गुगल अर्थव्यवस्था बिले

लाईट बिल न भरल्यामुळे लाईट खात्यातील माणसे लाईट कट करण्यासाठी आले होते. आम्ही २ दिवसात लाईट बिल भरतो म्हंटलो आणि आज मी ऑनलाईन गुगल पे वरून बिल भरले आहे. आता नंतर ते लोक आल्यास त्यांना भरले म्हणून कसे सांगायचे, कारण ऑनलाईन भरल्यास पावती तर नाही येत, त्यांना कुठली पावती दाखवायची?

5 उत्तरे
5 answers

लाईट बिल न भरल्यामुळे लाईट खात्यातील माणसे लाईट कट करण्यासाठी आले होते. आम्ही २ दिवसात लाईट बिल भरतो म्हंटलो आणि आज मी ऑनलाईन गुगल पे वरून बिल भरले आहे. आता नंतर ते लोक आल्यास त्यांना भरले म्हणून कसे सांगायचे, कारण ऑनलाईन भरल्यास पावती तर नाही येत, त्यांना कुठली पावती दाखवायची?

1
नमस्कार सर,

मी ही google pay ने online विजभरणा करत असतो तुमच्या google pay app वर जा आणि all tranjection मध्ये जा आणि त्यामध्ये बिल भरले असेल तर त्यासंबंधी tranjection चेक करा त्यामध्ये तुम्हाला तुमचे बिल भरल्याचे सर्व detail मिळतील ते दाखवा म्हणजे तुमची अडचण दूर होण्यास मदत होईल

उत्तर लिहिले · 27/11/2018
कर्म · 395
1
ते ऑनलाइन पाहू शकतात याची काळजी करण्याची गरज नाही कारण ऑफिसला त्यांच्याकडे दुसऱ्या दिवशीची ऑनलाइन थकीत यादी पाहता येते, फक्त त्यांना सांगा की मी बिल भरले आहे.
उत्तर लिहिले · 27/11/2018
कर्म · 20
0

तुम्ही लाईट बिल ऑनलाईन भरल्यानंतर त्याची पावती (Payment Confirmation) येण्यासाठी काही गोष्टी करू शकता:

  1. पेमेंट हिस्ट्री (Payment History): गुगल पे मध्ये तुम्हाला पेमेंट हिस्ट्री दिसेल. त्यात तुम्ही भरलेल्या बिलाची माहिती तपासा. तिथे तुम्हाला Transaction ID किंवा UTR नंबर दिसेल, तो तुम्ही नोट करून ठेवा.
  2. बँक स्टेटमेंट (Bank Statement): तुमच्या बँक स्टेटमेंट मध्ये सुद्धा हे पेमेंट रेकॉर्ड होईल. स्टेटमेंटची कॉपी तुम्ही काढू शकता.
  3. स्क्रीनशॉट (Screenshot): पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट घ्या.
  4. संबंधित विभागाशी संपर्क साधा: तुमच्या लाईट कंपनीच्या कस्टमर केअरला कॉल करून किंवा त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या पेमेंटची माहिती द्या.

तुम्ही त्यांना हे पुरावे दाखवू शकता:

  • गुगल पे transaction history चा स्क्रीनशॉट
  • बँक स्टेटमेंट
  • Transaction ID किंवा UTR नंबर
  • कस्टमर केअर सोबत बोलल्याचा रेकॉर्ड (असल्यास)

हे पुरावे दाखवल्यानंतर तुमचे लाईट कनेक्शन कापले जाणार नाही.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5220

Related Questions

निवास बिले उदाहरण?
वीज आणि पाण्याचे बिल कसे भरायचे?
मी गुगल पे वर वीज बिल भरले होते, तरी ते बिल 'due' दाखवत आहे, तर काय करावे लागेल?
Paytm वरून वीज बिल भरल्यावर प्रिंट मारून त्यावर MSEB चा स्टॅम्प मारायला लागतो का?
आपण 'पे फोन' या ॲप्लिकेशनद्वारे आपल्या घरचे इलेक्ट्रिक बिल भरू शकतो का? बिल कसे भरायचे आणि डिव्हिजनल कोड म्हणजे कोणता कोड?
लाईट बिल ऑनलाईन भरणे चांगले की ऑफलाईन?
पेटीएमने लाईट बिल ऑनलाईन भरल्यास त्याची पावती कशी मिळते?