2 उत्तरे
2
answers
संत सेवालाल महाराज जन्मस्थळ कोणते?
7
Answer link
*थोर मानवतावादी :*
*संत सेवालाल महाराज*
भारत ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते.भारतात अनेक
संत-महात्मे होवून गेलीत.त्यापैकीच एक थोर मानवतावादी
संत म्हणजे
*'संत सेवालाल महाराज'* होय.
त्यांचा बंजारा समाजात ( *बंजारा ही जमात महाराष्ट्रात सध्या भटक्या जमाती म्हणून आणि विविध राज्यात आदिवासी जमात म्हणून ओळखली जाते, पण पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंधू संस्कृती च्या उत्खननंतर मिळालेल्या पुराव्यावरून बंजारा संस्कृती ही एक श्रेष्ठ संस्कृती असून ही जमात एक आदर्श जमात आणि राज्यकर्ती जमात आहे. कर्नाटक राज्यात म्हैसूर राज्यात नायकाचे घराणे होते हा इतिहासात उल्लेख आहे, शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे यांनी विजापुरी दरबारात असताना कर्नाटकातील नायकसोबत लढाई केल्याचा उल्लेख पण आढळतो.* )
जन्म तत्कालीन म्हैसुर प्रांतामध्ये *गोलालडोड्डी (सुवरणकुप्पा) ता. गुत्ती* आज या गावाला *सेवानगर* म्हणून ओळखतात. येथे
15 फेब्रुवारी 1739 मध्ये झाला. (सेवालाल महाराजांच्या जन्मबाबत काही लोक चमत्कार सांगतात, पण मी स्पष्ट करतो की महारांजाचा जन्म चमत्कारी नसून भीमा नायक आणि याडी धरमणी याच्या उदरी 15 फेब्रुवारी1739 ला झाला.) त्यांचे वडील भीमा नायक, आणि आईचे नाव धरमणी होते, सेवालाल हे चार भाऊ होते, हाफा नायक, बदू नायक, पुरा नायक होते, भीमा नायककडे 52 तांड्याची नायकी होती, मुघल आणि इंग्रज राजवटीचा काळ होता. त्याकाळी *लदेणी* म्हणजेच व्यापार आणि *पशुपालन* हा मुख्य व्यवसाय होता. लदेणी करत असताना देशभर या राज्यातून त्या राज्याकडे अन्नधान्य गुरांच्या पाठीवर घेऊन पोहोचविण्याचा व्यवसाय सतत सुरू होता, अशा वेळी देशभ्रमंती करत असताना सेवालाल महाराजांना खूप असे अनुभव आले, इंग्रज व मुघल यांचा त्यांना खूप त्रास पण झाला. समाजची हालअपेष्टा, परकीयांचे अन्याय अत्याचार बघून महाराजांनी समाज प्रबोधन जनजागृती साठी समाज एकजूट करण्याचा विडा उचलला, त्यांची
आजीवन ब्रह्मचारी राहूंन
दीन दुःखीतांच्या सेवेसाठी व सर्व प्राणीमात्राच्या कल्याणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.(पण आज शोकांतिका आहे की महाराजाचे तत्वज्ञान फक्त बंजारा समाजापूरते मर्यादित ठेवतात, अख्ख्या मानव समाजाच्या कल्याणच्या मार्ग महाराजांनी दाखवला.) देशभर दौरा केला. सुवर्णकूप्पा, गुट्टीबेल्लारी(आंध्रप्रदेश), उमरी-पोहरादेवी, रूईगड(महाराष्ट्र) असे विविध स्थळ महाराजांच्या पदस्पर्शाने मान्यता पावलेली आहेत.मध्यप्रदेशातील जिल्हा बरानपूर, ग्राम गम्भीरपूरा येथे महाराजांची मोठी यात्रा भरवली जाते.
देशातील अनेक प्रदेशात आज महाराजांचे हजारों मंदिर मोठ्या श्रध्देने उभारल्या गेली आहेत.
🌷 *सेवालाल महाराजांचे तत्वज्ञान* 🌷
*तम सोतार वळख सोता करलीजो*
स्वतःची ओळख स्वतः करून द्या
*तम तमार जीवनेम दिवो लगा सकोछो*
स्वतःच्या अंधारलेल्या जीवनातही स्वतःला दीप लावता येइल.
*कोई नानक्या मोटो छेनी, केणी कमी मत समजो*
प्राणीमात्रावर, निसर्गावर प्रेम करावे.माणसाने माणुसकी जपावी. प्रत्येकाने राष्ट्रभक्ती जोपासावी.
*जाणजो, छाणजो, पचच माणजो*
कोणतीही गोष्ट आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पहिले समजून, मग त्या गोष्टीला जस चाळणीतून गाळल्यावर खडे खडे निघून जातात, त्याच पद्धतीने बुद्धीच्या जोरावर त्याची सत्यता पडताळून मगच ती गोष्ट माना असा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.
*उपदेश*
त्यांनी पाच गोष्टी चा पुरस्कार केला.
*चोरी करू नका*
*दारू पिऊ नका*
*व्यभिचार करू नका*
*पशुहत्या करू नका*
*खोटे बोलू नका*
अशी शिकवण त्यांनी दिली.अंधश्रध्दा किंवा पशूबळीला संत शिरोमणी सेवालाल महाराजांनी कधीही थारा दिला नाही.
महाराजांची दूरद्रुष्टी अतीशय प्रेरक होती.
🌷 *सेवालाल महाराजांचीभविष्यवाणी* 🌷
(याबाबतीत ही लोक चमत्कार सांगतात पण असा कोणताही चमत्कार नसून त्यांनी देशभर भ्रमंती केल्यानंतर निसर्गातील जे काही अनुभव आलेत त्यावरून त्यांनी एक भविष्यवेधी तर्क मांडला आहे.)
*"रुपयां कटोरो पाणी वकजाय.*
लदेणी करताना दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी सामना करावा लागत असे, महाराजांकडे लाखो गुरे ढोरे असत तेव्हा महाराजांचे अस्या गोष्टीवर खूप बारीक लक्ष राहायचे तेव्हा सांगत की जर पाण्याचा दुरुपयोग कराल तर भविष्यात एक कटोरा म्हणजे एक ग्लास पाणी एक रुपयाला मिळेल
आज आपण या परिस्थितीचा सामना करतच आहोत एक रुपयाला एक पाऊच मिळत आहे.
*मलकेर खबर परमलक जाय*
एका मुलखातली वार्ता दुसऱ्या मुलुखास क्षणात कळेल. आज मोबाईल चा काळ आहे आपण बघतच आहोत आज आपण परग्रहावर गमनही होत आहे.
*रपियार 13 चणा वकजाय*
महाराजांकडे घोडे पण होते तेव्हा घोड्याना हरभरा खाऊ घालायच्या वेळेस जर नुकसान होत असेल, गुरेढोरे चारायच्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेतमालाला पिकाला धक्का नाही लागले पाहिजे असा सक्त आदेश असायचा तेव्हा महाराज म्हणत की तुम्ही जर अन्नाचा नासोडा कराल तर एक दिवस अन्नाला मुकावे लागेल आणि एक रुपयाला 13 हरभरे मिळतील, आज 1 रुपयांच्या पाकिटात 13 चणे पण नसतात.
अश्या अनेक बाबतीत महाराजांची भविष्यवाणी आजच्या तंत्रज्ञान युगात तंतोतंत सत्य ठरत आहे.
*क्रांतिकारी सेवालाल*
सेवालाल महाराज हे शूरवीर होते. त्यांनी बंजारा समाजातील लोकांना एकत्र करून व्यापार करताना इंग्रज जे कर tax लावत त्यासाठी महाराजांनी विरोध केला एवढेच नाहीतर प्रसंगी लढाया सुद्धा केल्यात, इतिहासात पुरावे पण उपलब्ध आहेत.
निजामाविरुद्ध महाराजांनी बंड देखिल पुकारला होता.भूमाफिया व सरंजामशाही विरुद्ध आवाज उठवत न्याय मिळवून दिल्याचे पुरावे आजही उपलब्ध आहे.
एक महान पराक्रमी, समृद्ध व्यापारी,एक तत्ववेत्ता, एक समाजसुधारक म्हणून संत श्री. सेवालाल महाराज यांची देशभर ख्याती आहे.
महाराष्ट्रात वाशीम जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा येथे त्यांची पावन समाधी आहे.
येथे दरवर्षी रामनवमीला देशभरातून लाखो भाविक संत श्री.सेवालाल महाराजाच्या दर्शनाला येतात.
महाराजांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने 2018 या वर्षांपासून 15 फेब्रुवारी ही जयंती शासकीय स्तरावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी कर्नाटक व तेलंगाना राज्याने देखील महाराजांची जयंती शासन स्तरावर साजरा करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे, हे विशेष.!!!!!

0
Answer link
संत सेवालाल महाराजांचे जन्मस्थळ शिरसी (Shirsi) हे आहे. हे गाव कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा (Shimoga) जिल्ह्यात येते.
(स्रोत: महाराष्ट्र टाइम्स)