राज्य परिवहन angkutan transportasi umum

शिवशाही बस सरकारी आहे का खाजगी?

3 उत्तरे
3 answers

शिवशाही बस सरकारी आहे का खाजगी?

15
शिवशाही ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली, तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात. महामंडळ कंत्राटदारास प्रति किलोमीटर १८ रुपये भाडे देते. याशिवाय इंधन, चालक आणि टोल यांसह इतर सगळे खर्च महामंडळाची जबाबदारी असते. प्रत्येक बसची प्रवासी क्षमता ४५ असून यात चालक हाच वाहकाचे काम करतो.          बस पूर्ण भरली असता दर फेरीमागे महामंडळास अंदाजे २७,००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. तोटा झाल्यास तो महामंडळाच्या पदरी पडतो.
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 39105
2
मित्रा,
ही बस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आहे.
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 20800
0
उत्तर:

शिवशाही बस ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे चालवली जाणारी सरकारी बस सेवा आहे.

MSRTC महाराष्ट्र शासनाच्या मालकीची आणि नियंत्रणाखाली असलेली सार्वजनिक वाहतूक संस्था आहे.
अधिक माहितीसाठी, आपण MSRTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: MSRTC Official Website

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5240

Related Questions

कर्णबधीर लोकांसाठी एस.टी. महामंडळामध्ये २५% सवलतीच्या तिकीटासाठी प्रमाणपत्र कसे काढावे?
दादर स्टेशनला राजा राणी गाडी का थांबत नाही?
एसटी महामंडळाची गाव-खेड्यातील स्वतंत्र पास योजना कधी सुरू होणार आहे?
रेल्वे स्टेशनवर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे थंड पाणी ५₹ मध्ये उपलब्ध करून देणारी मशीन बसवण्यात आली व काही दिवसांतच बंद करण्यात आली, ती कुणाच्या लाभासाठी बंद करण्यात आली हे सर्वांना माहीत आहेच, तर याबद्दल लेखी तक्रार कुठे दाखल करावी?
बस कंडक्टरची तक्रार कोणाकडे करायची?
शिवशाही बसचे मालक कोण आहे?
एस टी महामंडळाच्या बॅच बिल्या विषयी माहिती आणि त्याचे फायदे काय?