संगणक भाषा
संगणक प्रणाली
मशीन
मशीन लर्निंग
तंत्रज्ञान
संगणक विज्ञान
मशीन लर्निंग (Machine Learning) म्हणजे काय?
3 उत्तरे
3
answers
मशीन लर्निंग (Machine Learning) म्हणजे काय?
5
Answer link
मशीन लर्निंग हि एक कॉम्पुटर सायन्स या क्षेत्रातील संज्ञा आहे. यामध्ये कॉम्प्युटरला खूप सारा डेटा पुरवला जातो. हा डेटा प्रोसेस करून काम्पुटर(Machine) एक पॅटर्न शिकतो(Learning). मग हा पॅटर्न वापरून नवीन डेटावर काही भाकीत(Prediction) केले जाते.
if(cancerResult == true)
उदाहरण घ्यायचे झाले तर, आपल्याला एखाद्या रुग्णाला कर्करोग आहे कि नाही हे तपासायचे आहे. तर पारंपरिक आणि मशीन लर्निंग वापरून हे कसे करतात ते पाहू.
प्रोग्रॅमिंगची पारंपरिक पद्धत:
यात जी प्रोग्रामिंग केलेली असते ती एक प्रकारची नियमांवर आधारित असते. जसे कि जर शरीरात रक्तपेशी प्रमाणापेक्षा जास्त असतील, प्लेटलेट्सची संख्या ठराविक प्रमाणापेक्षा जास्त असेल, व इतर काही टेस्ट्स पॉसिटीव्ह आल्या तर त्या व्यक्तीला कर्करोग आहे असे सांगितले जाते.
hasCancer(rbcCount, platelets, labResult)
{
int rbcThreshold = 100000; // Any medically approved number
int platelatesThreshold = 200000;
return rbcCount > rbcThreshold && platelets > plateletsThreshold && labResult == true;
}
if(hasCancer(100000, 1200, false))
{
print("Patient has cancer");
}
else
{
print("Patient has no cancer");
}
प्रोग्रामिंगची मशीन लर्निंग पद्धत:
यात तुम्हाला याआधी कर्करोग झालेल्या हजारो लोकांचे मेडिकल रिपोर्ट दिले जातील. हे रिपोर्ट तुम्ही मशीन लर्निंग अल्गोरिथमला देणार. हा अल्गोरिथम तुम्हाला एक पॅटर्न सांगणार. हा पॅटर्न वापरून तुम्ही नवीन रुग्णाला कर्करोग आहे कि नाही हे सांगणार. या पद्धतीतदेखील प्रोग्रामिंग करावी लागते ,पण ती पारंपरिक पद्धतीसारखी हार्ड कोडेड नसते. मशीन लर्निंग पद्धतीती डेटा हा सर्वात महत्वाचा घटक असतो.
data = ['patient1data', 'patient2data'] // All data collected so far
algorithm = machineLearningAlgorithm() // E.g. LogisticRegression
pattern = algorithm.train(data); // Train on the old data
newPatient = 'patient3data';
cancerResult = pattern.predict(newPatient);
if(cancerResult == true)
{
print("Patient has cancer");
}
else
{
print("Patient has no cancer");
}
1
Answer link
मशीन लर्निंग (Machine Learning) म्हणजे काय?
मशीन लर्निंग मध्ये आकडेवारी किंवा गणित प्रतिमा वापरून संगणकाला शिकवले जाते जेणेकरून संगणकाला कोणतीही कमांड न देता तो स्वतः काम करू शकेल. डेटा मधल्या मूल्यांचे विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे यासाठी अल्गॉरिथ्म आणि संख्या एक मॉडेल्स याचा वापर करून स्पष्ट निर्देशांचे पालन न करता ते शिकणे आणि जुळवून घेणे यासाठी सक्षम असलेला संगणक प्रणालींचा वापर आणि विकास या सॉफ्टवेअरद्वारे केला जातो.
मशीन लर्निंग हे प्रोग्रॅमिंगचे एक असे आधुनिक तंत्र आहे, ज्याद्वारे संगणक प्रोग्राम्स अशा प्रकारे तयार केले जातात की ते नवीन गोष्टींचा स्वतःहून अभ्यास करायला शिकतात आणि आवश्यकतेनुसार स्वतःहून निर्णय घेऊ शकतात. मशीन लर्निंग हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता याचा प्रकार आहे ज्याच्या मदतीने मशीन स्वतःच सर्व काही कार्य कोणत्याही मदतीशिवाय शिकते,
मशिन लर्निंगच्या माध्यमातून मशिन ही माणसां प्रमाणेच बनवली जाते, ज्याप्रमाणे माणूस विचार करून निर्णय घेतो, त्याचप्रमाणे मशिन स्वत:चा निर्णय घेऊ शकेल अशा पद्धतीने मशीन बनवली जाते,
मशीन लर्निंग या विषयाचा होत असलेला प्रसार व या विषयाच्या लोकप्रियतेमुळे कंपन्यांमध्ये प्रोजेक्टसाठी या विषयातील तज्ञांची खूप मोठी गरज ही निर्माण झाली आहे. मशीन लर्निंग साठी युट्युब वर देखील बरेचसे चांगले कोर्सेस उपलब्ध आहेत.
अश्याच प्रकारची मशीन लर्निंग बद्दलची आणखी विस्तृत माहिती हवी असल्यास आमच्या मराठी स्पिरिट ब्लॉग ला नक्कीच व्हिझिट करा. आणि अश्याच नवनवीन टेकनॉलॉजि बद्दल मौल्यवान माहिती मिळावा.
0
Answer link
मशीन लर्निंग (Machine Learning):
मशीन लर्निंग म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (Artificial Intelligence) एक भाग आहे. यात, मशीनला स्पष्टपणे प्रोग्राम न करता, डेटावरून शिकण्याची क्षमता दिली जाते.
सोप्या भाषेत:
एखाद्या लहान मुलाला आपण एखादी गोष्ट वारंवार दाखवून शिकवतो, त्याचप्रमाणे मशीनला डेटा वापरून शिकवले जाते.
उदाहरण:
समजा, तुमच्याकडे भरपूर फळांचे फोटो आहेत. तुम्ही मशीनला ते फोटो दाखवून शिकवता की कोणता फोटो सफरचंदाचा आहे आणि कोणता आंब्याचा. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, मशीनला नवीन फळ दाखवले, तर ते स्वतःच ओळखू शकेल की ते फळ काय आहे.
मशीन लर्निंगचे प्रकार:
- सुपरvised लर्निंग (Supervised Learning): यात मशीनला लेबल असलेला डेटा दिला जातो.
- अनसुपरvised लर्निंग (Unsupervised Learning): यात मशीनला लेबल नसलेला डेटा दिला जातो आणि मशीन स्वतःहून डेटा समजून घेते.
- रिइन्फोर्समेंट लर्निंग (Reinforcement Learning): यात मशीनला त्याच्या कृतींवर आधारित रिवॉर्ड (reward) किंवा पेनल्टी (penalty) दिली जाते, ज्यामुळे ते योग्य कृती करायला शिकते.
उपयोग:
- वैद्यकीय क्षेत्र: रोगांचे निदान करणे, औषधे शोधणे.
- अर्थशास्त्र: शेअर बाजाराचा अंदाज लावणे.
- तंत्रज्ञान: स्पॅम फिल्टर (spam filter), भाषांतर (translation).
मशीन लर्निंगमुळे अनेक कामे अधिक सोपी आणि जलद झाली आहेत.
अधिक माहितीसाठी: