेड इ.)
वयाची अट,
तुम्ही देत असलेल्या सुविधा-सवलत,
★किमान वेतन(कामाचे तास×दिवस),
★फसवणूक होणार नाही याची खात्री,
★कायमस्वरूपी काम मिळेल याची हमी,
इतर संस्था ज्या गोष्टी,सवलती कामगारांना देत नाहीत असे काही विशेष सवलती तुम्ही देता असे दाखवा.
तुमच्या ऑफिसचा पत्ता(भेटण्याची वेळ)व संपर्क क्रमांक
त्याचप्रमाणे तुमचे ज्या ठिकाणी(कंपन्यांमध्ये)लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल त्या परिसरामध्ये(कायदेशीर रित्या-ज्या ठिकाणी जाहिरात लावण्यास मनाई आहे त्या ठिकाणी जाहिरात लावू नये.)काही पॉम्प्लेट, जाहिराती छापून लावल्यास कामाच्या शोधात आलेले तरुण तुमच्याशी संपर्क साधतील.

  • यामुळे तुम्हाला कामगार मिळतील व बेरोजगारांना काम मिळेल.जेवढे जास्त तुमच्याकडे कामगार असतील तेवढे कमिशन तुम्हाला मिळेल.प्रथमतः तुम्ही कामगारांचे अटी पूर्ण करा कामगार तुमचे स्वप्न पूर्ण करतील.यामुळे तुमच्या संस्थाच एक ब्रँड बनेल.
(उदा.इतर संस्थांपेक्षा तुम्ही 10 रुपये जास्त दिले तर जास्तीत जास्त कामगार तुमच्याकडेच येतील.ही अधिकची रक्कम तुम्ही वेतनच्या ठिकाणी भत्ता/बोनस म्हणून देऊ शकता.ज्यामुळे कामगार आकर्षित होतील व तुमच्याशी संपर्क साधतील व त्यांच्याही मित्रांना तुमची संस्था जॉईन करण्याचा सल्ला देतील.)
काही वेळा असेच काही पोस्ट सोशल मीडियावर फिरत असतात त्यावर तारीख लिहिलेली नसते.त्यामुळे कामगारांची पूर्तता झाल्यानंतर ही काहीजण त्याच नंबर वर सतत कॉल करत असतात.

एक सल्ला माझ्याकडून- कोणत्याही कामगारांचे शोषण व फसवणूक तुमच्याकडून होता कामा नये.
मागेल त्याला काम-मागेल तिथे काम(पात्रतेनुसार) असे तुमच्या संस्थेचे धोरण ठेवा.
नक्कीच तुमची संस्था एक ब्रँड बनेल.
उत्तर लिहिले · 21/2/2019
कर्म · 569245
3
खरं तर जॉब प्लेसमेंट म्हणजे शुद्ध दलाली, अशांनाच जॉब नसतो, मग करा लुटालूट दुसऱ्यांची...पैसे घेऊन देतात काही कंपन्यांचे पत्ते आणि गरजू लोक फेऱ्या घालून घालून लागले कुठे तर लागतात त्यांच्या नशिबाने...
दुसरं काय.
उत्तर लिहिले · 22/2/2019
कर्म · 6225
0
तुमच्या जॉब प्लेसमेंट कंपनीसाठी आयटीआय डिप्लोमा वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन मुले आणि मुलींची लिस्ट मिळवण्यासाठी तुम्ही खालील मार्ग वापरू शकता:

1. शासकीय ITI संस्था:

  • जवळच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Industrial Training Institute - ITI) मध्ये संपर्क साधा.
  • प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Placement cell मधून मिळवा.
  • उदाहरणांसाठी काही ITI संस्था:
    ITI संस्थांची यादी

2. खाजगी ITI संस्था:

  • खाजगी ITI संस्थांमध्ये संपर्क करून विद्यार्थ्यांविषयी माहिती मिळवा.
  • प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना विचारणा करा.

3. रोजगार मेळावे (Job Fairs):

  • स्थानिक रोजगार मेळाव्यांमध्ये सहभागी व्हा.
  • ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खास भरती मोहीम आयोजित करा.

4. ऑनलाइन पोर्टल्स:

  • नोकरी शोधण्यासाठी काही ऑनलाइन पोर्टल्स आहेत, जिथे ITI धारक उमेदवार अर्ज करू शकतात:
  • NCS (National Career Service): NCS Portal

5. वृत्तपत्रे आणि जाहिरात:

  • स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आणि वेबसाइटवर जाहिरात देऊन तुम्ही ITI धारकांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करू शकता.

6. थेट भरती मोहीम:

  • ITI संस्थांच्या कॅम्पसमध्ये थेट भरती मोहीम आयोजित करा.
  • कंपनी प्रोफाइल आणि आवश्यक असलेली माहिती सादर करा.
हे काही मार्ग आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार ITI डिप्लोमाधारक उमेदवार मिळू शकतील.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2400

Related Questions

अंतर्गत सूत्र भरतीचे फायदे तोटे सांगा, मनुष्यबळ नियोजनाचे?
अंतर्गत स्रोत भरतीचे फायदे आणि तोटे सांगा?
मुंबईमध्ये माल विकण्यासाठी माणूस पाहिजे आहे का?
मला कात्रज, पुणे येथे फूडस्टॉलवर काम करण्यासाठी कामगार पाहिजे आहेत, कुठे मिळू शकतील?
एचपी मॅन पॉवर कॉर्पोरेशन बद्दल माहिती मिळेल का?
नगर रोड परिसरात ऑफिस बॉय कामगार कुठे पाहिजे आहेत का?
ठाण्यात परमनंट करणार्‍या कोणत्या कंपन्या आहेत?