2 उत्तरे
2 answers

महापूर का उद्भवतो?

2
अतिवृष्टीमुळे नदी- नाल्यांतील पाणी वाढून आसपासच्या परिसरात पसरण्याची परस्थिती म्हणजे थोडक्यात महापूर होय.

महापूर येण्याची कारणे

@@@@नैसर्गिक कारणे@@@@

१. नदया- नाल्यांच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परस्थिती निर्माण होते.

२. हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे पूर येतात.

@@@@मानव निर्मित कारणे@@@

1. जमीन समतलीकरण, शहरीकरण, रस्ते, कारखाने, आगगाडी रूळ, खाणकाम यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळे जमिनीची मोठया प्रमाणात धूप होऊन माती नदी- नाल्यांच्या पात्रात साठून नदी-नाल्यांचे पात्र उथळ बनते.त्यामुळे नदी-नाल्यांत अतिरिक्त पाणी वाढून पूर परस्थिती निर्माण होते.

2. भूकंप वा अन्य कारणांमुळे धरणे फुटून देखील पूर परस्थिती निर्माण होते.

3.  नदी-नाल्यांत केलेले अतिक्रमण, वाढता कचरा यामुळे पात्र उथळ बनून पूर येतो.

पुराचे परिणाम

१. पुरामुळे मनुष्यासह वन्यजीव व पाळीव प्राणी यांची जीवित हानी होते.

२. पुरामुळे घरे,शासकीय कार्यालये, धान्ये कोठार, बँक, यात पाणी शिरल्यामुळे वस्तू, अन्नधान्य व पैसा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

३. रस्ते वाहून जातात त्यामुळे वहातुक सुविधा विस्कळीत होतात.

४. वीज ,टेलिफोन सुविधा विस्कळीत होतात.

५. मनुष्य व प्राण्यांची जीवितहानी झाल्यामुळे परिसरात दृगंधी पसरून रोगराई निर्माण होते.

पुराचे चांगले परिणाम

१. नदी- नाल्यांच्या पात्रात साठलेल्या माती व कचऱ्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढून विहिरींना पाणी लागते.

२. पुरामुळे वाहून येणाऱ्या गाळाचे पुरक्षेत्रात संचयन होऊन चांगली गाळाची सुपीक जमीन तयार होते.

३. पुरामुळे नदी पात्रात अडकलेला कचरा वाहून गेल्यामुळे रोगराई पसरत नाही.

पुरदक्षता

पूर येण्यापूर्वी

१. जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा. वृक्ष तोडीस प्रतिबंध घाला.

२. मोठी धरणे बांधण्या ऐवजी छोटी व धरणे बांधा.

३. आगी पासून वनांचे संरक्षण करा.

४. नदी पात्रात अडकलेला केर कचरा बाजूला करून पुन्हा कचरा जमा होणार नाही याची काळजी घ्या.

५. नदी- नाल्यांच्या किनारी संरक्षक भिंती बांधा.

६. नदी- नाल्या शेजारी वस्त्या वाढवू नका.

७. आपण ज्या परिसरात राहतो. ते पूरप्रवण क्षेत्र आहे का? याची खात्री करून आवश्यक ती पूर्वतयारी करा.

पूर आल्यानंतर

१. पाण्याची खात्री नसल्याठिकाणी जाऊ नका.

२. घरातील लहान मुले, वृद्ध, अपंग याच्याकडे विशेष लक्ष दया. त्यांना धीर दया.

३. पुरात बळी पडलेल्यांना मदत करा.

४. उंच जमिनीवर जाण्याचा प्रयत्न करा.

५. विदयुत उपकरणे पाण्याखाली जात असतील तर ती त्वरित बंद करा. कुठल्याही परस्थित त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करू नका.

६. आपल्या घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित किंवा उंचीवर ठेवा.

७. वीज प्रवाह असलेल्या ठिकाणांना पासून दूर उभे राहा.

८. पुराच्या पाण्याचा संपर्क झालेल्या वस्तू खाऊ नका.

९. पूर ओसरल्यानंतर आसपासच्या परिसरात पुराचे पाणी साठू देऊ नका.
उत्तर लिहिले · 19/11/2018
कर्म · 210095
0
महापूर (Flood) का उद्भवतो याची कारणे:
  • अतिवृष्टी: जेव्हा एखाद्या क्षेत्रात खूप जास्त पाऊस पडतो, तेव्हा नद्या आणि जलाशये ओव्हरफ्लो होतात, ज्यामुळे पूर येतो.

    Britannica - Flood

  • वादळे आणि चक्रीवादळे: जोरदार वादळे आणि चक्रीवादळे समुद्रातील पाणी किनारी भागांमध्ये ढकलतात, ज्यामुळे पूर येऊ शकतो.

    National Geographic - Hurricane

  • बर्फ वितळणे: पर्वतीय प्रदेशात जेव्हा बर्फ झपाट्याने वितळतो, तेव्हा नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढते आणि पूर येतो.

    USGS - Glaciers and Ice Sheets

  • मानवी हस्तक्षेप: मानवी बांधकामांमुळे, जसे की धरणे आणि बंधारे, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबू शकतो, ज्यामुळे पूर येऊ शकतो. तसेच, शहरातील नाल्यांमध्ये कचरा साचल्यामुळे पाणी तुंबते आणि पूर येतो.

    WWF - Habitat Loss and Degradation

  • नैसर्गिक कारणे: त्सुनामी आणि भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे समुद्रातील पाणी वेगाने जमिनीवर येते आणि पूर येतो.

    NOAA - Tsunamis

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

1975 चा पेठ मधील दुष्काळ?
कोणकोणत्या आपत्तीची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते?
अरिष्टांमुळे जीवित व वित्तहानी घडून येते का?
कोरड्यामुळे ज्या लोकांचे जीव गेले, अशा लोकांचे पोस्टमार्टम का केले गेले नाही?
नैसर्गिक आपत्ती व दोन विकास प्रकल्पाचा आढावा कधी घेण्यात आला?
पृथ्वीवर अनेक नैसर्गिक घडामोडींना काय कारणीभूत ठरते?
पृथ्वीवरील अनेक घडामोडींना काय कारणीभूत ठरते?