औषधे आणि आरोग्य आरोग्य व उपाय शरीरशास्त्र आरोग्य

रक्ताभिसरण संस्थेचे कार्य कसे चालते?

3 उत्तरे
3 answers

रक्ताभिसरण संस्थेचे कार्य कसे चालते?

7
📙 *रक्ताभिसरण संस्था* 📙
***************************

एकपेशीय अमिबापासून बहुपेशीय प्राण्यांकडे वाटचाल होताना एका महत्त्वाच्या अडचणीकडे निसर्गाचे लक्ष्य गेले असावे. ती अडचण म्हणजे असंख्य पेशींनी बनलेल्या प्राण्यांच्या सर्व पेशींचे पोषण कसे करायचे ? यावरचा तोडगा म्हणून निसर्गाने रक्ताची निर्मिती केली असावी. अर्थातच या रक्ताला संपूर्ण शरीरात थेटपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी रक्ताभिसरण संस्थेकडे सोपवली गेली. रक्ताचे शुद्धीकरण उत्सर्जनसंस्था करते, तर रक्तातील लाल पेशींना सतत प्राणवायूचा पुरवठा श्वसनसंस्था करते. रक्तातील लाल, पांढऱ्या व प्लेटलेट पेशींची निर्मिती अस्थिमज्जेमध्ये होते. हृदय हा आजीवन चालू राहणारा पंप विशिष्ट स्नायूंनी बनलेला असतो. स्वनिर्मित विद्युतसंवेदनाद्वारे हृदयाचे काम चालू असते. पण ही संवेदननिर्मिती का थांबते व कशी सुरू होते, हे अजूनही गूढच आहे. हृदय या पंपाची क्षमता चौपटीनेसुद्धा गरजेनुसार वाढू शकते.

मानवी हृदयाला चार कप्पे असतात. वरचे कप्पे कर्णिका, तर खालचे जवनिका या नावाने ओळखले जातात. हृदयाच्या डाव्या जवनिकेतून संपूर्ण शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो, तर उजवा जवनिकेतून फुफ्फुसाकडे अशुद्ध रक्त पाठवले जाते. तेथून आलेले प्राणवायुमिश्रीत शुद्ध रक्त डाव्या कर्णिकेत येते. याउलट शरीराकडून परत आलेले अशुद्ध रक्त उजव्या कर्णिकेत येते. प्रथम कर्णिका व नंतर जवनिका यांचे आकुंचन व प्रसरण चालू राहून रक्ताभिसरण कायम राखले जाते. महारोहिणीच्या असंख्य शाखा फुटून त्यांचे रूपांतर केशवाहिन्यांत होते व त्यानंतर नीलांची सुरुवात होते. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळचा दाब व प्रसारणाच्या वेळचा दाब हा रक्तदाब म्हणून मोजला जातो.

सर्वच प्राण्यांमध्ये रक्त व रक्ताभिसरणसंस्था कार्यरत असते. मात्र रक्तपुरवठ्याच्या गरजा प्राण्याच्या आकारमानाप्रमाणे बदलतात. जिराफाच्या आकारापेक्षा त्याची मान खूपच उंच असते. त्याच्या मेंदूला लागणारा प्रचंड रक्ताचा पुरवठा करण्यासाठी त्याच्या हृदयाचा आकार व रक्तदाब दोन्ही जास्त असतात. याउलट सरपटणाऱ्या सर्वच प्राण्यांचे आकार छोटे असोत वा अजस्र, पण हृदयाचा आकार लहानच असतो. कासवाच्या हृदयाला तीन कप्पे असतात. मगरीच्या हृदयाला तीन कप्पे असले, तरी डावी जवनिका एका पडद्याने विभागलेली असते. गायीगुरांमध्ये माणसाप्रमाणेच हृदयाला चार कप्पे आढळतात.

सरपटणारे प्राणी व पाठीचा कणा असलेले सस्तन प्राणी यांच्या रक्ताभिसरणक्रियेत एक महत्त्वाचा घटक बदल घडवतो. सस्तन प्राण्यांच्या खांद्यातून त्यांना मिळणाऱ्या ऊर्जेचे स्वरूप शर्कराज्वलनातून मिळणाऱ्या कॅलरीज असे असते. त्यामुळे त्वचेचे तापमान योग्य राखून विविध हवामानाला तोंड देणे याला रक्ताभिसरणसंस्थेची मदत मिळते. शून्याखालील तापमानापासून पन्नास डिग्री सेंटीग्रेड इतक्या उष्ण तापमानाला तोंड देणे यामुळेच शक्य होते. त्वचेखालील रक्तवाहिन्यांचे प्रचंड मोठे जाळे व त्वचेची त्याला मदत होते. त्वचेबाहेर टाकला जाणारा घाम शरीराचे तापमान कमी करतो, तर थंडीत रक्तवाहिन्यांचे आकुंचन शरीराची उष्णता कायम राखते. याउलट सरपटणारे प्राणी तापमानातील बदल व सततचा तीव्र सूर्यप्रकाश सहन करू शकत नाहीत. उष्ण रक्ताचे, असे जरी सस्तन प्राण्यांचे वर्णन असले व सरपटणाऱ्या थंड रक्ताचे आपण समजत असलो, तरी बाह्य तापमानाइतकेच त्यांचे रक्ताचे तापमान राखले जाते. रक्ताभिसरण संस्थेचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे काही कारणाने शरीराच्या कोणत्याही भागाला इजा होऊन रक्तस्राव सुरू झाला, तरी तेथे रक्त गोठविण्याची प्रक्रिया सुरू करून रक्तस्राव थांबवणे. रक्ताभिसरणसंस्था तात्काळ या कमतरतेवर मात करण्यासाठी कामाला लागते व जेमतेम आठवड्याभरात ही तूट भरून काढली जाते. मात्र रक्तस्रावामुळे वीस टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे एक लिटरपेक्षा जास्त तूट निर्माण झाली व ती काही वेळात भरून काढली गेली नाही तर प्रमुख इंद्रियांच्या कार्यक्षमतेवर कायमचे दुष्परिणाम होऊन जीवाला धोका निर्माण होतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 10/1/2019
कर्म · 569225
0
मला समजले नाही.
उत्तर लिहिले · 29/12/2022
कर्म · 0
0

रक्ताभिसरण संस्था (Circulatory system) शरीरात रक्त आणि लिम्फ (lymph) फिरवण्याचे कार्य करते. यामुळे ऑक्सिजन, पोषक तत्वे, संप्रेरक (hormones) आणि रोगप्रतिकारक पेशी (immune cells) शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतात. त्याचबरोबर, कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर काढले जातात.

रक्ताभिसरण संस्थेची मुख्य कार्ये:
  • ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा पुरवठा: रक्ताभिसरण संस्था फुफ्फुसातून ऑक्सिजन शोषून घेते आणि पचनसंस्थेतून पोषक तत्वे शोषून घेऊन ते शरीरातील पेशींपर्यंत पोहोचवते.
  • कार्बन डायऑक्साईड आणि टाकाऊ पदार्थ काढणे: पेशींमधून कार्बन डायऑक्साईड आणि इतर टाकाऊ पदार्थ रक्त शोषून घेते आणि ते फुफ्फुसांपर्यंत व मूत्रपिंडांपर्यंत पोहोचवते, जेणेकरून ते शरीराबाहेर टाकले जाऊ शकतात.
  • संप्रेरक आणि रोगप्रतिकारक पेशींचे वहन: रक्ताभिसरण संस्था संप्रेरक (hormones) आणि रोगप्रतिकारक पेशी (immune cells) शरीराच्या आवश्यक भागांपर्यंत पोहोचवते.
  • शरीराचे तापमान नियंत्रण: रक्त शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत करते.
रक्ताभिसरण संस्थेचे भाग:
  1. हृदय (Heart): हृदय हे एक पंपसारखे कार्य करते. ते रक्तवाहिन्यांमध्ये रक्त ढकलते.
  2. रक्तवाहिन्या (Blood vessels): रक्तवाहिन्या म्हणजे नसा ज्याद्वारे रक्त शरीरात फिरते. त्या तीन प्रकारच्या असतात:
    • धमन्या (Arteries): या रक्तवाहिन्या हृदयापासून शरीराच्या इतर भागांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवतात.
    • शिरा (Veins): या रक्तवाहिन्या शरीराच्या इतर भागांकडून कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त हृदयाकडे परत आणतात.
    • केशिका (Capillaries): या अत्यंत लहान रक्तवाहिन्या आहेत, ज्यांच्याद्वारे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पेशींपर्यंत पोहोचतात आणि कार्बन डायऑक्साईड व टाकाऊ पदार्थ परत रक्तात शोषले जातात.
  3. रक्त (Blood): रक्त हे एक द्रव माध्यम आहे, ज्यामध्ये लाल रक्तपेशी (red blood cells), पांढऱ्या रक्तपेशी (white blood cells) आणि प्लेटलेट्स (platelets) असतात. ते ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पोषक तत्वे आणि टाकाऊ पदार्थ वाहून नेते.
रक्ताभिसरण कसे चालते:
  1. हृदय फुफ्फुसांकडून ऑक्सिजनयुक्त रक्त डाव्या अलिंदात (left atrium) घेते.
  2. नंतर ते रक्त डाव्या निलयात (left ventricle) जाते, जे ते महाधमनीद्वारे (aorta) शरीराच्या इतर भागांमध्ये पंप करते.
  3. शरीराच्या पेशींमध्ये ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचल्यानंतर, कार्बन डायऑक्साईडयुक्त रक्त शिरांद्वारे (veins) परत हृदयाच्या उजव्या अलिंदात (right atrium) येते.
  4. उजव्या अलिंदातून रक्त उजव्या निलयात (right ventricle) जाते, जे ते फुफ्फुसांकडे पंप करते.
  5. फुफ्फुसांमध्ये, रक्त कार्बन डायऑक्साईड सोडते आणि ऑक्सिजन शोषून घेते, आणि ही प्रक्रिया पुन्हा सुरू होते.

या पद्धतीने रक्ताभिसरण संस्था शरीराच्या कार्यांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माणसाच्या शरीरातील असा कोणता अवयव आहे जो जाळला तरी नष्ट होत नाही?
मानवी शरीर मानवाचे नाही म्हणतात ते कितपत खरे आहे?
आजच्या मानवाच्या मेंदूचे वजन किती?
माझ्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
प्रौढ वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हाडे असतात?
शरिरात योग्य नियंञण ठेवण्याचे काय कोण करते?
तुम्हाला कसे कळले की कुत्रे श्वसन करतात?