समाजशास्त्र शब्दाचा अर्थ संस्कृती सामाजिक अभ्यास

विविधतेतील एकता बद्दल माहिती मिळेल का?

3 उत्तरे
3 answers

विविधतेतील एकता बद्दल माहिती मिळेल का?

5
आपला देश हिमालय ते कन्याकुमारी,कच्छ ते नागलन्ड ,बंगाल उपसागर- हिंद महासागर-अरबी समुद्र असा खंडप्राय असलेने सर्वप्रकारच्या एकुणएक (निसर्ग,जमीन,पाणी,हवामान,डोंगर,राज्ये,धर्म,भाषा,बोली,चालीरीती,खाणेपिणे,सण उत्सव इ.इ. कोणतीही बाब)"विविधतेने नटलेला" आहे. परंतु देश म्हणून सर्व "भारतीय" 1 एक(no.one)आहेत            हि वस्तूस्थिती आपल्या "घटने"Constitutionमुळे आहे .आपल्या लिखित घटनेनुसार देश एक संघराज्य आहे,त्यातील घटकराज्य/प्रदेश हे कोणत्याही कराराने वा अटीमुळे अंतर्भूत नाहीत तर स्वेच्छा एकत्र घटक आहेत.(thnks to man of unity & to Constitution frameworkers) देशात एकच नागरिकत्व आहे,घटकराज्याना स्वतंत्र नागरिकत्व नाही.घटनेप्रमाणे देश Sovereign,Socialist,Secular,Democratic Republic आहे. परंतु याबरोबर वैचारिक,भाषिक,धर्म,पूजा ,आचारविचार याचे स्वातंत्र्य आहे,ते राष्ट्राची Unity ,Integrity अबाधित ठेवून,कायदे,विधिलिखी पाळून/अंमल बजावणी करून. घटनेतील अधिकार व कर्तव्ये ,मूलभूत हक्क हे या Unity, Integrity ला बांधील !! म्हणूनच भारत विविधतेतून एक आहे. अर्थातच हा वारसा आपल्याला निसर्गदत्त व पुराणापासून(भरत वर्ष)लाभलेला.                                       निसर्ग,भौगोलिकस्थान, पर्यावरण या दृष्टीने देखील देश जगातील" सर्वात समृद्ध जैवविविधता" Bidiversity Hot Spot आहे.जैवविविधता/अन्नसाखळीच्या अति उच्च शिखरावरील प्राण्यासह सर्व जीव एकत्र जतन करणारा देश आहे . राष्ट्रप्रेमाचे बाबतीत आपले लष्कर हे विविधतेतूनही Unite & Unique आहे. लष्करामध्ये शीख,मराठा,गुरखा, महार,डोग्रा ..अशा विविध रेजिमेंट्स आहेत परंतु त्यामधील कार्यरत जवान/अधिकारी हा कोणत्याही राज्य,प्रदेश,धर्म,भाषा, जात.... इ चा असला तरी त्या रेजिमेंटचे नावाने ओळखला जातो व फक्त एकीने देशासाठी राबतो,लढतो,शहीद ही होतो. सामान्य नागरिकाने ही विविधतेतून एकी जपली पाहिजे.
उत्तर लिहिले · 22/2/2019
कर्म · 4010
1
      धर्म आणि राष्ट्र या दोन संकल्पना परस्परांपासून पूर्ण भिन्न आहेत. परंतु अलीकडे काही विचारवंत (?) या दोन्ही संकल्पना जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशा प्रकारचा विचार जाणीवपूर्वक मांडत आहेत. परिणामी एकाच राष्ट्रात राहणाऱ्या भिन्न-भिन्न धर्मीय व्यक्तींच्या मनात एकमेकांसंबंधी दिवसेंदिवस अविश्वास आणि तिरस्काराची भावना वाढीस लागते आहे. अर्थात त्याचे वाईट परिणाम अनेक बाजूंनी त्या-त्या राष्ट्रावर होत असतात. 

धर्म म्हणजे दिव्यशक्तीच्या अस्तित्वावर पूर्ण श्रद्धा व्यक्त करून त्या शक्तीची आपल्यावर कृपा राहावी म्हणून मानवाने ठरवून घेतलेली एक विशिष्ट आचारपद्धती असते, असे धर्मसंस्थेचे स्वरूप जेम्स फ्रेजर यांच्यासारखा स्कॉटीश मानवशास्त्रज्ञ आपल्या ‘Golden Bough’(सोनेरी फांदी) या जगप्रसिद्ध बृहद ग्रंथात स्पष्ट करतो, तर राष्ट्र ही संकल्पना स्वसमूहश्रेष्ठतावादावर उभी असते. एकच भूप्रदेश आणि एकच शासनव्यवस्था ही राष्ट्र संकल्पनेची प्रमुख आधारस्थाने असतात.
‘राष्ट्र’ ही संकल्पना अनेक मानवतावादी विचारवंतांनी कालबाह्य ठरवून टाकली आहे. जगप्रसिद्ध विचारवंत बट्राँर्ड रसेल यांच्यापासून ते अगदी डॉ. राधाकृष्णन यांच्यापर्यंत अनेक विचारवंतांना ‘राष्ट्र’ ही संकल्पना प्रभावीत करू शकलेली नाही! ‘राष्ट्र’ ही संकल्पना मानवी समाजास संघर्ष-युद्ध करण्यास प्रवृत्त करते आणि त्यातूनच सामान्य मानवाच्या सुखा-समाधानाचा ऱ्हास होण्यास आरंभ होतो. एकाच राष्ट्रात अनेक धर्म असू शकतात, नव्हे असतातच! याउलट एकाच धर्माचे अनुयायी वेगवेगळ्या राष्ट्राचे नागरिक असू शकतात, नव्हेत आहेतच! त्यामुळे मुळातच राष्ट्र ही संकल्पना मानवाच्या अंतिम सुखाला, शांतीला बाधा आणीत असते. त्यामध्ये आपण ‘एक धर्म एक राष्ट्र’ असा विचार मांडू लागलो तर संपूर्ण मानव जमात सुखशांतीपासून कित्येक योजने दूर राहील! 
भारतात गेली अनेक शतके वेगवेगळ्या धर्माच्या सत्ताधीशांनी आपली हुकूमत गाजविली; परंतु त्याही परिस्थितीत काही अपवाद वगळता भारताने विविधतेतून एकता प्राणपणाने जपली आहे. त्यामुळे ‘अकबर हा थोर नव्हता’ अशा ग्रंथांना फारसा अर्थ नसतो. पंडित जवाहरलाल नेहरूंसारख्या या देशाच्या पहिल्या पंतप्रधानांना या विविधतेतील एकतेचा नेहमीच अभिमान आणि कौतुक वाटत असे. त्या संदर्भातील अनेक पुरावे त्यांच्या ‘Discovery of India’ या प्रसिद्ध ग्रंथात पानापानांवर वाचावयास मिळतात.
प्रकांड पंडित वासुदेवशरण अग्रवाल यांनी तर या संदर्भात ‘भारत की मौलिक एकता’ हा ग्रंथ सादर केला आहे. साने गुरुजींची ‘श्यामची आई’ महाराष्ट्रात घरोघरी पोहोचली आहे; परंतु त्यांचा ‘श्यामची पत्रे’ हा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा मौलिक विचार मांडणारा ग्रंथ जाणीवपूर्वक उपेक्षित ठेवला गेला आहे. याखेरीज डॉ. रा. ​चिं. ढेरे यांचा ‘मुसलमान मराठी संतकवी’ हा ग्रंथ नव्या स्वरूपात ‘एकात्मतेचे शिल्पकार’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे, त्याची दखल आपणास या संदर्भात घेणे गरजेचे आहे. डॉ. अमर्त्य सेन यांच्यासारखे नोबेल पारितोषिक विजेते विचारवंत आपल्या ‘The Argumentative India’आणि ‘Identity And Violence’ यासारख्या अभिजात ग्रंथांमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश जीवाचे रान करून देत आहेत. तो आपण समजावून घेण्यात केवळ आपलेच नव्हे तर साऱ्या जगाचे कल्याण आहे

विविधतेत एकता’ हे पूर्वीपासूनच भारतीय समाजाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे जे आपल्याला १८५७च्या उठावात प्रकर्षाने दिसून येते. व्यापाऱ्यांच्या
वेषात भारत देश लुटण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी जेव्हा देशावर कब्जा करायला सुरुवात केली, तेव्हा विविध धर्माच्या संस्थानिकांनी–स
पुकारलेलं बंड म्हणजे १८५७चा उठाव. तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, नानासाहेब पेशवे, कुंवरसिंह हे हजारो लोकांना सोबत घेऊन ब्रिटिशांविरोधा त लढले. या लढ्याचं नेतृत्व तेव्हाचे दिल्लीचे बादशहा बहादुरशहा जफर यांनी केलं.
या लढ्यात ब्रिटिशांसमोर सर्वात मोठं आवाहन होतं ते हिंदू–मुस्लिम एकतेचं. म्हणून त्यापुढे त्यांनी भारतावर राज्य करण्यासाठी नवीन धोरण अवलंबलं – फोडा आणी राज्य करा.
ब्रिटिशांनी इथल्या विविधतेचा वापर करून लोकांमधे फूट पाडली. कधी हिंदूंना तर कधी मुसलमानांना जवळ करून ब्रिटिशांनी दोन्ही धर्मातील धर्मांध व सांप्रदायिक शक्तींना प्रोत्साहन दिले. सांप्रदायिक दृष्टीकोनातून भारताचा इतिहास रचला आणि त्याचा प्रसार केला. धर्माचं आणि भाषेचं राजकारण करून हिंदू–मुस्लिमां ना एकमेकांच्या विरोधात उभं केलं. तसंच ‘हिंदू आणि मुस्लिम समाजांचे हितसंबंध वेगवेगळे आहेत’ असा अपप्रचार स्थापित करून शेकडो वर्षांची “मिली-जुली संस्कृती” तोडण्याचा प्रयत्न केला. भारतातील काही विशिष्ट घटकांनी इंग्रजांच्या या धोरणांना पूरक असे राजकारण केले. एवढे होऊन सुद्धा भारतीयांच्या या धर्मनिरपेक्ष–एक
ात्मिक लढ्याने इंग्रजांना भारत देश सोडून जाण्यास भाग तर पाडलंच पण स्वतंत्र भारताच्या संविधानामध्ये देखील स्वातंत्र्य लढ्यातील मूल्ये परावर्तित झाली. संविधानामध्ये आश्वस्त केलेले स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता,
र्य, धर्म आणि उपासनेचं स्वातंत्र्य, पोशाख–अन्न–संचार यांचं स्वातंत्र्य देणारं संविधान हे या देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचंच प्रतिबिंब आहे.

मित्र मैत्रिणींनो, देशातील आजची परिस्थिती पाहिल्यावर मात्र संविधानातील मूल्यांना तडा जाताना दिसत आहे. स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांची
भारताबद्दलची स्वप्नं भंग पावताना दिसत आहेत. श्रीमंत-गरीब दरी दिवसेंदिवस वाढत आहे, समाजात तेढ निर्माण होऊन अविश्वासाचे वातावरण तयार होत आहे. देशाची सांस्कृतिक विविधताच धोक्यात पडत आहे.
अशा परिस्थितीत संविधानातील मूल्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. धर्म–जात–भाषा–प
्रांत या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन जनतेत बंधुभाव–एकता वाढीला लावणे, आपल्या “मिली-जुली संस्कृती”च्या समृद्ध वारशाचे जतन करणे, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि मानवतावाद रुजवणे, स्त्रियांचे समाजातील दुय्यमत्व दूर करणे, ही सर्व भारतीयांची कर्तव्ये आहेत. या कर्तव्यांचे पालन करणे हेच देशप्रेम आहे.



उत्तर लिहिले · 20/2/2019
कर्म · 55350
0
विविधतेतील एकता म्हणजे अनेक प्रकारच्या भिन्न गोष्टी असूनही त्यांच्यात एक cohesion (एकसंधता) असणे. भारत देश विविधतेत एकतेचे उत्तम उदाहरण आहे.
  • विविधता: भारतामध्ये विविध धर्म, जाती, भाषा, संस्कृती आणि परंपरा आहेत.
  • एकता: या विविधतेमुळे लोकांमध्ये एकता आणि समभाव टिकून आहे.
विविधतेतील एकतेचे महत्त्व:
  1. सामाजिक समरसता: विविध संस्कृती एकमेकांचा आदर करतात आणि सलोख्याने राहतात.
  2. राष्ट्रीय एकात्मता: देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठी नागरिक एकजूट राहतात.
  3. आर्थिक विकास: विविध कौशल्ये आणि ज्ञान एकत्र येऊन देशाच्या आर्थिक विकासाला मदत करतात.
विविधतेतील एकता टिकवण्यासाठी उपाय:
  • शिक्षण: लहानपणापासूनच मुलांना विविध संस्कृती आणि परंपरांचा आदर करायला शिकवणे.
  • सहिष्णुता: भिन्न मत आणि विश्वासांचा आदर करणे.
  • सामাজিকdialogue(संवाद): वेगवेगळ्या समुदायांमध्ये संवाद वाढवणे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

हळद लावल्यानंतर नवरदेव/नवरीने बाहेर का फिरू नये?
लोकसंस्कृती म्हणजे काय?
लग्नासाठी मुलामुलीची पसंती झाल्यानंतर मराठवाडा भागात मराठा समाजात मुलींकडून कोणकोणत्या परंपरा, कार्यक्रम पार पाडले जातात? सविस्तर सांगावे.
कोणत्या समुदायात लग्नाच्या वेळी मुलाला डुकराचे रक्त प्यावे लागते?
जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून लोक पायी व बैलगाडी करून येतात का?
केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?
योग्य पर्याय सांगा, संस्कृती ही समाजानुसार बदलते का?