2 उत्तरे
2 answers

VVPAT बद्दल माहिती द्या?

9
काय असतं VVPAT?

'Voter Verifiable Paper Audit Trail' म्हणजे VVPAT.

मतदार एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करतो. मतदारानं ज्या उमेदवाराला मत दिलं आहे; ते मत त्याच उमेदवाराला मिळाले आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी VVPAT वापरलं जातं.

EVM मशीनद्वारे मतदान होतं. मात्र या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी केली जाऊ शकते.

दुसऱ्या शब्दांत मतदारानं उमेदवाराला दिलेलं मत सुरक्षित ठेवण्यादृष्टीनं तयार करण्यात आलेली ही दुसरी पर्यायी यंत्रणा आहे.



EVM मशीनमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी अनेक राजकीय पक्षांकडून केल्या जातात. EVMद्वारे मतांची अफरातफर होते असा आरोप वारंवार केला जातो. अशा परिस्थितीत मत अबाधित राखण्यासाठी VVPAT उपयोगात आणलं जातं.



व्हीव्हीपॅट मशीन्स

मतदारानं मत दिल्यानंतर व्हीव्हीपॅट तत्क्षणी त्याची माहिती मतदाराला देतं. आपलं मत ठरवलेल्या उमेदवारालाच मिळालं आहे ना यावर VVPAT शिक्कामोर्तब करतं.

व्हीव्हीपॅट मशीन कसं चालतं?

मतदार EVM मशीनवर उमेदवाराच्या नावासमोरचं बटन दाबतो. त्याचवेळी उमेदवाराचं नाव, क्रमांक आणि चिन्ह यांचा उल्लेख असलेली VVPAT स्लिप 7 सेकंद मतदाराला दिसते. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होऊन बीप वाजतो आणि स्लिप सीलबंद पेटीत जमा होते.

मतदान करताना काही तांत्रिक अडचण उद्भवली असेल तर त्याचीही माहिती दिली जाते. जे ठरवलं तसंच मतदान केलं आहे ना? याची खातरजमा करण्याची संधी मतदाराला मिळते.

VVPAT मशीन काचेच्या पेटीत असतं. जेणेकरून मतदान केलेला मतदारच स्लिपवरचा तपशील पाहू शकतो. VVPAT मशीन उघडण्याचा अधिकार फक्त निवडणूक अधिकाऱ्यांना असतो. मतदारांना VVPAT मशीन उघडता येत नाही. त्याला हात लावता येत नाही.

VVPAT मधला पेपर रोल प्रत्येक मतदानावेळी 1500 स्लिप प्रिंट करू शकतो. EVM मशीनमध्ये गडबड असल्याचे आरोप निवडणूक आयोगाने नाकारले आहेत. मात्र EVM वरील आरोपांना काटशह देण्यासाठी काही निवडणुकांमध्ये VVPATचा प्रयोग राबवण्यात आला आहे.

संकलित माहिती
स्त्रोत:डेलीहंट साभार
उत्तर लिहिले · 23/11/2018
कर्म · 458580
0

VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) हे एक स्वतंत्र प्रणाली आहे जी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राला (EVM) जोडलेली असते. यामुळे मतदारांना त्यांनी कुणाला मत दिले आहे, हे पाहता येते आणि त्यांची खात्री पटते.

VVPAT ची कार्यप्रणाली:

  • जेव्हा मतदार EVM द्वारे मत टाकतात, तेव्हा VVPAT मशीन एक कागदी स्लिप तयार करते.
  • या स्लिपवर मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले आहे त्याचे नाव आणि चिन्ह छापलेले असते.
  • ही स्लिप काही सेकंदांसाठी मतदाराला दिसते, आणि नंतर ती एका सीलबंद डब्यात जमा होते.
  • यामुळे मतदाराला त्याच्या मताची खात्री पटते.

VVPAT चा उपयोग:

  • VVPAT प्रणाली EVM मध्ये नोंदवलेल्या मतांची पडताळणी करण्यासाठी वापरली जाते.
  • जर EVM मध्ये काही गडबड झाली असेल, तर VVPAT स्लिप्स वापरून मतांची फेरगणना करता येते.
  • यामुळे निवडणुकीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होते.

VVPAT चा इतिहास:

  • VVPAT प्रणाली सर्वप्रथम 2013 मध्ये नागालँडमधील नोकसेन (Noksen) विधानसभा मतदारसंघात वापरली गेली.
  • 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, सर्व मतदान केंद्रांवर VVPAT चा वापर करण्यात आला.

VVPAT विषयी अधिक माहितीसाठी:

  • तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://eci.gov.in/

VVPAT हे भारतीय निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवणारे एक महत्त्वाचे साधन आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5300

Related Questions

Jio डिव्हाइसचे युझरनेम आणि पासवर्ड कसे बदलावे?
Jio च्या डोंगल मध्ये नेट कसे तपासावे?
तांत्रिक घटकांमुळे समाजात होणारे बदल स्पष्ट करा?
Computer वरून सर्व प्रकारचे फॉर्म भरता येईल असे कोणते सॉफ्टवेअर घ्यावे?
Dongle म्हणजे काय?
कॉम्प्युटर घेताना काय तपासणी करावी?
इंटरनेटवर टिपा लिहा?