2 उत्तरे
2 answers

समता म्हणजे काय?

1
समता म्हणजे काय, तर स्वतंत्रपणे स्वाभिमानाने जगण्याची मोकळीक आणि बरोबरी करण्याचीही संधी

समता म्हणजे काय तर कोणत्याही माणसाला त्याच्या जात,वर्ण,लिंग यावरून त्यांचे मुलभूत अधिकार स्वातंत्र न ठरवता त्याला माणुस म्हणुन त्यांचे स्वातंत्र त्यांचे मुलभूत अधिकार देणे म्हणजे समता पण त्यांचे असे अधिकार आपण त्यांना देण अस म्हणन हेच मुळात चुकिच आहे कारण अधिकार देणे हे आपण ठरवण्याचा अधिकारच आपल्याला नाही ना कारण मुळात ते अधिकार त्यांचेच आहेत.अस म्हण्याच कारण काय तर सविंधानाने आपल्याला समता दिली खरी पण समता आपल्या समाजात रूजली काय? विशेष म्हणजे स्त्रीची समता.तुम्हाला हा प्रश्न कधी पडला नसेल अस मला वाटते. मी हे कशावरून म्हणत आहे हे मी पुढे मांडलेला मुद्दावरुन तुम्हीच ठरवा.जेव्हा एखाद्या मुलगा शिकतो तेव्हा त्याला शिकण्याची मर्यादा नसते पण जेव्हा एखाद्यी मुलगी शिकते मग मात्र मर्यादा असते.मुलीला शिकण्याची संधी फक्त लग्नापर्यंत.. तुम्हीच बघा ना कोणते पालक आणि किती पालक आपल्या मुलीला अधिकार देतात महत्वकांशा ठेवतात कि पुढे जाऊन नोकरी करावी,स्वावलंबी
व्हावे म्हणून ईच्छा ठेवतात ? काही जुण्या विचाराचे लोक तर म्हणतात मुलगी म्हणजे दुसराच धण कशाला शिकवायच ? मुलीला स्वयंपाक आलाच पाहिजे,घरातील काम आलेच पाहिजे.अरे पण मुलीच का ? स्वावलंबन पाहिजे असेल तर मुलगा मुलगी दोघांणा पण स्वावलंबी बणवा ना.आणि लग्नासारख्या आयुष्याच्या महत्वाच्या निर्णयामध्ये पण मुलीच मत डावलल्या जाते सगळीकडे नाही पण कुठे ना कुठे हे होतच.मुलीन प्रेम केल तर लफड आणि मुलान प्रेम केल प्रेम होत.पटल नाही तर विचार करुण बघा आपल्या कुटूंब व्यवस्थेमध्ये काय फरक आहे ते.मुलीला कोणते कपडे घालू नये कोणते घालावे हे सुद्धा दुसरेच ठरवतात म्हणजे विचार करा माणुस म्हणुन त्या स्त्रीच अस्तिव आहे काय ? आणि हे स्त्री पण मान्य करते अस्तित्व नसल्या सारख.शैक्षणिक दृष्ट्या स्त्री प्रगत होऊन सुद्धा तेच जुणाट विचाराचा स्विकार करते.स्त्री शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झाली पण वैचारिक दृष्ट्या अजून तिथेच आहे.


धन्यवाद
उत्तर लिहिले · 10/2/2019
कर्म · 55350
0
समता म्हणजे समानतेची भावना, कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान संधी आणि अधिकार मिळवण्याचा दृष्टिकोन.

समता म्हणजे काय?

समता या शब्दाचा अर्थ समानता, सारखेपणा, किंवा बराबरी असा होतो.

व्याख्या:

  • समान संधी: प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षमतेनुसार विकास करण्याची समान संधी मिळायला हवी.
  • भेदभाव नाही: जात, धर्म, लिंग, वंश, रंग, किंवा इतर कोणत्याही आधारावर कोणताही भेदभाव नसावा.
  • समान अधिकार: कायद्यासमोर सर्व नागरिक समान असले पाहिजेत आणि सर्वांना समान अधिकार मिळायला हवे.

समतेचे महत्त्व:

  • सामाजिक न्याय: समाजात न्याय आणि समानता प्रस्थापित करण्यासाठी समता आवश्यक आहे.
  • विकासाला चालना: जेव्हा सर्वांना समान संधी मिळतात, तेव्हा समाजाचा विकास वेगाने होतो.
  • बंधुता: समतेमुळे लोकांमध्ये बंधुत्वाची भावना वाढते.

समतेचे उदाहरण:

  • सर्व मुला-मुलींना शाळेत जाण्याचा समान अधिकार असणे.
  • प्रत्येक व्यक्तीला निवडणुकीत मत देण्याचा अधिकार असणे.
  • नोकरीच्या संधींमध्ये कोणताही भेदभाव न करणे.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

विशीत वर्गात येणाऱ्या समता संबंधी समस्यांची यादी?
विकासासाठी प्रत्येक नागरिकांना समान संधी मिळायला हवी का?
दान आणि समानता या तत्त्वाचे एकमेव अद्वितीय असे प्रतीक कोणते?
आजीचा समानतेचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा?
कामाच्या ठिकाणी स्त्री पुरुष समानता सांगा?
मुलींना समान अधिकार आहेत, मग खुल्या प्रवर्गासाठी शिष्यवृत्ती का नाही?