संस्कृती सण रूढी परंपरा

केरळमधील मोठा सण कोणता?

4 उत्तरे
4 answers

केरळमधील मोठा सण कोणता?

10
ओणम् ( Onam ) :- ओणम् हा केरळ प्रांतातील प्रमुख सण आहे. महाराष्ट्रात दिवाळीतील पाडव्याला म्हणजे बलिप्रतिपदेला बळीराजाची पूजा करतात. 'बळीचे राज्य येवो' अशी प्रार्थना करतात. तशीच केरळ मध्ये या उत्सवात वामनाची पूजा करतात. फार पूर्वी बळीराजाने पृथ्वी आणि स्वर्ग जिंकून आपले साम्राज्य स्थापन केलें. तो उत्तम प्रजापालक होता. त्याच्या राज्यात सदैव सुख समृद्धी नांदत होती ; त्यामुळे प्रजेला सुख शांति मिळाली. प्रजा आनंदी झाली व राजाचे गुणगान करू लागली. बळी राक्षस वंशातला होता. देवांचा महिमा गायच्या ऐवजी राक्षसाचे गुणगान करीत असे. त्यामुळे देवांना तो अपमान वाटला. आपले महत्व वाढावे म्हणून देवांनी विष्णूला प्रार्थना करून आपले दु :ख त्याला सांगितले. विष्णूने वामनाचा अवतार घेतला आणि बळीराजाकडे एका यज्ञा प्रसंगी ,तीन पावले जमीन मागितली. बळीराजा पुण्यशील होता. दानशूर होता , त्याने ' दान देतो ' असा संकल्प सोडल्यावर वामनाने ( विष्णूने ) एका पायाने सारे आकाश व्यापले, दुसऱ्या पायाने सारी पृथ्वी व्यापली आणि तिसरे पाऊल कोठें ठेवू , असे विचारल्यावर राजाने आपले मस्तक पुढे केलें. वामनाने आपला पाय त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला पाताळात दडपले. पाताळात जाते वेळी त्याने वामानाकडे मागणे मागितले . " वर्षातून एकदा पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेचे क्षेमकुशल घेण्याची आपल्याला मोकळीक असावी. वामनाने ' तथास्तु ' म्हटले . त्या वेळेपासून आश्विन महिन्यात बळीराजा आपल्या प्रजेला भेटण्यासाठी पृथ्वीवर येतो. आपला राजाला दैन्य , दुख , दारिद्र्य दिसू नये , म्हणून केरळची प्रजा या दिवसांत आनंदोत्सव साजरा करते. राजा तो आनंद, सुख , समृद्धी पाहतो आणि आपली प्रजा पूर्वीसारखीच सुखी आहे , असे समजून पुन्हा पाताळात जातो. बळी राजावर केरळी लोकांची महान श्रद्धा आहे. आपण रामराज्य चांगले मानतो. आदर्श मानतो. बळीराजाचे राज्यही तसेच होते. एका केरळी कवीने त्याच्या राजाचे सुरेख वर्णन केलें आहे. तो म्हणतो," जेव्हा महाबली राजा राज्य करीत होता , तेव्हा सर्व माणसे समान होती. राज्यात चोरी नव्हती . कपट नव्हते , लोक तिळाएवढे खोटे बोलत नव्हते " बळीच्या अशा अनेक गुणांच्यामुळे विष्णु त्याचा द्वारपाला झाला. हा सण अश्विन महिन्यात येतो. दहा दिवस हा सण साजरा करतात. या सणासाठी घरे रंगवतात, रंगांची आणि फुलांची रांगोळी काढतात. श्रावण नक्षत्राच्या मुख्य दिवशी वामनाची शंकूच्या आकाराची मातीची मूर्ति करतात. ती अंगणात बसवितात. तिच्या भोवतीही फुलांची सजावट करतात. ही मूर्ति बसविताना प्रथम सगळे ' आरप्पु ' असा मोठ्या आवाजात घोष करतात. हा ध्वनी देवाच्या स्वागतासाठी असतो. मग वामनाची पूजा करतात. वामनाला ते ' तृक्काक्करप्पन ' असे म्हणतात. या दिवशी घरोघरी गोड जेवण असते. भात , भाज्या , पापड, फळे , खीर व पिकलेल्या केळ्यांचे तळलेले तुकडे , हे पदार्थ त्या दिवशीच्या भोजनात आवश्यक असतात. तेथील लोक वेगवेगळे खेळ खेळतात, चेंडूचा एक खास खेळ खेळला जातो त्याला ' नाटन पंतुकळी ' असे म्हणतात. फुलांची रांगोळी काढणे , ही केरळीय स्त्रियांची वैशिष्टपूर्ण कला आहे. वेग वेगळ्या स्पर्धा ठेवतात त्यातील मुख्य नौकास्पर्धा ही होय ,या स्पर्धेला ' वंचिकळि ' असे नाव आहे. ' ऋण करावे ; पण ओणमच्या दिवशी सुग्रास जेवावे ' अशी एक म्हण केरळमध्ये आहे. त्यामुळे सर्व जण हा सण खूप आनंदाने , उत्साहाने साजरा करतात.
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 458560
1
ओणम केरल का एक प्रमुख त्योहार है। ओणम केरल का एक पर्व है। ओणम का उत्सव सितम्बर में राजा महाबली के स्वागत में प्रति वर्ष आयोजित किया जाता है जो दस दिनों तक चलता है। उत्सव त्रिक्काकरा (कोच्ची के पास) केरल के एक मात्र वामन मंदिर से प्रारंभ होता है। ओणम में प्रत्येक घर के आँगन में फूलों की पंखुड़ियों से सुन्दर सुन्दर रंगोलिया (पूकलम) डाली जाती हैं। युवतियां उन रंगोलियों के चारों तरफ वृत्त बनाकर उल्लास पूर्वक नृत्य (तिरुवाथिरा कलि) करती हैं। इस पूकलम का प्रारंभिक स्वरुप पहले (अथम के दिन) तो छोटा होता है परन्तु हर रोज इसमें एक और वृत्त फूलों का बढ़ा दिया जाता है। इस तरह बढ़ते बढ़ते दसवें दिन (तिरुवोनम) यह पूकलम वृहत आकार धारण कर लेता है। इस पूकलम के बीच त्रिक्काकरप्पन (वामन अवतार में विष्णु), राजा महाबली तथा उसके अंग रक्षकों की प्रतिष्ठा होती है जो कच्ची मिटटी से बनायीं जाती है। ओणम में नोका दौड जैसे खेलों का आयोजन भी होता है।
उत्तर लिहिले · 23/1/2019
कर्म · 3005
0
केरळमधील सर्वात मोठा सण ओणम आहे. हा सण मल्याळी कॅलेंडरनुसार चिंगम महिन्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) साजरा केला जातो. ओणम हा केवळ एक सण नसून तो केरळची संस्कृती आणि परंपरा दर्शवतो.

ओणम सणाचे महत्व:

  • हा सण राजा महाबलीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
  • ओणममध्ये 'ओणम साध्‍या' नावाचे विशेष भोजन तयार केले जाते.
  • यामध्ये पारंपरिक नृत्य, खेळ आणि संगीत यांचा समावेश असतो.
  • केरळमध्ये ओणमच्या काळात नौका शर्यती (Vallam Kali) आयोजित केल्या जातात, ज्या पर्यटकांना विशेष आकर्षित करतात.

ओणम सणाबद्दल अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

केरळ पर्यटन - ओणम
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1080

Related Questions

मराठी छोट्या मुलीसाठी नाव सुचवा?
खंडोबा पाच पावली का करतात?
हळद लावल्यानंतर नवरदेव/नवरीने बाहेर का फिरू नये?
लोकसंस्कृती म्हणजे काय?
लग्नासाठी मुलामुलीची पसंती झाल्यानंतर मराठवाडा भागात मराठा समाजात मुलींकडून कोणकोणत्या परंपरा, कार्यक्रम पार पाडले जातात? सविस्तर सांगावे.
कोणत्या समुदायात लग्नाच्या वेळी मुलाला डुकराचे रक्त प्यावे लागते?
जोतीबा यात्रेसाठी बेळगावहून लोक पायी व बैलगाडी करून येतात का?