3 उत्तरे
3
answers
विद्युत (वीज) म्हणजे काय? त्याचे प्रकार कोणते?
6
Answer link
*विद्युत*
विद्युत किंवा वीज हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक झाला आहे. वीज वा विजेची कसलीही साधने उपलब्ध नसलेले ठिकाण आपण मनातही आणू शकणार नाही, इतके आपण तिच्यावर अवलंबून आहोत. हिमालयाच्या गिरीशिखरांवर जाणार्या गिर्यारोहकांच्या खिशात बॅटरी असतेच, त्यांच्या हातातील घडय़ाळे विजेच्या सेलवर चालतात व हवामानाची बातमी ते ट्रान्झिस्टरवर ऐकतात.
घर्षणजन्य विद्युत बराच काळ माहीत होती. त्यानंतरचा काळ रासायनिक घटातून निर्माण केल्या जाणाऱ्या विजेचा. व्होल्टचा घट यासाठी प्रसिद्ध झाला. यानंतरची मोठी प्रगती फॅरेडेच्या डायनॅमोनंतरची. विजेचे स्वरूप नेमके काय आहे ?
प्रत्येक पदार्थ अणुंनी बनलेला असतो. अणूतील इलेक्ट्रॉन ऋण, तर प्रोटॉन धन विद्युतभाराचे असतात. या अणूंमधील इलेक्ट्रॉनचा प्रवाह जेव्हा ऋण टोकाकडून धनटोकाकडे वाहू लागतो, तेव्हा त्यालाच आपण विजेचा प्रवाह म्हणतो. मग ती घर्षणजन्य विद्युत असेल वा विद्युतघटातील किंवा वीजकेंद्रातून पुरवली जाणारी वीज असेल. एखादा रबरी फुगा केसांवर घासला व नंतर जवळ धरला, तर केसांवरील भारित अणू आपले इलेक्ट्रॉन पुन्हा ओढून घेऊ पाहतात म्हणून केस उभे राहतात व फुगा हलकेच ओढ घेतो. मुख्य गोष्ट म्हणजे ऋण व धन टोकांना जोडणारे साधन यासाठी उपलब्ध असणे आवश्यक असते. घर्षणजन्य विद्युत जेव्हा निर्माण होते, तेव्हा तिचा वापर व्यवहारात केला जात नाही. फक्त बव्हंशी पदार्थात विद्युत असते, याचाच तो पुरावा असतो.
विद्युतप्रवाह नेहमी इलेक्ट्रॉनमुळेच असतो, असे नाही. उदाहरणार्थ, रासायनिक घटातील द्रावणातून जो प्रवाह जातो, त्यालाही धन वा ऋण आयन कारणीभूत असतात.
अन्य प्रकारची वीज ज्यावेळी वाहकातून म्हणजे तारेतून वाहते, त्याच वेळी तिचा उपयोग नियंत्रित स्वरूपात करता येतो. ज्या पदार्थातून विजेचे उत्तम वहन होते वा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह वेगाने वाहतो, त्यांना उत्तम वाहक (conductors) समजले जाते. याउलट जे पदार्थ या वहनाला प्रतिबंध करतात, त्यांचा उपयोग वाहकांना झाकायला (insulation) केला जातो.
विजेचे मुख्यत: दोन प्रकार वापरात आहेत. डायरेक्ट करंट किंवा फक्त एकाच दिशेने वाहणारा वीजप्रवाह. हा प्रकार बहुतेक सर्व बॅटरीमधील विजेबाबतीत असतो. तर अल्टर्नेटिंग करंट किंवा सतत उलटसुलट वाहणारा प्रवाह हा विद्युतजनित्रात निर्माण होणार्या विजेच्या बाबतीत असतो. दर सेकंदाला होणाऱ्या उलटसुलट बदलांच्या संख्येवरून ए.सी. प्रवाहाची कंपनी व्यक्त होतात. ती हर्ट्झमध्ये सांगितली जातात. विजेचा दाब व्होल्ट्समध्ये, प्रवाह अॅम्पिअरमध्ये, तर उपकरणाची ताकद वॅट्समध्ये व्यक्त करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. योग्य ते उपकरण नेहमी नेमक्या दाबावर व नेमक्या प्रवाहावरच चालते. अन्यथा पूर्ण उपकरणच नष्ट होते किंवा विजेचा प्रवाह खंडित होतो.
एकतर्फी वीज सोडणारे valves वा diodes चा वापर करून सध्या अनेक अद्ययावत उपकरणे बनवली जातात. विजेचा प्रवाह दैनंदिन जीवनात उष्णता, प्रकाश, चुंबकीय क्षेत्रनिर्मिती, आवाजनिर्मिती व वेगनिर्मिती यांसाठी केला जातो. आपल्या दैनंदिन वापरातील कोणतीही वीजउपकरणे यांपैकी कोणत्या प्रकारे काम करतात, याचा आपणच शोध घेऊन बघा ना !
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
0
Answer link
विद्युत (वीज) म्हणजे इलेक्ट्रॉन नावाच्या लहान कणांच्या प्रवाहामुळे निर्माण होणारी ऊर्जा होय. हे कण अणुंच्या भोवती फिरतात.
विद्युतचे मुख्य प्रकार:
- स्थितिक विद्युत (Static Electricity): या प्रकारात विद्युत एकाच ठिकाणी साठलेली असते आणि ती वाहत नाही. उदाहरणार्थ, प्लास्टिकची वस्तू केसांवर घासल्यावर कागदाचे तुकडे आकर्षित होतात, ते स्थितिकList of Electric Charges on Various Materials of Daily Use (eq.institute).
- गतिमान विद्युत (Current Electricity): या प्रकारात विद्युत एका ठिकाणाहून दुसरीकडे वायरच्या माध्यमातून वाहते. आपल्या घरातील उपकरणे याच विजेवर चालतात.
विद्युतचे अन्य प्रकार
- AC (Alternating Current): या प्रकारात विजेचा प्रवाह ठराविक वेळेनंतर आपली दिशा बदलतो.
- DC (Direct Current): या प्रकारात विजेचा प्रवाह एकाच दिशेने वाहतो.
विद्युत आपल्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण ऊर्जा आहे. यामुळे आपले जीवन सुकर झाले आहे.