सरकार
मराठा
आरक्षण
शासकीय योजना
मी मराठा प्रकल्पग्रस्त आहे. तर, महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी लागू केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा लाभ मला कसा मिळेल? त्यासाठी मला पुन्हा रिझर्व्हेशन सर्टिफिकेट (आरक्षण प्रमाणपत्र) काढावे लागेल का?
2 उत्तरे
2
answers

3
Answer link
पकल्पग्रस्त प्रमाण पत्र
आणि मराठा जातीचा प्राणपत्र वेगळं आहे
तुम्हाला मराठा आरक्षण जातीचा दाखला काढावा लागेल तेव्हाच तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल अन्यथा नाही मराठा अरक्षणासाठी लागणारी कागतपत्रे
मराठा आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ●
१) जातीचा दाखला ( Cast Certificate ) - तहसीलदार
२) उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला ( Non Creamy Layer Certificate ) - तहसीलदार
३) जात वैधता प्रमाणपत्र ( Cast Validity Certificate ) - जिल्हा समाज कल्याण अधिकारी
४) उत्पन्नाचा दाखला - तहसीलदार
५) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Age,Domicile % Nationality Certificate ) - तहसीलदार
====================
वरील दाखले कसे,कुठे काढावे लागतात,त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात,त्याची प्रक्रिया कशी असते याबाबत लोकांना जास्त माहीती उपलब्ध होत नाही.त्यामुळे संभाजी ब्रिगेड बारामती-इंदापुर यांनी या सर्व प्रक्रियेबाबत माहिती गोळा करुन ती लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे..
====================
मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मराठा समाजातील पात्र घटकांनी पुढील क्रम लक्षात घेऊन कागदपत्रांची जमवाजमव करावी आणि दिलेल्या क्रमानेच एक एक कागदपत्र/दाखला/प्रमाणपत्र संबंधित विभागामधुन काढावे.
१) वय,अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
२) उत्पन्नाचा दाखला
३) जातीचा दाखला
४) नॉन क्रिमीलेयर दाखला
५) जात वैधता प्रमाणपत्र
====================
ज्या व्यक्तीला मराठा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीने आपले वरील दाखले/प्रमाणपत्रे काढण्यासाठी खालील यादीत दिलेल्या स्वतःच्या सर्व कागदपत्रांची चांगली अशी फाईल तयार करावी.
सदर फाईल संपुर्ण शैक्षणिक कालखंड व नोकरीसाठी सुध्दा उपयोगी असते,याशिवाय तिचा उपयोग इतर ठिकाणीही होत असतो.
खाली दिलेली सर्व कागदपत्रे विशेष कार्यकारी अधिकारी/राजपत्रित अधिकारी/शाळा,हायस्कुलचे मुख्याध्यापक/कॉलेजचे प्राचार्य यांपैकी कोणाकडुन तरी प्रमाणित ( Attested - True Copy ) केलेली असावीत.
खाली दिलेल्या कागदपत्रांच्या प्रत्येकी १० प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रती आपल्या फाईल मधे असाव्यात..
कागदपत्रे -
१) इयत्ता १०वी आणि १२वी चे गुणपत्रक,बोर्ड सर्टिफिकेट,शाळा सोडल्याचा दाखला.
२) आपल्या जन्माचा दाखला
३) आपले नाव असणाऱ्या शिधापत्रीकेचे पहिले व शेवटचे पान
४) वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला
५) गावातील १५ वर्ष व त्यापेक्षा जास्त वास्तव्य असण्याचा ग्रामसेवक व गावकामगार तलाठी यांचा रहीवासी दाखला ( किंवा मागील १५ वर्षाचे वास्तव्य सिध्द करणारी विजबीले,७/१२ उतारे,मालमत्ता कर पावत्या,इत्यादि )
६) गावकामगार तलाठी यांच्याकडुन कुटुंबप्रमुख/शिधापत्रीका प्रमुखाच्या ( जर अर्जदार सज्ञान असेल तर अर्जदाराच्या ) नावे मागील एक आणि तीन वर्षांचा उत्पन्नाचा दाखला
७) मतदान ओळखपत्र/PAN कार्ड/वाहन चालवण्याचा परवाना

0
Answer link
तुम्ही मराठा प्रकल्पग्रस्त असाल, तर तुम्हाला महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी लागू केलेल्या 16% आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी खालील गोष्टी करण्याची आवश्यकता आहे:
1. आवश्यक कागदपत्रे:
- Maratha caste certificate (मराठा जातीचे प्रमाणपत्र)
- Project affected certificate (प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र)
- Address proof (पत्त्याचा पुरावा)
- Identity proof (ओळखीचा पुरावा)
2. अर्ज करण्याची प्रक्रिया:
- तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात किंवा सेतू केंद्रावर जाऊन अर्ज करावा लागेल.
- अर्ज भरताना तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, जात आणि प्रकल्पग्रस्त असल्याची माहिती द्यावी लागेल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
3. आरक्षण प्रमाणपत्र:
- जर तुमच्याकडे आधीपासूनच मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र असेल, तर तुम्हाला पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही.
- तुम्ही तेच प्रमाणपत्र वापरू शकता.
- परंतु, जर तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला नवीन प्रमाणपत्र मिळवावे लागेल.
4. अधिक माहितीसाठी:
- तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: सामाजिक न्याय विभाग
- किंवा तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात संपर्क साधू शकता.
टीप:
- मराठा आरक्षणासंदर्भात शासन वेळोवेळी नियम बदलू शकते. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी नवीनतम माहिती तपासा.