इंटरनेट बँकिंग गुगल बिले अर्थशास्त्र

मी गुगल पे वर वीज बिल भरले होते, तरी ते बिल 'due' दाखवत आहे, तर काय करावे लागेल?

3 उत्तरे
3 answers

मी गुगल पे वर वीज बिल भरले होते, तरी ते बिल 'due' दाखवत आहे, तर काय करावे लागेल?

13
हा प्रोब्लेम मला पण आला आहे तीन चार वेळा. इकडे आपण अॉनलाईन पैसे भरावे, आणि निश्चिंत राहावं.. बायडीला पण सांगाव मी पैसे भरले आहेत. आणि पुढच्या महिन्याला.... महिन्याच आणि गेल्या महिन्याच एकदम बिल यावं.. आणि बायडीने आपल्यावर लाटणं फेकावं..

प्रोब्लेम काय आहे, विद्युत मंडळाची अॉनलाईन कामे खुप हळुवार आहेत. ३०० वर्षाच कासवं तरी लवकर चालेल. आपण ज्या अॉनलाईन पयमेंट करतो ते ॲप्स सगळे आहेत फास्ट आणि सुरक्षित.. परंतु विद्युत मंडळाची वेबसाईट, त्यांच सर्वर आहे जेमतेम.. आपण भरलेले पैसे त्यांना लगेच मिळत नाही, मिळाले तरी ते लगेच अपडेट होत नाही, अपडेट झाले तरी पुढच्या महिन्याचा बिलामागे ते कट होत नाही असे खुप प्रोब्लेम आहेत.

आपण एक काम करा(जे मी बरेचदा केलंय).. त्यांच्या अॉफिसला जा, आपण पयमेंट केली होती त्या ट्रांजेक्शनची माहिती, स्क्रिनशोट त्यांना दाखवा.. आणि मग आता बिलमध्ये झालेली गुंतागुंत दाखवा. ते पाहतील आणि तुमच्या बिलवर हाताने खाडाखोड करुन पैसे कमी करुन देतील. मग पुढचं जे बिल येईल ते व्यवस्थित येईल.

आणि परत कधीपण अॉनलाईन बिल भरु नका असं माझं मत राहिल. नाहीतर बायको लई मारेल.. :-) :-)
उत्तर लिहिले · 19/12/2018
कर्म · 75305
2
Paytm ने भरा लगेच होतो किंवा महावितरण ॲप ने पण. paytm बेस्ट आहे, मी 2 वर्षे झाली भरतोय.
उत्तर लिहिले · 19/12/2018
कर्म · 3750
0
तुम्ही Google Pay वर वीज बिल भरल्यानंतरही ते 'due' दिसत असेल, तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता: 1. पेमेंट स्टेटस तपासा: * Google Pay मध्ये transaction history मध्ये जा आणि पेमेंट successful झाले आहे की नाही ते तपासा. * पेमेंट successful झाले असेल, तर तुम्हाला transaction ID मिळेल. तो जपून ठेवा. 2. वीज वितरण कंपनीशी संपर्क साधा: * तुमच्या वीज वितरण कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करा आणि त्यांना तुमच्या पेमेंटबद्दल माहिती द्या. त्यांना transaction ID आणि इतर आवश्यक तपशील द्या. * त्यांच्या वेबसाइटवर किंवा ॲपवर तुमची तक्रार नोंदवा. 3. Bank Statement तपासा: * तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये Google Pay द्वारे झालेले पेमेंट तपासा. * पेमेंट झाले असेल, तर स्टेटमेंटची कॉपी वीज कंपनीला पाठवा. 4. Google Pay कस्टमर सपोर्ट: * Google Pay च्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा आणि त्यांना तुमच्या समस्येबद्दल माहिती द्या. टीप: * पेमेंट केल्यानंतर अपडेट होण्यासाठी काही वेळ लागू शकतो. त्यामुळे, 2-3 दिवस थांबा आणि पुन्हा स्टेटस तपासा. * तुम्ही भरलेल्या बिलाची पावती (receipt) जपून ठेवा. मला आशा आहे की यामुळे तुम्हाला मदत होईल.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5460

Related Questions

होम लोनमध्ये को-ॲप्लिकंटच्या खात्यातून ईएमआय डेबिट करू शकतात का?
भांडवलशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये थोडक्यात लिहा?
1850000 लोन घेतले आहे 17139 रुपये प्रति महिना हप्ता आहे 25 वर्षासाठी हप्ता चे सहाव्या महिन्यानंतर चार लाख रुपये भरले तर मला वर्षे कीती कमी होईल साधारण पणे व्याजदर 10.25 आहे ?
1850000.₹17,139 प्रति महिना हप्ता आहे. 25 वर्षांच्या नाहप्त्याच्या सहाव्या महिन्यानंतर ₹4 लाख भरले, तर माझी मुदत किती कमी होईल? साधारणपणे व्याजदर 10.25% आहे.
₹17,139 प्रति महिना हप्ता आहे. 25 वर्षांच्या हप्त्याच्या सहाव्या महिन्यानंतर ₹4 लाख भरले, तर माझी मुदत किती कमी होईल? साधारणपणे व्याजदर 10.25% आहे.
कृषी कर्जाचे विविध स्रोत कोणते आहेत? कृषी कर्ज व्यवस्थेतील समस्या व उपाय सांगा.
टिपा लिहा निर्बंध मुक्त बाजार?