2 उत्तरे
2
answers
रुई झाडाची माहिती मिळेल का?
3
Answer link
रुई एक वनस्पति आहे. रुई चे झाड भारत, श्रीलंका, पाकिस्तान इत्यादि देशांमध्ये आढळते. रुईचे पान त्याच्या खोडा पासुन तोडल्यास पानाच्या देठामधुन पांढरा रस
निघतो.
जीवशास्त्रीय रचना
रुईही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. शास्त्रीय नाव - Calotropis Procera. या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्या जवळ असतो.
औषधी उपयोग
मूळव्याधीचा मोड, चामखीळ, जास्त वाढलेले मांस, जाड कातडी यावर उपचार करण्याकरिता अनेक प्रकारचे क्षार घासून लावण्याचा विधी आयुर्वेदात सांगितला आहे. आघाडा, सातू, केळीचे खुंट, निवडुंग, रुई अशा विविध वनस्पतींची पाच अंगे जाळून पाण्यात भिजत ठेवून, ते पाणी नंतर आटवून क्षार तयार करता येतात.पायात काटा/काचेचा बारीक तुकडा/शिळक गेली असता रुईचा चीक लावल्यावर ती जागा पिकत नाही व काटा लवकर आपोआप बाहेर येतो. रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही.
प्रकार
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढर्या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढर्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढर्या फुलाच्या रुईला 'मंदार' असेही नाव आहे. या १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.[
हिंदी-मराठीत कापसालासुद्धा रुई म्हणतात. पण रुई या वनस्पतीचा आणि कापसाचा काही संबंध नाही.
धार्मिक महत्व
रुई हा वृक्ष हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. याच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. हा श्रावणनक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

0
Answer link
रुई (Calotropis gigantea) हे एक औषधी वनस्पती आहे. याला हिंदीमध्ये मदार आणि इंग्रजीमध्ये Crown flower असेही म्हणतात.
वर्गीकरण:
- Kingdom: Plantae
- Order: Gentianales
- Family: Apocynaceae
- Genus: Calotropis
- Species: C. gigantea
Beschreibung:
- रुईचे झाड मध्यम आकाराचे असून ते साधारणतः 8 ते 10 फूट उंच वाढते.
- याची पाने जाडसर आणि लंबगोल आकाराची असतात.
- रुईच्या झाडाला पांढरी किंवा गुलाबी रंगाची फुले येतात. ही फुले लहान गुच्छांमध्ये असतात आणि दिसायला आकर्षक असतात.
- फळ लांबट असून त्यात भरपूर बिया असतात. या बिया रेशमी धाग्यांनी वेढलेल्या असतात, ज्यामुळे त्या वाऱ्याने दूरवर पसरतात.
- झाडाला तोडल्यास त्यातून पांढरा चीक निघतो.
उपयोग:
- रुईच्या पानांचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.
- त्वचेच्या रोगांवर रुईचा चीक लावल्यास आराम मिळतो.
- सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी रुईच्या पानांचा उपयोग करतात.
- रुईच्या मुळाचा उपयोग खोकला आणि दमा यांवर उपचार करण्यासाठी करतात.
धार्मिक महत्त्व:
- रुईच्या फुलांचा उपयोग अनेक धार्मिक कार्यांमध्ये आणि पूजाविधींमध्ये करतात.
- भगवान शंकराच्या पूजेमध्ये रुईच्या फुलांना विशेष महत्त्व आहे.
इतर माहिती:
- रुईचे झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकते आणि त्याला जास्त पाण्याची गरज नसते.
- हे झाड विशेषतः उष्ण प्रदेशात आढळते.
संदर्भ: