माझं शरीर खूप पातळ आहे, तर मला शरीर वाढवण्यासाठी मी काय करू?
1. जेवण करताना पाणी पीयू नका, जेवणा अगोदर 15-30 मिन पुर्वी घ्या
2. जेवणा नंतर थोडंच पाणी घ्या नंतर अर्ध्या तासाने भरपूर प्या ।
3. दररोज 1 महिन्या पर्यंत त्रिफळा चूर्ण घ्या सकाळ - संध्या जेवणा नंतर
4. देशी अंडे सकाळी ( दूध कोमट करून कच्च अंड मिक्स करून अर्ध्या ग्लासात)
(पॉईंट 4 - सुरवातीला त्रास होईल कारण पचायला जड आहे)
जर अन्न पचन जास्त होईल तर साहजिकच तुमची बॉडी वाढेल ।
आजकाल भरपूर मेडिकल ads येतात त्यांच्या आहारी जाऊ नका साईड इफेक्ट्स खूप आहेत ।
१. भरपूर कॅलरी देणारे पदार्थ खा. ड्रायफ्रुटस, बदाम, मनुका यात मोठ्या प्रमाणावर कॅलरीज असतात. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होईल.
२. पोषकत्वांनी भरपूर असा आहार घ्या. वजन वाढवण्याआधी हे लक्षात घ्या तुम्हाला स्वस्थ शरीर हवयं लठ्ठपणा नकोय. त्यामुळे शरीराला उर्जा मिळेल असे अन्न घ्या.
३. वजन वाढवण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा. तुम्ही योगाही करु शकता. वेट ट्रेनिंग, ट्विस्ट कर्ल्स आणि डिप्ससारख्या व्यायामुळे शरीरात रक्तसंचार वाढतो आणि अधिक भूक लागते.
४. प्रोटीनची मात्रा वाढवा. प्रोटीनयुक्त मासे,अंडी, मोड आलेले चणे, चिकन, भात, दूध आणि दुधाचे पदार्थ, मेवा, बीन्स यां पदार्थांचे आठवड्यातून दोन वेळा सेवन करा.
५. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारात पनीर, लोणी तसेच तूपाचा समावेश करा.
६. तुम्हाला वजन वाढवायचे असल्यास अधिक प्रमाणात जेवण करावे लागेल. सुरुवातीला एकदम जेवण वाढवणे जमणार नाही. मात्र हळूहळू सुरुवात करा.
७. वजन वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या खाणे लाभदायक ठरते. त्यामुळे तुमचे आरोग्यही सुधारते आणि विनातणाव तुम्ही वजन वाढवू शकता.
८. वजन वाढवण्यासाठी तुमच्या आहारातून ५०० कॅलरी शरीरात जाणे आवश्यक आहे. तुम्ही शारिरीक काम करत असाल तर कॅलरीजची मात्रा वाढवा.
९. दिवसातून तीन वेळा मोठा आहार घ्या. तसेच २-३ वेळा अल्पोपहार घ्या. प्रत्येक २-३ तासाला काहीतरी खात राहा.
१०. वजन वाढवण्यासाठी योग्य झोप मिळणे आवश्यक असते. दिवसांतून किमान आठ तासांची पुरेपूर झोप घ्या.
स्रोत:झी न्युज
तुमचं शरीर खूप पातळ आहे आणि तुम्हाला ते वाढवायचं आहे, तर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता:
-
प्रथिने (Protein): तुमच्या आहारात प्रथिने भरपूर असावीत. यासाठी तुम्ही अंडी, चिकन, मासे, पनीर, सोयाबीन, कडधान्ये आणि डाळी यांचा समावेश करू शकता.
-
कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates): भात, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करा.
-
स्निग्ध पदार्थ (Fat): तूप, तेल, सुका मेवा (Dry fruits) आणि बिया (Seeds) यांचा आहारात уме समावेश करा.
-
कॅलरीज (Calories): तुमच्या शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीज घ्या.
-
वेळेवर जेवण: नियमित वेळेवर जेवण करा.
-
वजन उचलणे: वजन उचलण्याचे व्यायाम करा.
-
पुश-अप्स (Push-ups) आणि पुल-अप्स (Pull-ups): पुश-अप्स आणि पुल-अप्स नियमित करा.
-
नियमित व्यायाम: आठवड्यातून किमान 5 दिवस व्यायाम करा.
-
पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.
-
ताण कमी करा: ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
-
धैर्य ठेवा: शरीर वाढवण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे प्रयत्न करत राहा.
तुम्ही डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला घेऊ शकता. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.