घरगुती उपाय ढेकूण कीटक नाश आरोग्य

ढेकणांचा बंदोबस्त करण्याचा नैसर्गिक उपाय काय?

2 उत्तरे
2 answers

ढेकणांचा बंदोबस्त करण्याचा नैसर्गिक उपाय काय?

5
*🐞ढेकणांचा बंदोबस्त करण्याचा नैसर्गिक उपाय*
------------------------------------------
घरातील ढेकूण अत्यंत त्रासदायक कीटक…अल्पावधीतच त्यांची फौज तयार होण्यास वेळ लागत नाही… रात्रीच्या वेळेस तर त्यांचा विशेष त्रास जाणवतो. ते चावले तर त्वचाविकार होतात.हा त्रास दूर करण्यासाठी नियमित पेस्ट कंट्रोल करणे हा उपाय असला तरी यामुळे काही दुष्परिणामही होऊ शकतात. याकरिता ढेकणांना घराबाहेर काढण्यासाठी काही सुरक्षित घरगुती उपाय…

*पुदिना*

ढेकणांना पुदिन्याचा वास असह्य होतो. त्यामुळे या वासाने ते दूर पळतात. यासाठी झोपताना अंथरुणाजवळ पुदिन्याची ताजी पानं पसरवून ठेवा. लहान मुलांच्या पाळण्यातही पुदिन्याची पानं ठेवू शकता. पुदिन्याची पानं चुरून त्याचा रस शरीराला लावून झोपल्यानेही ढेकूण लांब राहतील.

*कडुलिंबाचे तेल*

कडूलिंबामध्ये दाहशामक आणि कीटकनाशक क्षमता आहे. तसेच कडूलिंबातील ऍन्टी मायक्रोबायल गुणधर्म घरातील अनेक कीटकांचा त्रास कमी करण्यासाठी मदत करतात. ढेकणांवर कडूलिंबाच्या तेलाचा शिडकाव करा. या प्रयोगामुळे अवघ्या आठवडाभरात ढेकणांचा त्रास कमी होण्यास मदत होईल. कपडे धुताना डिटर्जंट पावडरसोबत कडुलिंबाच्या तेलाचा समावेश केल्याने ढेकणाचा त्रास कमी होईल.

*टी ट्री ऑईल*

टी ट्री ऑइलमध्ये ऍन्टी मायक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे ढेकणांचा त्रास दूर ठेवण्यास मदत होते. टी ट्री ऑईल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे बनवा. हा प्रे भिंती, पलंग, कपाटं, पडदे, फर्निचर गाद्यांवर शिंपडा. आठवडाभर जेथे ढेकणांचा हमखास वावर असतो तेथे टी ट्री ऑईलचा स्प्रे केल्याने ढेकणांचा त्रास कमी होईल.

*निलगिरी*

ढेकूण दिसल्यास त्यावर निलगिरीचे काही थेंब शिंपडा. यामुळे ढेकूण दूर जातील. शिवाय रोजमेरी, लॅवेंडर या तेलांमध्ये निलगिरीचे तेल मिसळून त्याचा वापर करा. सर्दी पडशाच्या त्रासाला दूर ठेवण्यासोबतच ढेकणांचा त्रास टाळण्यासाठीही निलगिरी फायद्याची आहे.

*लॅवेंडर तेल*

ढेकणांना दूर ठेवण्यासाठी लॅवेंडरच्या पानांचा वापर करा. लॅवेंडरची पाने कपडय़ांवर घासा. लॅवेंडर परफ्युम शिंपडल्यानेही ढेकूण दूर राहू शकतात. पुदिन्याप्रमाणेच लॅवेंडर तेलाचा वासही ढेकणांना सहन होत नाही. या तेलाच्या सुगंधामुळे प्रसन्नता वाटतेच. शिवाय डास, ढेकूण असे कीटकही दूर राहतात.

____________________________
उत्तर लिहिले · 6/1/2019
कर्म · 569225
0
ढेकणांचा बंदोबस्त करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • नीलगिरी तेल (Eucalyptus Oil):ढेकणांना नीलगिरीच्या तेलाचा वास सहन होत नाही. त्यामुळे नीलगिरी तेल फवारल्याने ढेकण दूर होतात.
  • लवेंडर तेल (Lavender Oil): लवेंडर तेलाचा सुगंध ढेकणांना आवडत नाही. त्यामुळे तेलाचा स्प्रे केल्याने ढेकण घरातून पळून जातात.
  • पेपरमिंट तेल (Peppermint Oil): पेपरमिंट तेल ढेकणांसाठी विषारी असते. पेपरमिंट तेल diluted स्वरूपात फवारा.
  • टी ट्री तेल (Tea Tree Oil): टी ट्री तेलमध्ये antimicrobial गुणधर्म असतात. त्यामुळे ढेकणांना दूर ठेवण्यास मदत करते.
  • कडुनिंब तेल (Neem Oil): कडुनिंब तेल ढेकणांसाठी अत्यंत प्रभावी आहे. कडुनिंब तेल फवारल्याने ढेकण मरतात आणि त्यांची वाढ थांबते.
  • डायटोमेसियस अर्थ (Diatomaceous Earth): हा पांढरा पाउडर फॉर्ममध्ये असतो. तो ढेकणांच्या शरीरावर जमा होतो आणि त्यांना मारतो.
  • गरम पाणी (Hot Water): ज्या ठिकाणी ढेकण आहेत, त्या ठिकाणी गरम पाणी ओतल्याने ते मरतात.
  • सूर्यप्रकाश (Sunlight): ढेकणांना सूर्यप्रकाश सहन होत नाही. त्यामुळे ज्या वस्तूंवर ढेकण आहेत, त्या वस्तूंना काही तास उन्हात ठेवा.
  • व्हॅक्यूम क्लिनिंग (Vacuum Cleaning): नियमितपणे व्हॅक्यूम क्लिनिंग केल्याने ढेकणांची संख्या कमी होते.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?