कला भाषण सूत्रसंचालन

सूत्रसंचालन कसे करावे माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

सूत्रसंचालन कसे करावे माहिती मिळेल का?

9
सुत्रसंचालनासाठी उपयुक्त टिप्स 

या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल.


" आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे.
   आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे."



" मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे
  माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे".

"  जड़ी जाती तो जड़वा लेता,अंगूठी के नगीने में
    मगर तुम चीज ही ऐसी हो,जो जड़ी मेरे सीने में"


"  दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है
   एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग


"   दोन ओन्डक्याची होते सागरात भेट
    एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट


जळमटाना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे
लोक येतील लाख धावून पण
तुमचे वागणे चांगले पाहिजे

" निसर्गाला रंग हवा असतो
  फुलांना सुगंध हवा असतो
  आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार
  परंतु त्यांना तुमच्या  टाळ्यांचा कड़कड़ाट हवा असतो"

" चंद्राला जशी चांदन्याची
साथ समुद्राला जशी किनार्याची साथ
तशी आम्हाला ही हवी आहे
तुमच्या टाळ्यांची साथ


उनके आजानेसे आजाती है मुँह पे रौनक
और वोह समजते है के बीमार का हाल अच्छा है


म्हसोबा पंजोबा पैशाला दोन
पंचमी झाली की पूज

आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मक़ाम आया है
कितने खुशनसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आया है


माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता


पु ल देशपांडे
सुन्दर कल्पना !!
.
एकदा Ego विकून पहा.....
जेव्हा कोणीही घेणार नाही
तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट
आपण इतके दिवस बाळगत होतो...???
.
बोलावे तर विचार करुन....
नाहीतर बडबड सगळेच करतात....
.
ऐकावे तर अंतःकरणातून.....
आरोळी तर सारेच देतात....!
.
टिपावं तर अचूक टिपावं....
नेम तर सारेच धरतात....
.
शिकावं तर माफ करायला....
राग तर सगळेच करतात....!
.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची....
पोट भरुन तर सारेच जेवतात....
.
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...
सुखाचे घोट तर सारेच घेतात...!
.
जगावं तर इतरांसाठी....
स्वतःसाठी तर सगळेच जगतात....
.
ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...
घात तर सारेच करतात...!
.
दुःखामधे सुधा रहावं हसत
वेळ तर सर्वाँचीच येते....
.
झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
राख तर सर्वाँचीच होते....




सूत्रसंचालकाचे काही गुण :-

@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
〰〰〰〰〰〰
कार्यक्रम पत्रिका:-
उदा. व्याख्यान

आगतम् स्वागतम् सुस्वागतम्

1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी
〰〰〰〰〰〰〰

सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण?  याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी

सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..


@सूत्रसंचालकाचे काही गुण:-

1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली


@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी

* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी

@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...
उत्तर लिहिले · 20/2/2019
कर्म · 55350
0

सूत्रसंचालन (स्टेज अँकरिंग) करणे एक कला आहे. प्रभावी सूत्रसंचालनासाठी काही महत्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे:

1. तयारी (Preparation):
  • कार्यक्रमाची माहिती: कार्यक्रमाचा उद्देश, स्वरूप, वेळ आणि स्थळ याची माहिती करून घ्या.
  • उपस्थित मान्यवर आणि वक्ते: कोण प्रमुख पाहुणे आहेत, वक्ते कोण आहेत आणि ते काय बोलणार आहेत याची माहिती मिळवा.
  • स्क्रिप्ट तयार करा: कार्यक्रमाची सुरुवात, मध्य आणि शेवट कसा करायचा याची रूपरेषा तयार करा.
2. सुरुवात (Beginning):
  • उत्स्फूर्त आणि प्रभावी सुरुवात: सुरुवात आकर्षक करा. उदाहरणार्थ, प्रेरणादायक विचार, कविता किंवा मजेदार किस्सा सांगा.
  • श्रोत्यांचे स्वागत: सर्वांचे स्वागत करा आणि कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती द्या.
  • मान्यवरांची ओळख: प्रमुख पाहुणे आणि वक्ते यांची योग्य शब्दांत ओळख करून द्या.
3. कार्यक्रमादरम्यान (During the Program):
  • क्रम सांभाळा: कार्यक्रमाचा क्रम व्यवस्थित ठेवा. वेळेचं भान ठेवा.
  • भाषाशैली: आपली भाषा सोपी आणि स्पष्ट ठेवा. विनोद आणि मनोरंजक गोष्टींचा वापर करा, पण तो tasteful असावा.
  • श्रोत्यांशी संवाद: श्रोत्यांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा. मध्ये मध्ये प्रश्न विचारा किंवा टाळ्या वाजवायला सांगा.
  • वक्त्यांचे योग्य सादरीकरण: प्रत्येक वक्त्याला बोलवण्यापूर्वी त्यांचं योग्यरीतीने महत्व सांगा.
4. शेवट (Ending):
  • सारांश: संपूर्ण कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घ्या.
  • आभार प्रदर्शन: आयोजकांचे, पाहुण्यांचे आणि श्रोत्यांचे आभार माना.
  • प्रेरणादायी शेवट: शेवट सकारात्मक करा.
5. महत्वाचे गुण (Important Qualities):
  • आत्मविश्वास (Confidence): आत्मविश्वास महत्त्वाचा आहे.
  • चांगली संवाद कौशल्ये (Good Communication Skills): तुमची भाषा स्पष्ट आणि प्रभावी असावी.
  • संवेदनशीलता (Sensitivity): श्रोत्यांच्या भावनांची कदर करा.
  • वेळेचं व्यवस्थापन (Time Management): वेळेनुसार कार्यक्रम चालवणे आवश्यक आहे.

टीप: सूत्रसंचालन शिकण्यासाठी, तुम्ही विविध कार्यक्रमांचे निरीक्षण करू शकता आणि अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1780

Related Questions

सूत्रसंचालन करताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
उत्तम सूत्रसंचालनासाठी आवश्यक असणारी कौशल्ये स्पष्ट करा. 'सूत्रसंचालन - एक वलयांकित व्यवसाय' आहे का, याबद्दल माहिती कशी सांगाल?
सूत्रसंचालकाच्या दृष्टीने कार्यक्रम पत्रिकेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे विधान कसे स्पष्ट कराल?
सूत्रसंचालकाने व्यवस्थित पूर्वतयारी केली तरच सूत्रसंचालन उत्तम होऊ शकते, या विधानाची सत्यता पडताळून द्या?
सूत्रसंचालनामध्ये कोण-कोणते गुण आवश्यक असतात ते लिहा?
आवाजाचा आरोह - अवरोह उत्तम सूत्रसंचालनासाठी किती आवश्यक आहे?
सूत्रसंचालन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये कोणती आहेत?