Topic icon

transportasi umum

15
शिवशाही ही सेवा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे चालवली जात असली, तरी या मार्गावरील बस खाजगी कंत्राटदारांच्या असतात. महामंडळ कंत्राटदारास प्रति किलोमीटर १८ रुपये भाडे देते. याशिवाय इंधन, चालक आणि टोल यांसह इतर सगळे खर्च महामंडळाची जबाबदारी असते. प्रत्येक बसची प्रवासी क्षमता ४५ असून यात चालक हाच वाहकाचे काम करतो.          बस पूर्ण भरली असता दर फेरीमागे महामंडळास अंदाजे २७,००० रुपये निव्वळ उत्पन्न मिळते. तोटा झाल्यास तो महामंडळाच्या पदरी पडतो.
उत्तर लिहिले · 29/1/2019
कर्म · 39105
9
शिवशाही बसचे मालक कोण म्हणजे ??

शिवशाही बस MSRTC बसेसचा एक प्रकार आहे. ह्या बस इतरांपेक्षा दिसायला, चालायला वेगळी असली तरी त्या पण MSRTC अंतर्गत येतात.

आणि MSRTC परिवहन मंडळ असून ते महाराष्ट्र शासनाचे आहे. म्हणून आपण सांगू शकतो सगळ्या बसेस, शिवशाही पण महाराष्ट्र शासनाच्या आहेत. ह्या बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत, म्हणून ह्यांना मालक नाही. ह्या महाराष्ट्र शासन आणि MSRTC च्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत, म्हणून हेच मालक झालेत.
उत्तर लिहिले · 30/1/2019
कर्म · 75305
2
एसटी बस व खासगी प्रवासी वाहने चालविण्यासाठी चालकाला व वाहकाला बॅचबिल्ला काढणे गरजेचे असते. चालक-वाहकांसाठी बॅच बिल्ला एक महत्त्वाचे दस्तऐवज असून त्याशिवाय सार्वजनिक प्रवासी वाहन चालविणे गुन्हा ठरतो.
वाहन चालक-वाहकांसाठी गरजेचा बॅचबिल्ला प्रादेशिक परिवहन कार्यालय, येथे मिळतो. यासाठी एसटी व खासगी सार्वजनिक वाहन चालक व वाहकाला सर्वप्रथम अर्ज करताना फॉर्म एसईसी या नमुन्यातील प्रमाणपत्र सोबत जोडावे लागते. सदर प्रमाणपत्र तो ज्या तालुक्यातील रहिवासी असेल त्या तहसील कार्यालयातून त्याला प्राप्त करुन घ्यावे लागते. नंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात येऊन एलपीएसए या नमुन्यातील अर्ज भरावा लागतो.
चालक व वाहकांसाठी बॅच बिल्ला देताना त्याचा चारित्र्य अहवाल तपासून प्राप्त अहवालावरून मोटार वाहन निरीक्षकांच्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यास त्याला प्रादेशिक परिवहन कार्यालयातून बॅच बिल्ला देण्याची प्रक्रिया आहे.
🔯बॅच बिल्ल्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया
♻ सर्वप्रथम चालकाच्या बॅच बिल्ल्यासाठी फार्म एल.पी.एस.ए. (फार्म)मध्ये अर्ज करणे गरजेचे आहे. यासाठी वयाची २0 वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. बस चालकासाठी (गोल बॅच) तर टॅक्सी चालकासाठी (त्रिकोणी बॅच) काढावा लागतो. दोन्ही बॅचसाठी चालकाकडे टॅक्सी चालकासाठी (हलके मोटार वाहन)चे परिवहन संवर्गातील (एसटी) वाहन चालकाकडे जड वाहन चालविण्याचा परवाना असणे गरजेचे आहे. हलके मोटार मोटार वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षांचा किंवा मध्यम जड वाहन चालविण्याचा एक वर्षाचा अनुभव पाहिजे. चालकाच्या बॅचसाठी ४५0 रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच एसईसी फार्म भरणे गरजेचे आहे. मोटार वाहन निरीक्षकांकडे चाचणीसाठी सादर करावे. या नमुन्यातील फॉर्म भरावा

⚛आवश्यक सर्व कायदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाकडे चाचणीसाठी सादर करावे. चाचणी उत्तीर्ण झाल्यास कार्यालयामार्फत अर्जदाराचे चारित्र्य पडताळणी अहवाल पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त यांच्यामार्फत मागविण्यात येतो.


त्यानंतर उमेदवाराला दोन दिवसांत बॅच बिल्ला मिळू शकतो. यासाठी आवश्यक कागदपत्र

■ उमेदवाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्याचा पुरावा■ सोबत फार्म सीबी जोणे (कंडक्टर बॅच अर्ज)■ फार्म एसईसी जोडणे■ जन्म तारखेचा दाखला ■ रहिवासी पुरावा, मतदान कार्ड ■ वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रमाणित मेडिकल सर्टिफिकेट फॉर कंडक्टर या कागदपत्रांची गरज आहे
0

एसटी बस (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) साठी विविध योजना आहेत, त्यापैकी काही प्रमुख योजना खालीलप्रमाणे आहेत:

१. ज्येष्ठ नागरिक सवलत योजना:
  • ६५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्याbasic भाड्यात ५०% सवलत.
२. विद्यार्थी सवलत योजना:
  • विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार एसटीच्या भाड्यात सवलत दिली जाते.
३. दिव्यांग सवलत योजना:
  • दिव्यांग व्यक्तींसाठी एसटीच्या भाड्यात सवलत असते.
४. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना:
  • ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा.
५. महिलांसाठी योजना:
  • 'महिला सन्मान योजना' अंतर्गत महिलांना एसटी बसच्या तिकीटावर ५०% सवलत.

या योजनां व्यतिरिक्त, एसटी महामंडळ वेळोवेळी वेगवेगळ्या सामाजिक गटांसाठी आणि विशिष्ट प्रसंगांसाठी योजना जाहीर करत असते. त्यामुळे, प्रवासापूर्वी अधिकृत माहिती तपासणे महत्त्वाचे आहे.

अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अधिकृत वेबसाइटला भेट द्या: MSRTC Official Website

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5240